लाईफस्टाईल

बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी | After Pregnancy Tips In Marathi

Dipali Naphade  |  May 19, 2022
After Pregnancy Tips In Marathi

प्रत्येक स्त्री साठी आई होणं हे एक स्वप्न असतं. आई होण्यासारखं दुसरं सुख नाही असं प्रत्येकीला वाटत असतं. पण आजकाल आई होणं वाटतं तितकं नक्कीच सोपं नाही. मुळातच हल्ली लग्न उशीरा होतात आणि त्यानंतर बाळासाठी प्रयत्नही उशीराच केले जातात. त्यामुळे हल्ली फारच कमी वेळा नॉर्मल डिलिव्हरी झाल्याचं ऐकायला येतं. सिझर झाल्यानंतर तर गरोदरपणामध्ये अधिक काळजी (Pregnancy Nantar Ghyaychi Kalji) घ्यावी लागते. गरोदरपणामध्ये नक्की का काळजी (Pnc Care In Marathi) घ्यावी लागते? याचीही कारणं आहेत. वास्तविक गरोदरपणानंतर सर्वात जास्त बाळाबरोबर स्वतःचीही काळजी घ्यावी लागते. ही काळजी नक्की कशी आणि काय घ्यावी (Delivery Zalyavar Kay Karave ) याबद्दल आम्ही तुम्हाला आमच्या लेखातून सांगणार आहोत. गरोदरपणा म्हटलं की, खरं तर सगळ्या मिक्स भावना असतात. आनंद, काळजी, चिंता या सगळ्या गोष्टी मनात एकदमच घर करतात. त्यात लहान बाळ पहिल्यांदाच आल्यानंतरच्या भावना आणि आता याला कसं सांभाळायचं, बाळाचा आहार कसा असावा आणि त्याबरोबरच स्वतःला कसं सांभाळायचं याचीही एक रेस सुरु होते. बाळाबरोबर आईचा आहार (Food After Delivery For Indian Mother In Marathi) कसा असावा हेदेखील महत्त्वाचे. पण तुम्हाला आम्ही यामध्ये नक्कीच मदत करू शकतो. यासाठीच गर्भधारणा झाल्यावरच बाळावर गर्भसंस्कार (After Pregnancy Tips In Marathi) करण्यास सुरूवात करा.

ओल्या बाळंतिणीने डिलिव्हरीनंतर पुढच्या 24 तासात काय काळजी घ्यावी

डिलिव्हरी अर्थात बाळंतिणीचा प्रकार हा दोन पद्धतीचा असतो. एक म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी (Normal Delivery) आणि दुसरी म्हणजे सिझर (Cesarean Delivery). ओल्या बाळंतिणीला डिलिव्हरीनंतर पुढच्या 24 तासात स्वतःला आणि बाळाला जपावे लागते. 

नॉर्मल डिलिव्हरी असल्यास आणि सीझर झाली असल्यास घ्यायची काळजी (Postpartum Care In Normal Delivery Vs Cesarean In Marathi)  

नॉर्मल डिलिव्हरी आणि सीझर डिलिव्हरी यामध्ये खूपच फरक असतो. नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या महिला या लवकर त्यातून बाहेर येतात. पण सीझर झालेल्या महिलांना निदान सहा महिने तरी प्रचंड काळजी घ्यावी लागते. अर्थात याचा अर्थ असा नाही की, नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या महिला या लगेच काम करू शकतात. पण सीझर झालेल्या महिलांच्या तुलनेत त्यांची प्रकृती लवकर स्थिरस्थावर होत असते. त्यामुळे सीझर झाल्यानंतर तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागते. ती नक्की काय काळजी घ्यायची (Pregnancy Tips For First Time Moms In Marathi) हे जाणून घेऊया –

बाळंतिणीच्या आरोग्यासाठी धोक्याची लक्षणे

बाळंतिणीचे आरोग्य खूपच महत्त्वाचे असते. डिलिव्हरी झाल्यानंतर (Pregnancy Nantar Ghyaychi Kalji) काही महिलांना अनेक त्रासालाही सामोरे जावे लागते. पण त्यापैकी काही त्रास हे बाळंतिणीच्या आरोग्यासाठी धोक्याची लक्षणे ठरतात. असे कोणते त्रास आहेत जे तुम्हाला लक्षात घ्यायला हवेत ते जाणून घ्या – 

यापैकी कोणतेही लक्षण तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही त्वरीत बाळंतिणीला घेऊन पुन्हा डॉक्टरांकडे जायला हवे. हे अत्यंत गंभीर आहे हे तुम्ही वेळीच लक्षात घ्या. गरोदरपणानंतर बाळंतिणीची काळजी घेताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यापैकी काही समस्या नक्की कोणत्या आहेत हे आपण पुढे पाहूया.

