चेहऱ्यावरील नको असलेले केस लपवण्यासाठी आणि त्वरीत चमकदार त्वचा मिळण्यासाठी सर्वात सोपा उपाय वापरण्यात येतो तो म्हणजे ब्लिचिंग. ब्लीच करणं जितकं सोपं आहे तितकेच त्याचे परिणामही आहेत. सोपं असल्याने घरच्या घरी ब्लीच करण्याला मुली सहसा प्राधान्य देतात. पण तुम्ही जर घरी ब्लीच करत असाल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. ब्लिचिंग नेहमी करणं हे खरं तर तुमच्या त्वचेसाठी चांगलं नाही. पण काहीच उपाय नसेल तर ब्लिचिंग करायला काहीच हरकत नाही. ब्लिचिंग कधीतरी करणं हे नक्कीच ठीक आहे. पण ते करतानाही तुमच्या त्वचेला त्याची काही हानी पोहचत नाही ना याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. ब्लिचिंग करताना नक्की काय काळजी घ्यायची आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे जाणून घेऊया –
#DIY: नैसर्गिकरित्या त्वचा अधिक सुंदर बनवण्यासाठी (Coffee Face Scrub In Marathi)
योग्य ब्लीच निवडा
Shutterstock
ब्लीच वेगवेगळ्या कंपनीचे, ब्रँड्स आणि स्किन टोनसाठी बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तुमची त्वचा कशी आहे आणि तुमचा स्किन टोन काय आहे याप्रमाणे तुम्ही ब्लीच निवडण्याची गरज आहे. ब्लीच निवडताना नक्की कसं निवडायचं असा प्रश्न पडणं साहजिक आहे. तर त्यासाठी तुम्ही तुमच्या बोटावर थोडंसं ब्लीच काढून घ्या आणि कानाच्या मागे लावा. जर तुम्हाला काही वेळात कानाच्या मागे खाज आली अथवा जळजळ जाणवू लागली तर तुमच्या त्वचेसाठी हे ब्लीच योग्य नाही. तुमची त्वचा संवेदनशील असेल आणि तुम्हाला ब्लीचचा वापर करायचा असेल तर तुम्ही हे नक्कीच आधी करून पाहायला हवं. त्यानंतरच तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर ब्लीच वापरू शकता. अन्यथा तुमच्या चेहऱ्यावर जळजळ होऊन चेहऱ्यावर रॅश येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ब्लीच लावण्याची योग्य पद्धत
ब्लीच करताना तुम्ही हाताच्या बोटांचा वापर करू नका. त्याजागी तुम्ही स्मूथ ब्रश वापरा आणि त्याचा वापर तुमच्या चेहऱ्यावर ब्लीच लावण्यासाठी करा. असं केल्याने तुमची नखं आणि हात दोन्ही स्वच्छ आणि साफ राहतील. तसंच बोटांपेक्षाही ब्रशने तुमच्या चेहऱ्यावर योग्य तऱ्हेने स्प्रेड होण्यास मदत होते. ब्लीच केवळ चेहऱ्यावर लावू नका. तर ब्लीच लावताना तुम्ही ते तुमच्या गळा आणि मानेचा भागही पूर्ण कव्हर करणं आवश्यक आहे. याचं कारण असं आहे की, तुमच्या चेहऱ्यावप्रमाणेच तुमचा स्किन टोन मान आणि गळ्यावरही सारखाच दिसावा. त्यामुळे ब्लीच लावण्याची ही योग्य पद्धत आहे. चुकीची पद्धत वापरून ब्लीच केल्यास तुमच्या स्किन टोनमध्ये फरक दिसू शकतो.
हिवाळ्यातही त्वचा चमकदार दिसण्यासाठी वापरा Best Makeup Tips
ब्लीच करण्यापूर्वी घ्या अशी काळजी
Shutterstock
ब्लीच करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं हे अनिवार्य आहे. तुम्ही ब्लीच करण्यापूर्वी चेहऱ्याला फेसवॉश लावून स्वच्छ धुवा. त्यानंतर प्री – ब्लीच क्रिम लावून हलक्या हातांना साधारण 10 मिनिट्स मसाज करा. जेव्हा तुमची त्वचा मऊ आणि स्वच्छ झाल्याचं तुम्हाला वाटेल तेव्हा एका लहान वाटीमध्ये 1 ते 2 लहान चमचे ब्लिचिंग क्रिम काढून घ्या आणि त्यामध्ये 1-2 थेंब अॅक्टिव्हेटर मिसळून घ्या. लक्षात ठेवा की, याचं प्रमाण अधिक होऊ देऊ नका. कारण अॅक्टिव्हेटरचं प्रमाण जास्त झालं तर तुमच्या चेहऱ्याला नुकसान पोहचू शकतं.
15 मिनिट्स नंतर धुवा चेहरा
Shutterstock
तुम्ही लावलेलं ब्लीच हे 10 – 15 मिनिट्सनंतर ताज्या आणि थंड पाण्याने धुवा. चेहरा मऊ आणि मुलायम राहण्यासाठी तुम्ही कॉटनच्या कपड्याने अथवा टिश्यू पेपरने चेहरा पुसून घ्या. ब्लीच केल्यानंतर तुम्ही पोस्ट ब्लीच क्रिम हातात घेऊन चेहरा, मान आणि गळ्यावर मसाज करून घ्या. तुम्ही इतकं करून झाल्यावर मेकअपसाठी नक्कीच तयार झालात असं समजा. कारण हे केल्यानंतर तुम्हाला त्वरीत चमकदार चेहरा मिळतो.
चमकदार त्वचा हवी असल्यास करा घरगुती फेसपॅकचा (Homemade Facepack) वापर
अशावेळी करू नका ब्लीच
तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स अथवा पुळ्या आल्या असतील तर तुम्ही चुकूनही ब्लीचचा वापर करू नका. असं केल्याने तुम्हाला इन्फेक्शन होऊन तुमची समस्या वाढण्याची शक्यता आहे. तसंच थ्रेडिंग, अपरलिप आणि फोरहेड जर तुम्ही केलं असेल तर अशावेळीदेखील तुम्ही ब्लीचचा उपयोग करू नका. असं केल्यास अधिक जळजळ होऊन चेहऱ्यावर अधिक पुळ्या येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.