Care

रविना टंडन केसांची निगा राखण्यासाठी करते ‘हा’ घरगुती उपाय

Trupti Paradkar  |  Sep 28, 2020
रविना टंडन केसांची निगा राखण्यासाठी करते ‘हा’ घरगुती उपाय

केस गळणं अथवा अर्धवट तुटणं ही एक फारच गंभीर समस्या सध्या अनेकांना सतावत आहे. केस गळण्याची कारणं अनेक असू शकतात. मात्र त्यावर उपाय करण्यासाठी तुम्ही नेहमीच पाण्यासारखा पैसा खर्च करता. मात्र असं करूनही फायदा होतोच असं नाही. बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडनने नुकत्याच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने गळणाऱ्या केसांसाठी एक खास उपाय शेअर केला आहे. हा उपाय तुम्ही अगदी घरच्या घरी करू शकता. कारण यासाठी लागणारी गोष्ट अनेक वर्षांपासून तुमच्या परिचयाची आहे. हा उपाय अगदी प्राचीन काळापासून भारतीय महिला त्यांच्या सौंदर्यात वाढ करण्यासाठी वापरत आलेल्या आहेत. 

Instagram

हा आहे रविनाचा हेअर फॉर्म्युला

रविनाने सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करत असं शेअर केलं आहे की, “आजकाल सर्वजण केस गळण्याच्या समस्येमुळे त्रस्त असतात.  टेंशन, स्ट्रेस, चुकीचा शॅम्पू वापरणं, पाण्यात केमिकल्स असणं अशी अनेक कारणं या समस्येमागे असू शकतात. मात्र केसांना मजबूत आणि सुंदर करण्यासाठी आवळ्यापेक्षा चांगलं काहीच असू शकत नाही. केसांसाठी आवळा एक प्रकारे वरदानच आहे ” यासोबतच रविनाने या व्हिडिओमध्ये एक छान हेअर फॉर्म्युला सर्वांसोबत शेअर केला आहे. तिने शेअर केलं आहे, “जर तुमचे केस निस्तेज आणि कमजोर झाले असतील तर तुम्ही दररोज आवळा चावून खायला हवा ज्यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य नक्कीच सुधारेल. शिवाय तुम्ही आवळ्याचा वापर थेट तुमच्या केसांमध्येही करू शकता. यासाठी सहा आवळे दूधामध्ये उकळून घ्या. ते स्मॅश करा आणि त्यातील बिया काढून टाका. दूध आणि आवळा यांचे मिश्रण एकजीव करा. यापासून तयार झालेली जाडसर पेस्ट केसांच्या मुळांमध्ये लावा. काही मिनीटांनी केस कोमट पाण्याने धूवून टाका. केसांमध्ये कमीतकमी पंधरा मिनीटे ही पेस्ट ठेवा” 

आवळ्याचा केसांवर काय परिणाम होतो –

आवळा केसांसाठी अगदी वरदान ठरू शकतं.आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ई, थेनिन, फॉस्फरस, लोह, कॅल्शिअम असतं. यातील व्हिटॅमिन ई मुळे केस लांब आणि मजबूत होतात, व्हिटॅमिन सीमुळे तुमचा स्काल्प निरोगी राहतो आणि पोषक घटकांमुळे केसांमध्ये कोंडा होत नाही. केसांच्या संपूर्ण आरोग्यासाठी आवळ्याचा फायदा होऊ शकतो.  कारण त्यामध्ये केसांसाठी उपयुक्त असे पोषक घटक मुबलक असतात. आवळ्यामधील क्लिझिंग घटकांमुळे केस मुळांपासून स्वच्छ होतात. केसांना चमक येते आणि ते सिल्कप्रमाणे मुलायम होतात. तुम्ही आठवड्यातून कमीत कमी एक ते दोन वेळा केसांवर आवळ्याचा उपाय करायला हवा. ज्यामुळे काहीच महिन्यांमध्ये तुमचे केस मजबूत आणि घनटाट होतील. आवळ्याचा वापर केसांवर अनेक प्रकारे केला जातो. मात्र रविना टंडनने शेअर केलेला हा हेअर फॉर्म्युला उपयुक्त आणि सहज करता येण्यासारखा आहे. त्यामुळे तुम्हीदेखील तो तुमच्या केसांचे आरोग्य वाढवण्यासाठी नक्कीच ट्राय करू शकता. 

फोटोसौजन्य – इंन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

अधिक वाचा –

केसांचे आरोग्य राखण्यासाठी ट्राय करा हे सल्फेट फ्री शॅम्पू (Best Sulphate Free Shampoo)

तुमचेही केस कोरडे आहेत का? मग हे शॅम्पू तुमच्यासाठी आहेत बेस्ट (Shampoo For Dry Hair)

कोरड्या आणि निस्तेज केसांची पावसाळ्यात अशी घ्या काळजी

Read More From Care