गरोदरपणानंतर होणाऱ्या समस्या (Things That Happen During Pregnancy In Marathi)

रक्तस्राव (Excessive Bleeding)

गरोदरपणानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट असती होणारा रक्तस्राव. एकाच वेळी दोन पॅडदेखील लावावे लागतात. शिवाय दिवसातून तीन ते चार वेळा बदलावे लागतील इतका रक्तस्राव होत असतो. गरोदरपणानंतर हा त्रास सर्वात जास्त होत असतो. शिवाय या वेळी रक्ताच्या गुठळ्या बाहेर पडतात वा रक्त अति प्रमाणात जात असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. हा स्राव खरं तर दुसऱ्या आठवड्यापर्यंत थांबतो.

सतत लघवीला जाणे (Frequent Urination)

टाक्यांमुळे लघवीला जायचा बऱ्याच महिलांना त्रास होतो. पण असं असलं तरीही लघवीला जाणं गरजेचं आहे. कारण तसं न केल्यास तुमचं मूत्राशय भरू शकतं. शिवाय गरोदरपणानंतर तुमच्या शरीरामध्ये पाणी आणि क्षार जास्त प्रमाणात असतं. हे शरीरातून निघून जाण्यासाठी तुम्हाला निदान दिवसातून तीन ते चार वेळा लघवीला जाणं आवश्यक आहे.

स्तन घट्ट होणे (Breast Engrossment)

अनेक बाळंतिणींना गरोदरपणानंतर दूध पाजताना अथवा दुधाच्या वेळी स्तन घट्ट होण्याचा त्रास होतो. तर दुधाचा नीट निचरा झाला नाही तर त्याची गाठ होते आणि ती दुखते. त्यामुळे स्तन दाबून हे दूध बाळंतिणींना काढून घ्यावे लागते. काही वेळा बाळंतिणीला यामुळे स्तनात पू देखील होतो. त्यामुळे वेळीच तुम्ही काळजी घ्यायला हवी. गरोदरपणाानंतर बाळंतिणीच्या शरीराचा महत्त्वाचा भाग म्हणजे स्तन. पहिल्या दिवशी पिवळट स्राव येतो. ज्याला कोलोस्ट्रम म्हटलं जातं. जे बाळासाठी आवश्यक असतं. तिसऱ्या दिवशीपर्यंत दुधाचं प्रमाण व्यवस्थित सुरू होतं. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाळाला दूध मिळण्यासाठी स्तनांना आटू न देणं गरजेचं आहे. तुम्ही जर स्तनांकडे योग्य लक्ष दिलं नाहीत तर तुमचे स्तन आटून बाळासाठी दूध येणं बंद होईल.

वजन कमी होणे (Weight Loss)

बाळ झाल्यानंतर तुम्हाला थोडे हलके वाटते. तर तुम्ही बाळाला स्तनपान करत असाल तर यामुळे तुमचे वजन कमी होण्याची शक्यता असते. स्तनपानामुळे तुमचे वजन गर्भधारणेपूर्वी होते तसे होऊ शकते. मात्र तुमचे वजन जर जास्त कमी होत असेल तर तुम्ही याकडे दुर्लक्ष करू नका  

बद्धकोष्ठता (Constipation)

तुमची नॉर्मल डिलिव्हरी असो वा सीझर. बाळंतिणीला बद्धकोष्ठता होण्याची शक्यता असते. प्रसुतीमुळे ही जागा अधिक नाजूक झालेली असते. त्यामुळे संडासला जाताना अनेक महिलांना त्रास होतो. अशा वेळी सिझर असल्यास, बाळंत काढाही दिला जातो (Balant Kadha After C-Section In Marathi). त्यामुळे ही समस्या कमी होते. 

