Weight Loss

वजन कमी करण्यासाठी योग्य नाईट रूटीन

Dipali Naphade  |  Aug 13, 2021
weight-loss-night-routine

आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये आपले खाणे पिणे नक्कीच व्यवस्थित नसते. त्यामुळे पटकन वजनवाढ हा त्याचा परिणाम दिसून येतो. बऱ्याचदा काही जण रात्री उशीरा जेवतात आणि शरीराला कोणताही ताण न देता लगेच झोपतात. यामुळेदेखील वजनवाढ होताना दिसून येते. पण तुम्हाला जर तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्ही त्यासाठी तुमचे नाईट रूटीनदेखील योग्य ठेवायला हवे. रात्री जेवल्यानंतर आपण नक्की काय करतो ही सवय आपल्या शरीरातील मेटाबॉलिजम आणि पचनक्रिया प्रभावित करत असते. यामुळे वजन वाढण्यासह शरीरासाठी हे हानिकारक ठरू शकते. तुमचे वजन तुम्ही रात्री जेवणानंतरची जी सवय आहे त्यामुळेदेखील वाढू शकते. त्यामुळे तुम्ही वजन कमी करण्यसाठी योग्य नाईट रूटीन वापरावे. म्हणजे नक्की काय करायचे ते जाणून घ्या. 

योग्य डाएटवर लक्ष द्या

diet food for weight loss

जेवण झाल्यावर आपण साधारण किती कॅलरी खाल्ली आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही जेवणामध्ये किती खाता याकडे व्यवस्थित लक्ष द्या. रात्रीच्या वेळी नेहमी हलका आहार घेणे आवश्यक आहे. कारण बरेचदा रात्री अति जेवणाचे सेवन केल्यास, अन्नाचे पचन नीट होत नाही आणि मग वजनवाढ होते. त्यामुळे योग्य डाएटवर तुम्ही लक्ष द्या. रात्रीच्या वेळी हलके जेवण खाल्ले जाईल आणि अरबट चरबट खाल्ले जाणार नाही याकडे लक्ष द्या. 

रात्री गोड खाऊ नका

sweets

गोड पदार्थांमध्ये अति कॅलरी आणि साखरेचा भरणा असतो. शक्यतो रात्री जेवणात अथवा जेवणानंतरही गोड पदार्थ खाणे टाळा. तुम्हाला वजनात वाढ नको असेल तर तुम्ही नक्की या रूटीनची सवय लाऊन घ्या. बऱ्याच लोकांना रात्री जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची अथवा आईस्क्रिम अथवा चॉकलेट खाण्याची सवय असते. पण यामुळे पोटात अधिक चरबी निर्माण होते. त्यामुळे शक्यतो रात्री तुम्ही गोड पदार्थ खाणे टाळलेलेच बरे. 

आंघोळीपासून राहा लांब

bath in the evening

बऱ्याच व्यक्तींना आपण रात्री झोपण्यापूर्वी आंघोळीला गेलेले पाहतो. रात्री आंघोळ केल्याशिवाय काही जणांना झोपच येत नाही. बाहेरून आल्यानंतर आंघोळ करणे ही चांगली गोष्ट आहे. मात्र रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करून लगेच झोपू नका. रात्री जेवल्यानंतर त्वरीत आंघोळ केल्यास, तुमची पचनक्रिया ही मंदावते. त्यामुळे दिवस अथवा रात्री कधीही खाल्ल्यानंतर त्वरीत आंघोळ करू नये. पोटातील आणि शरीरातील रक्तप्रवाह यामुळे कमी होतो आणि त्यामुळे पचनक्रिया मंदावते असं सांगण्यात येतं. अर्थातच याचा परिणाम अन्नपचन न झाल्याने जाडी वाढण्यावर होतो. त्यामुळेच तुम्ही जेवल्यानंतर त्वरीत आंघोळ करून लगेच झोपू नका. 

फ्रिजमधील थंड पाणी न पिणे 

थंड पाणी पिण्याचे तुमची पचनशक्तीची प्रक्रिया खराब होते आणि डायजेस्टिव्ह सिस्टिम बिघडवण्याचे काम फ्रिजमधील थंड पाणी करते. त्यामुळे रात्री झोपताना सहसा थंड पाणी पिऊ नये. तसंच दिवसभरदेखील तुम्ही थंड पाणी न पिता नियमित साधं पाणी प्यायलात तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा मिळतो. थंड पाण्यामुळे वजन वाढ होते. त्यामुळे सहसा थंड पाणी पिणे टाळा. 

अधिक वाचा – वजन कमी करायचं असेल तर बदला झोपण्याची पद्धत

रात्री जेवल्यानंतर फळ खाऊ नका 

रात्री जेवल्यानंतर काही जणांना फळं खाण्याची सवय असते. पण तुम्हाला जर अशी सवय असेल तर वेळीच ही सवय सोडून द्या. जेवल्यानंतर त्वरीत फळं खाल्ल्यास, फळांचे पचन व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे पहिले खाल्लेल्या अन्नाचेही पचन होत नाही. ही फळं पोटामध्ये तशीच सडतात आणि यामुळे पचनक्रिया हळू होते. त्यामुळे ही चूक करू नका. 

अधिक वाचा – एका महिन्यात करा 4 किलो वजन कमी, सोप्या टिप्स

लगेच झोपू नका

काही जणांना जेवल्याजेवल्या लगेच रात्री झोपायची सवयही असते. पण असं अजिबात करू नका. जेवल्यानंतर किमान 15-20 मिनिट्स तरी तुम्ही हळूवार चाला. शतपावली करा. त्यामुळे जेवण जिरण्यास मदत मिळते. मेटाबॉलिज यामुळे वाढते आणि अन्नाचे पचन होण्यास मदत मिळते. त्यामुळे तुमच्या नाईट रूटीनमध्ये चालण्याची ही सवय नक्की लाऊन घ्या. शक्यतो उशीरा जेवणेही टाळता आल्यास, टाळा.  

अधिक वाचा – वजन कमी करण्यासाठी प्या कडीपत्त्याचा रस, जाणून घ्या फायदे

डायनिंग टेबलवर बसून राहू नका 

जेवणानंतर काही वेळ डायनिंग टेबलवर तसंच बसून राहण्याची काही जणांना सवय असते. पण ही सवय तुम्हाला भारी पडू शकते हे लक्षात ठेवा. वजन वाढायला नको असेल अथवा वाढलेले वजन कमी करायचे असेल तर ही सवय नक्की बदला. जेवताना तासनतास चावत बसणे चुकीच आहे. यामुळे वजनवाढ तर होतेच. पण अन्नाचे पचनही नीट होत नाही. अनावश्यक कॅलरी वाढीला लागते. त्यामुळे तुम्ही डायनिंग टेबलवर तासनतास बसून खाऊ नका.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Weight Loss