लाईफस्टाईल

सेक्स करताना मनात हमखास येतात ‘हे’ प्रश्न, तुम्हालाही पडतात का?

Anonymous  |  Jan 23, 2019
सेक्स करताना मनात हमखास येतात ‘हे’ प्रश्न, तुम्हालाही पडतात का?

आपल्याकडे सेक्सबद्दल फार उघडपणाने बोलले जात नाही. ते बोलणं अजूनही काही लोकांना पाप  वाटतं किंवा मग संस्काराच्या बाहेरचं. लाखोवेळा जरी ओरडलो की, सेक्स ही आयुष्याची गरज आहे. तरी लोक तुमच्याकडे अशा  नजरांनी पाहतात की तुम्ही काहीतरी मोठा गुन्हा करत आहात. मग काय सेक्सबद्दल  जाणून घेण्याची काही इच्छा असेल तर इंटरनेटची मदत घ्यावी लागते. तुम्हाला माहीत आहे का? सेक्स करताना आपले मन कधीच शांत नसते. कितीतरी प्रश्न आपल्याला नेमके त्याचवेळी पडतात. सेक्स करुन झाल्यानंतर आपल्याला असा विनोदी प्रश्न कसा पडू शकतो? असा आणखी एक प्रश्न पडतो आणि आपल्याला हसूच येते. आता तुम्हाला उत्सुकता असेल की हे प्रश्न नेमके कोणते? ते बघणारच आहोत पण त्याहीपेक्षा हे प्रश्न आल्यानंतर त्याचा तुमच्या सेक्सवर किती परीणाम होऊ शकते ते पण वाचा.

मी बरोबर करतो / करतेय ना?

सगळा मूड सेट असताना आणि सेक्स सुरु झाल्यानंतर मनात पहिला येणारा प्रश्न  म्हणजे हे बरोबर आहे का? म्हणजे जे काय सुरु आहे ते बरोबर आहे ना? व्हिडिओमध्ये असचं काही दाखवलं होतं. पण प्रॅक्टिकली हे बरोबर आहे का? असा विचार अनेकांच्या मनात डोकावतो. विशेषत: मुलांना पडतो. कारण त्यांना नेहमी असं वाटतं की, सेक्स ही गोष्ट पुरुष लीड करत असतात. त्यामुळे त्यांना त्यावेळी मी परफेक्ट आहे असं दाखवायचं असतं त्यामुळे सेक्स करेपर्यंत आणि ते होईपर्यंत दोघांच्या मनात हे विचार असतात.

पुरुषांच्या सेक्स फॅन्टसी माहीत आहेत का? 

यावेळी गेल्यावेळेपेक्षा जास्त व्हायला हवं

चूक किंवा बरोबर हे ठरतं नाही तर लगेच दुसरा प्रश्न मनात येतो तो यावेळी थोडा जास्तवेळ सेक्स करायला हवं त्यासाठी काहीतरी नवीन ट्राय करायला हवं.. सेक्सपेक्षा सेक्स आधीचा फोर प्ले महत्वाचा असतो.  तो फोर प्ले तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत एन्जॉय करा. सेक्स कितीवेळ करायला हवे यासाठी काही प्रमाण वेळ ठरविण्यात आलेली नाही. तुमचा पार्टनर तुमच्या सेक्स मुव्हजमध्ये आनंदी असेल तर सेक्सचा मनमुराद आनंद लुटा हा प्रश्न सोडून द्या.

male orgasm म्हणजे काय?

नवी पोझीशन ट्राय करायची का?

सेक्स अधिक चांगले करण्यासाठी नवी सेक्स पोझीशन ट्राय करायची अनेकांना हौस असते. पण नवी सेक्स पोझीशन तिला/त्याला आवडेल का? आता या सेक्स पोझीशनसाठी कसं विचारायचं? असे प्रश्न पडायला लागतात. पण ते विचारण्यापेक्षा केलेले चांगले असते. कारण अशा विचारण्याने समाेरच्याच्या मनातही प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात होते. म्हणून विचारु नका तर करा. कारण त्यातच तर आयुष्याची मजा आहे.

Also Read Sexual Fun Ideas In Marathi

मी थोडं आणखी चांगले करण्यासाठी काय करु?

सेक्स सुरु असतानाच त्यात प्रणयाची आणखी फोडणी घालण्यासाठी बरीच जण काय- काय करतात. म्हणजे कान चावणे, मानेला चावणे, ओठांना चावणे असे बरेच काही केले जाते. पण सेक्स चांगले करण्यासाठी हे जरा जास्तच होत नाही ना? म्हणजे मी चावतेय पण ते दात लागले तर??  चावताना जास्त काही झालं तर त्याला काय वाटेल. किंवा मग मुलींना त्यांची नखं पार्टनरच्या पाठीवर मारण्याची सवय असते. आता ते काही वेगळे सांगायला नको पण ते करतानाही नखे चांगली आहेत का? हे पाहण्यासाठी एकदा तरी नजर हातांच्या बोटाकडे जाते.

हे सगळं जीममधल्या व्यायामसारखे आहे नाही का?

हा हा हा आता जीम जाणाऱ्यांना हा प्रश्न पटकन क्लीक होईल. कारण सेक्स म्हणजे एक प्रकारचा व्यायाम आहे नाही का? म्हणजे सेक्समधील प्रत्येक पोझिशनमध्ये हात-पाय अशापद्धतीने हलवावे लागतात की, जीममधला अर्धा व्यायाम सेक्सवेळी केला जातो आता हा प्रश्न अगदीच हसू आणणारा आहे. विनोदाचा भाग सोडला तर पण हा प्रश्न अनेकांना पडतो. त्यातल्या जात जर तुम्ही नेहमी जीमला जाणारे असाल तर तुम्हाला सेक्स पोझीशन आणि व्यायाम आठवायला लागतात.