भावनिक बदल (Emotional Changes)

गरोदरपणात आणि बाळ झाल्यानंतरही महिलांमध्ये अनेक भावनिक बदल होत असतात. महिलांचे मूड स्विंग्ज या काळामध्ये अधिक होतात. काही बाळंतिणींना अतिशय आनंदी वाटते तर काही महिलांना अशा काळात अधिक निराश आणि थकल्यासारखेही वाटते. काही जणी या काळात अचानक रडतात, तर काही नवीन आई चिडचिड्या होतात. 

चिडचिड

बाळंतिणींना नीट जेवायची आणि झोपायची बाळाच्या जन्माआधी सवय असते. मात्र ती सवय नंतर पूर्ण करता येत नाही. अनेकदा बाळ रात्र रात्र झोपत नाही. काही बाळ अधिक रडतात तर काही बाळांना न सांभाळता आल्यामुळे चिडचिड होते. याचा उत्तम उपाय म्हणजे बाळ झोपेल तेव्हा आपणही झोपून घ्यावे. जेणेकरून चिडचिड कमी होईल. 

तणाव आणि चिंता (Stress)

पहिल्यांदाच आई झाल्यास, वेगवेगळ्या चिंता सतावतात. आपल्या बाळाला दूध पुरतंय की नाही, बाळ व्यवस्थित झोपतंय की नाही, बाळाला काही त्रास तर होत नाही ना, आपलं वजन जास्तच वाढलंय का असे एक ना अनेक प्रश्न मनात असतात. त्यामुळे मनावर ताण आणि डोक्यात चिंता निर्माण होणं ही कॉमन समस्या आहे. 

गरोदरपणानंतर ही काळजी घ्यायलाच हवी

बाळाच्या जन्मानंतर आईच्या शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. त्यामुळे बाळंतिणीला आपल्या बाळाप्रमाणेच स्वतःची काळजीसुद्धा घेण्याची गरज असते. आईच्या शरीरामध्ये सतत पुढील सहा महिने बदल होत असतात. त्यामुळेच पूर्वी सव्वा महिना घरामध्ये बंधन पाळलं जायचं. त्यामुळे महिलांना तब्बेत सुधारायला वेळ मिळत असे. या काळामध्ये प्रसूतीमुळे अनेक गुंतागुंती होत असतात आणि म्हणूनच गरोदरपणानंतर काळजी घेणं यासाठी गरजेचं असतं. त्यामध्ये प्रसूतीनंतरचा रक्तस्राव, हृदयाघात यासारख्या गोष्टी येतात. यामुळे महिलांच्या शरीरातील ताकद निघून गेलेली असते. त्याचप्रमाणे या काळात रक्तक्षय, उच्च रक्तदाब, हृदरोग, पोस्टपार्टम डिप्रेशन असे आजारही बळावतात. त्यामुळे सर्वात जास्त स्वतःची काळजी घ्यायला हवी.

किती दिवस आराम करावा 

काहीजण बाळंतिणीला पहिले 3 दिवस उपाशी ठेवतात, जे अत्यंत चुकीचे आहे. बाळंतपणानंतर बाळंतिणीच्या शरीराची झीज आणि बाळाच्या डिलिव्हरीनंतर झालेली जखम भरून काढायला वेळ लागतो. त्यामुळे बाळंतपणानंतर साधारण 6 आठवडे तरी बाळंतिणीसाठी विश्रांती आवश्यक आहे. ब-याच महिलांना अशी विश्रांती मिळत नाही. पण लक्षात ठेवा याच विश्रांतीमुळे झीज भरून येते, जखमा भरून येतात. त्यामुळे इतका आराम तरी करायलाच हवा. 

रिकव्हरीसाठी किती वेळ लागतो (साधारण सव्वा महिना)

नॉर्मल डिलिव्हरीमध्ये महिला लवकर काम करू शकतात हे जरी खरे असले तरी शरीराची रिकव्हरी व्हायला नॉर्मल डिलिव्हरी असो वा सीझर असो साधारण सव्वा महिना अर्थात 40 दिवस तरी लागतातच. डिलिव्हरी झाल्यानंतर काय करावे (Delivery Zalyavar Kay Karave) असा प्रश्न अनेकांना असतो. तर रिकव्हरी होणे गरजेचे असते. त्यामुळे इतका काळ तुम्ही बाळाची काळजी घेत स्वतःदेखील आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. 

