DIY सौंदर्य

रविनाने सांगितलेल्या टिप्सने करा हाताचा कोरडेपणा दूर

Dipali Naphade  |  Oct 18, 2020
रविनाने सांगितलेल्या टिप्सने करा हाताचा कोरडेपणा दूर

मुंबईत तसं पाहायला गेलं तर थंडी जास्त नसते. पण काही लोकांंना जरासा गारवाही त्वचेवर कोरडेपणा आणण्यासाठी कारणीभूत ठरतो. बऱ्याचदा हातांना जास्त कोरडेपणा येतो. हाताला मॉईस्चराईज करणे अथवा हँड क्रिमचा वापर करणे असे अनेक उपाय आपण करत असतो. पण अशावेळी नक्की काय काळजी घ्यायची आणि हाताचा कोरडेपणा कसा दूर करायचा याविषयी अभिनेत्री रवीना टंडनने काही सोपे उपाय सांगितले आहेत. तुम्हीही हे उपाय वापरून हाताचा कोरडेपणा दूर करू शकता. हाताचा कोरडेपणा दूर करण्याचा सोपा आणि परिणामकारक उपाय रविनाने आपल्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे. 

ज्यांची त्वचा कोरडी असते त्यांना आपल्या त्वचेची काळजी घेण्यात खूपच समस्या येतात. कारण कोणंतही क्रीम किंवा मॉईश्चराईजर जास्त काळाकरिता त्यांच्या त्वचेवर टीकत नाही. जी खूपच मोठी समस्या आहे. कोरड्या त्वचेसाठी लोकं अनेक प्रकारची ब्युटी प्रॉडक्ट्स् वापरतात, पण काही कालावधीनंतर त्याचा परिणाम दिसेनासा होतो आणि त्यांची त्वचा पुन्हा कोरडी होऊ लागते. त्यामुळे त्यांना कळत नाही की, नक्की काळजी कशी घ्यावी. त्यामुळे घरच्या घरी करता येणारा असा हा अत्यंत सोपा उपाय रविनाने सांगितला आहे आणि हा फायदेशीर आणि उपयुक्तदेखील आहे. 

DIY Body Mask: त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी वापरा घरगुती बॉडी मास्क

मुलायम हातांसाठी उत्कृष्ट घरगुती उपाय

हातांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी कशा प्रकारे काळजी घ्यायची आणि त्याचा कसा वापर करायचे हे रविनाने आपल्या व्हिडिओमधून सांगितले आहे. त्याची स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. MyGlamm चे वाईपआऊट वापरून हाताची स्वच्छता राखू शकता आणि कोरडेपणा कमी करू शकता. 

त्वचा कोरडी होत असेल तर वापरा या 7 सोप्या टिप्स

का वापरावे ऑलिव्ह ऑईल?

Shutterstock

ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अँटिइन्फ्लेमेटरीचे गुण आढळतात. तसंच ऑलिव्ह ऑईल हे त्वचेला चांगल्या तऱ्हेने मॉईस्चराईज करते. यामध्ये असणारे विटामिन ई हे त्वचेमधील कोरडेपणा त्वरीत दूर करण्यासाठी मदत करते. त्यामुळे हाताचा कोरडेपणा दूर करण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. तुम्हाला हा उपाय अत्यंत सोपा  आहे आणि घरच्या घरी करता येतो आणि अगदी खिशाला परवडण्याजोगा आहे. तुम्ही काम करता करतादेखील हाताचा मसाज करून आपल्या हातांची काळजी घेऊ शकता. 

कोरड्या त्वचेला म्हणा Bye… करा असे 6 घरगुती उपाय

 

नारळाच्या दुधाचाही करू शकता वापर

Shutterstock

कोकोनट मिल्क म्हणजेच नारळाचं दूध दूध त्वचेत खोलवर जाऊन मॉईश्चराईज करून पोषण देतं. कोकोनट मिल्कच्या वापराने अनेक तास तुमची त्वचेतील आर्द्रता कायम राहते. नियमितपणे सकाळा त्वचेला नारळाचं दूध लावल्यास संध्याकाळपर्यंत त्वचेची आर्द्रता कायम राहते. तसंच हा घरगुती आणि अत्यंत फायदेशीर असा उपाय आहे. तुम्ही कधीही हा उपाय  पटकन करू शकता आणि हाताचा कोरडेपणा घालवू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

 

Read More From DIY सौंदर्य