९ मुलींनी शेअर केले त्यांचे सिक्रेट, जाणून घ्या काय आहे हे सिक्रेट

 

मला गुदगुल्या का होतायत?

सेक्सवेळी शरीर एकमेकांच्या इतके जवळ असते की, गुदगुल्या होणे स्वाभिक असते. विशेषत: पोटाकडील भागाकडे गुदगुल्या होऊ लागतात. पण अनेकजण इतका विचार करायला लागतात की, मला गुदगुल्या होतायतं किंवा मला काहीतरी वेगळचं होत आहे. असं मलाच होत की, सगळ्यांना होते? आता गुदगुल्या होतायत हसायला येत आहे काय करायचं हसायचं का? हसलं की सगळ्या मूडचा विचका होईल.

आवाज जरा जास्तच नाही ना?

सेक्सच्यावेळी भावना प्रकट करताना आवाज येतोच आता लगेच पॉर्नमधील आवाज आठवू नका. पण एखादा आवाज आपल्या तोंडून निघत असेल तर तो जास्त नाही ना? किंवा विचित्र नाही ना की समोरच्याचा सेक्सचा मूडच निघून जाईल. त्यामुळे जे बेडवर होतय ते चांगल्यासाठी होत आहे हा विचार करुन आहे तो क्षण एन्जॉय करा.

माझ्या पायाचे केस तर दिसत नाही ना?

मुलांपेक्षा सगळ्यात जास्त प्रश्न कोणाला पडत असतील ते मुलींना… कारण  प्रत्येकवेळी त्यांना चांगले दिसायचे असते. सेक्स करतानासुद्धा. हातापायावर असलेले केस नकोसे होतात.त्यात जर वॅक्स करुन महिना झाला असेल तर ते केस पार्टनरला दिसत नाही हा प्रश्न पडतो. मग पायावरुन हळूहळू एक एक अवयव दिसायला लागतो. मुलांच्या अंगावरील केल एखाद्यावेळी चालू शकतात, असे पण मुलींचे अंग हे नेहमी तुळतुळीत दिसायला हवे, अशी मुलींचीच अपेक्षा असते. मग काय अंडरआर्म्समधील केसही त्यांना विचित्र वाटू लागतात आणि मग त्याचाच अधिक विचार करायला लागतात.

उदा. अरे यार आज सेक्स होणार हे माहीत असतं तर थोडी तयारी केली असती. वॅक्स नाही पण रेझरने काम चालवलं असतं. 

माझे पोट तर दिसत नाही ना?

अनेक जण वेगवेगळ्या सेक्स पोझीशन ट्राय करुन पाहत असतात. या सगळ्या पोझीशनमध्ये आपल्याला परफेक्ट दिसायचे असते. म्हणजे बेडवर सेक्सीच दिसायला प्रत्येकाला हवे असते. त्यातच जर थोडं पोट असेल तर मग सारखं लक्ष पोटाकडे जाते. मी जाड तर दिसत नाही ना? असे अनेक प्रश्न येतात.त्यातच जर आजुबाजूला आरसा असेल तर मग काय विचारायलाच नको कारण मग सारखे लक्ष आरश्यात जाते. एकदा आरसा दिसल्यावर मग सगळच दिसायला लागतं फेस फॅट, आर्म फॅट सगळ काही दिसायला लागतं.

उदा. उद्यापासून मी जीमला जायला सुरुवात करणार आहे.  इतरवेळी नाही पण सेक्स करताना तरी मी सेक्सी दिसायला हवे. थोडं पोट वाढलं आहे ते उदयापासून कमी करायला घेईन.

माझ्या परफ्युमचा सुगंध चांगला आहे ना?

सेक्स  करताना दोघांनाही समोरच्याला जास्त चांगलं वाटावं असं वाटत असतं.त्यासाठी बरचं काही काही केले जाते. परफ्युम ही अशी गोष्ट असते की, ती सेक्स करताना तुमचा मूड चांगला करते. पण जर तुमचा परफ्युम चांगला नाही असे तुम्हाला सारखं वाटत राहिले तर मग प्रेम करण्याचा तुमचा दिवस नाहक वाया जाईल.

आज कसं झालं विचारायचे का?

इतकी मेहनत करुन सगळे करुन झाल्यानंतर जेव्हा दोघांच्या एकांताची वेळ येते. तेव्हा पुन्हा एकदा आपले मन प्रश्नांनी भरुन जाते. आता सेक्स झाल्यानंतर चांगले झाले का? आज कसं वाटलं अस एकमेकांना प्रश्न विचारायची इच्छा असते. पण ते विचारायचं कसं ते कळत नाही. मग काय पुन्हा पुढची वेळ येईपर्यंत आणखी नवे प्रश्न निर्माण होतात.

त्याला मी आवडते ना?

मुलींची विचार करण्याची पद्धत फारच वेगळी असते. सगळं झाल्यानंतर त्यांना आनंद तर झालेला असतो. पण त्यांना त्या नंतरही ते क्षण आठवून खूप प्रश्न पडतात. त्याला मी नक्की आवडते ना?  त्याचे माझ्यावरील प्रेम कमी तर झाले नाही ना? असे काहीतरी वेड्यासारखे प्रश्न पडायला लागतात. पण असे प्रश्न पडून देऊ नका. कारण त्याचा तुमच्या नात्यावर परीणाम होत असतो आणि स्वाभाविकपणे तुमच्या सेक्स लाईफवरही.

 (फोटो सौजन्य-Instagram, gipfy)

You might like this:

First Time Sex Stories From Real Women Losing Virginity

Read More From लाईफस्टाईल