सिझर असल्यास योनिमार्गाच्या जखमांची देखभाल

तुमच्या बाळाची डिलिव्हरी जर सीझर पद्धतीने झाली असेल तर तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागते. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे योनीमार्गाच्या जखमांची देखभाल करणे, काळजी घेणे. यासाठी तुम्ही साधारण एक बादलीभर पाणी गरम करून घ्या. हे पाणी गरम करतानाच तुम्ही त्यामध्ये कडुलिंबाचा पाला मिसळा आणि एका मोठ्या घमेल्यात हे पाणी ओतून घ्या. त्यामध्ये बाळंतिणीला बसवा आणि साधारण 15/20 मिनिटे तिला शेक घेऊ द्यावा. जर तुम्हाला असे बसायला जमत नसेल तर तुम्ही या औषधी पाण्यानं जखम धुवा. त्यानंतर तुम्ही निंबोळी तेल या सीझरच्या जखमेवर लावा. हे रोज तुम्ही केले तर 8/10 दिवसांत जखम भरते.

टॅप्सून्स न वापरता पॅड वापरा 

गरोदरपणाच्या काळात मासिक पाळी येत नाही. त्यामुळे ही सर्व कसर बाळंतिणीला नंतर सहन करावी लागते. बाळ झाल्यानंतर (Pregnancy Nantar Ghyaychi Kalji) साधारण दोन ते तीन आठवडे रक्तस्राव होत असतो आणि त्यावेळी तुम्ही टॅम्पून्स न वापरता नियमित पॅड वापरावे. कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये यासाठी बाळंतिणीने ही काळजी नक्की घ्यावी. 

योनीमार्गाच्या समस्यासाठी आईस पॅक वापरा 

साधी जखम झाली तरीही बर्फाने शेकविण्याचा सल्ला आपल्याला देण्यात येतो. कारण जखमेमुळे जी सूज आजूबाजूला येते, ती बर्फाच्या शेकामुळे कमी होते. नॉर्मल डिलिव्हरी अथवा सीझर डिलिव्हरीमुळे योनीमार्गाच्या समस्या निर्माण होतात आणि सूजही येते. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही आईस पॅक वापरून शेक देऊ शकता. आईस पॅकच्या सहाय्याने तुम्ही शेक दिल्यास, तुम्हाला नक्कीच फायदा मिळतो. पण तुम्ही उठता बसता टाक्यांकडे मात्र व्यवस्थित लक्ष द्यायला हवे. त्याला कोणताही धक्का पोहचू देऊ नका. 

विश्रांती गरजेची

बाळंतपणानंतर गर्भाशय पूर्वावस्थेत येत असते. सव्वा महिन्याच्या काळात तुम्ही किमान दोन ते तीन वेळा तरी डॉक्टरांना भेटून टाके दाखवा. पहिली भेट ही तीन दिवसाच्या आतच घ्यायला हवी. त्याचप्रमाणे तुम्ही या काळात जास्तीत जास्त विश्रांती घेण्याची अत्यंत गरज आहे.  बाळ जेव्हा झोपले असेल तेव्हा तुम्ही झोपत जा. बाळाला बघायला येण्याचे मनोरंजन करत राहू नका. तुम्ही तुमच्या स्वतःची काळजी घ्या. 

सीट्स बाथ घ्या 

शौचाला गेल्यानंतर रोज काही वेळ कोमट पाण्यात बसण्याला सीट्स बाथ असं म्हणतात. बाळंतिणीला बऱ्याचदा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. तो त्रास यामुळे कमी होतो. तसंच टाक्यांमुळे योनीच्या आतल्या भागात होणाऱ्या वेदनाही यामुळे कमी होतात. त्यामुळे गरोदरपणानंतर तुम्ही ही काळजी नक्की घ्या. 

हायड्रेटेड राहा

बाळंतिणीला आपली काळजी घेताना स्वतःला हायड्रेट ठेवणेही गरजेचे आहे. तुम्हाला आलेला थकवा जाण्यासाठी तुम्ही आहारामध्ये द्रव पदार्थांचा (After Delivery Diet In Marathi) जास्त समावेश करून घ्यायला हवा. तसंच बद्धकोष्ठता टाळण्यासाठी तुम्ही नियमित भरपूर पाणी प्यायला हवं. याशिवाय आहारामध्ये तुम्ही तंतुमय पदार्थांचा अधिक समावेश करून घेतल्यास, शरीर व्यवस्थित हायड्रेट राहाते. 

नियमित व्यायाम करा

बाळंतपणानंतर बाळंतिणीचे शरीर हे  थोडेसे सैलसर होते आणि काहीसे बेडौलपणादेखील येतो. अशावेळी काही शारीरिक हालचाल आणि व्यायामाची गरज असते. त्यामुळे तुम्ही हळूहळू हातापायांच्या हालचाली सुरू करा, उताणे झोपून पाय गुडघ्यात दुमडून सरळ वर खाली करणे, पाय सरळ सोडून ताठ बसून पायांचे अंगठे हाताच्या बोटांनी पकडणे असे व्यायाम खूपच लाभदायक होऊ शकतात. 

बऱ्याचदा महिलांना आपल्या शरीराच्या आकाराची जास्त काळजी असते. सध्याच्या जगामध्ये प्रत्येक स्त्री ला सुडौल दिसायचं असतं. पण मुळात बाळाला जन्म दिल्यानंतर लगेच सुडौल दिसण्याच्या मागे धाऊ नका. ते योग्य नाही. तुमची नॉर्मल डिलिव्हरी नसेल आणि जर सिझर असेल तर तुमचे टाके हे साधारणतः सहा महिने ओले असतात. त्यामुळे तुम्हाला सर्वात जास्त काळजी या काळात घ्यावी लागते. तुम्हाला त्याची जाण नसते. पण व्यायाम करण्याच्या मागे लगेच लागू नका. त्यामुळे तुमच्या शरीराचं नुकसानच होणार आहे. शरीराला गरोदरपणातील बदल भरून काढण्यासाठी किमान सहा महिने लागतात. शिवाय प्रत्येक स्त्री ची क्षमता ही वेगवेगळी असते हे समजायला हवं. यावेळी स्वतःला जास्त ताण देऊ नये. दुसऱ्यांकडून मदत घ्यावी. गुंतागुंतीची प्रसूती (Postnatal Care In Marathi) वा सिझर असल्यास आपल्याला रिकव्हर होण्यासाठी जास्त वेळ लागतो. व्यायाम करण्यासाठी शरीराला थोडा आराम द्या. साधारण सहा महिने झाल्यानंतर हलका व्यायाम करायला सुरुवात करा. हे तुमच्या आणि बाळाच्या दोघांच्याही आरोग्यासाठी चांगलं आहे.

गरोदरपणानंतर बाळंतिणीसाठी आवश्यक आणि योग्य आहार | Food After Delivery For Indian Mother In Marathi | After Delivery Diet In Marathi

Food After Delivery For Indian Mother In Marathi

बाळाला स्तनपानाची गरज असते. त्यामुळे बाळंतिणीला जेवणखाणं भरपूर खाल्लं (Pnc Diet In marathi) पाहिजे. बाळंतिणीनं किमान 3 वेळा जेवायला पाहिजे. त्यात पौष्टिक पदार्थही पाहिजेत. गरोदरपणानंतर गर्भाशय हे हळूहळू पूर्ववत होत असतं. पहिल्या सहा आठवड्यांमध्ये तुम्ही तुमच्या डॉक्टरांची निदान दोन ते तीन वेळा भेटायला हवं. कारण या काळामध्ये तुम्हाला ताप येणं, पोट साफ न होणं, जास्त रक्तस्राव होणं, पोटात दुखणं या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागतं. उपचारांनी या व्याधी बऱ्या होतात. पण त्यासाठी तुम्ही योग्य काळजी घ्यायला हवी. बाळाला लागणाऱ्या दुधासाठी तुम्हाला आवश्यक घटक हे आहारातूनच मिळत असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गरोदरपणानंतर काय खायचं आणि काय तुमच्यासाठी योग्य आहे हे तुम्हाला माहीत असायला हवं. त्यामुळे गरोदरपणानंतर स्त्री च्या नेहमीच्या गरजा भागवण्यासाठी कसा आहार असायला हवा हे जाणून घेऊया.

गरोदरपणानंतर सेक्स करणे चांगले की वाईट (Sex After Giving Birth In Marathi)

सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रसूतीनंतर लगेच लैंगिक संबंध ठेऊ नका. आपले टाके ताजे आणि तितकेच वेदनादायी असतात. शिवाय योनीला आजाराचं संक्रमण होण्याचीही शक्यता असते. शेवटच्या काही महिन्यांमध्ये सेक्स न केल्यामुळे दोघांनाही एकमेकांची ओढ असणार हे खरं आहे. पण शक्यतो मनावर नियंत्रण ठेवलेलं चांगलं. एकमेकांची काळजी या काळात घेणं जास्त गरजेचं आहे. त्यासाठी किस घेणं, मिठी मारणं किंवा एकमेकांच्या शरीराला ऊब देणं हेदेखील चांगलं आहे. अर्थात या गोष्टी तुम्ही गरोदर असतानाही करू शकता. पण संपूर्ण सेक्स हे साधारण तीन महिन्यांनी केलेलं चांगलं. गरोदरपणानंतर सेक्स करणे वाईट असं कधीही म्हणता येणार नाही. पण कोणत्याही प्रकाराचा आजार नको असेल तर, सेक्स तीन महिन्याने करणं योग्य आहे. बाळंतपणानंतर लगेचच सेक्स करून गर्भनिरोधक गोळ्या घेऊ नयेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही तणावाखाली राहू नये. अन्यथा बाळासाठी येणारं दूध बंद होतं.
डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी जास्तीत जास्त पाळता येतील याकडे कटाक्षाने लक्ष द्यावं

प्रश्नोत्तरे (FAQs)

प्रश्नः बाळंतिणीला डिलिव्हरीनंतर सकारात्मक विचाराचा काय उपयोग होतो?
उत्तरः गरोदरपणात आणि त्यानंतरही कायम सकारात्मक विचार करत राहण्याची गरज असते. कारण त्याचा सर्वात पहिला परिणाम होतो तो तुमच्या येणाऱ्या दुधावर. त्यामुळे तुम्ही सतत नेहमी सकारात्मक आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. गरोदरपणानंतर एक मानसिक औदासिन्य येत असतं. गरोदरपणाच्या काळात काही कारणाने मानसिक ताण निर्माण झाला असेल तर नंतर मानसिक औदासिन्य येण्याची शक्यता असते. त्यामुळे सकारात्मक विचार ठेवल्यास, हे ताणतणाव आपोआप दूर ठेवण्यास मदत होते.

प्रश्नः बाळंतपणानंतर डॉक्टरांची किती वेळा भेट घ्यावी?
उत्तरः गरोदरपणानंतर गर्भाशय हे हळूहळू पूर्ववत होत असतं. पहिल्या सहा आठवड्यांमध्ये तुम्ही तुमच्या डॉक्टरांची निदान दोन ते तीन वेळा भेटायला हवं. कारण या काळामध्ये तुम्हाला ताप येणं, पोट साफ न होणं, जास्त रक्तस्राव होणं, पोटात दुखणं या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागतं. उपचारांनी या व्याधी बऱ्या होतात. पण त्यासाठी तुम्ही योग्य काळजी घ्यायला हवी. 

प्रश्नः बाळंतिणीने कसा शेक घ्यावा?
उत्तरः गरोदरपणाच्या काळामध्ये आपल्या शरीरातील वात हा बिघडलेला असतो आणि त्यासाठीच गरोदरपणानंतर शेक घेणं गरजेचं असतं. वाताच्या शीत आणि रूक्ष गुणाला मारण्यासाठी तेलाचं मालिश करून हा शेक घ्यायला हवा. शिवाय तुम्ही यावेळी तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंब वा निर्गुडीचा पालादेखील घालू शकता. तुमची प्रकृती चांगली होण्यासाठी या नैसर्गिक गोष्टी तुम्हाला मदत करतात. निदान सव्वा महिना अंगाला तेल मालिश करूनच मग आंघोळ करावी. केवळ बाळालाच नाही तर तुमच्या शरीरालादेखील याची गरज असते. तुमची नॉर्मल डिलिव्हरी झाली असल्यास, कोमट पाण्याने योनीमार्ग स्वच्छ करावा. पण जर सिझर असेल तर असं करू नये. 

निष्कर्ष – बाळंतिणीने बाळ झाल्यावर काय काळजी (Pregnancy Nantar Ghyaychi Kalji) घ्यायला हवी. डिलिव्हरीनंतर कोणते डाएट (After Delivery Diet In Marathi) असायला हवे, काय काय खायला हवे (Food After Delivery For Indian Mother In Marathi),  सव्वा महिना म्हणजे किती दिवस आणि तोपर्यंत डिलिव्हरी झाल काय करायला हवे (Delivery Zalyavar Kay Karave) या सगळ्याची इत्यंभूत माहिती आम्ही तुम्हाला या लेखातून दिली आहे.

Read More From लाईफस्टाईल