Love

वयाने मोठ्या असलेल्या मुलींकडे का होतात मुलं आकर्षित, काय आहे कारण

Dipali Naphade  |  Feb 22, 2020
वयाने मोठ्या असलेल्या मुलींकडे का होतात मुलं आकर्षित, काय आहे कारण

प्रेम कधी, कुठे,  कोणावर आणि का होईल याचा अंदाज लावणं कठीण आहे. प्रेमाला वय, जात, धर्म काहीच नसतं असं नेहमीच म्हटलं जातं. पण सध्या पाहिलं तर आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या मुलीच्या प्रेमात मुलं असल्याचं प्रमाणही वाढल्याचं  दिसून येत आहे. अभिषेक – ऐश्वर्या, प्रियांका – निक, मलायका – अर्जुन, कुणाल खेमू – सोहा अली खान या जोड्यांमधील अंतर आपल्याला माहीतच आहे. लग्न करताना अगदी पूर्वीपासून काही परंपरा चालत आल्या आहेत. पण या सर्वांना त्या परंपरा मोडीत काढत प्रेमाला महत्त्व दिल्याचं दिसून आलं आहे. मुलीचं वय कितीही मुलापेक्षा लहान असेल तर त्याचा इतका इश्यू होत नाही पण मुलगी मुलापेक्षा मोठी असेल तर मात्र त्याचा इश्यू करण्यात येतो. मुलगी लवकर थोराड दिसू लागते त्यामुळे आपल्या वयापेक्षा मोठ्या मुलाशी तिने लग्न करावं इतकंच त्यामागचं कारण आहे. पण आता ही संकल्पना बदलू लागली आहे. आता मोठ्या वयाच्या मुलींंशीही लग्न करण्यात येत आहे. पण मुळात मोठ्या वयाच्या मुलींकडे मुलं आकर्षिक का होतात असा प्रश्नही आता निर्माण होऊ लागला आहे. तर त्याची काही महत्त्वाची कारणे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घेऊया काय आहेत ही कारणे – 

आकर्षकता

मोठ्या वयाच्या महिला या अधिक आकर्षक असल्याचं मानलं जातं. तसंच त्यांना जीवनाचा जास्त अनुभव असतो.  त्यांचं आधी लग्न झालं असेल तर त्यांना अधिक चांगला अनुभव असतो असंही समजण्यात येतं. त्यामुळे आपल्या जोडीदाराची काळजी घेत त्यांना अधिक चांगल्या तऱ्हेने त्या आनंदी ठेवू शकतात असाही समज आहे. तसंच वय वाढू लागल्यावर महिला स्वतःला अधिक आकर्षक ठेवू लागतात असंही सांगण्यात येतं. त्यामुळे त्यांच्यापेक्षा लहान असलेली मुलं ही त्यांच्याकडे जास्त आकर्षित होतात.

अर्जुन कपूरशी ख्रिश्नन लग्नाबद्दल मलायका अरोराचा खुलासा
 

जबाबदारीची जाणीव

लहान मुलींचा अवखळपणा सहसा झेलणं हे मुलांना आवडत नाही. त्यांना जबाबदार असणाऱ्या महिला जास्त आवडतात. मोठ्या वयाच्या महिलांना जबाबदारी म्हणजे नक्की काय आणि आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या व्यक्तींना कसं सांभाळायचं याचं व्यवस्थित ज्ञान असतं. आपल्या स्वतःच्या जबाबदारीसह त्या आपल्या जोडीदाराचीही जबाबदारी लिलया पेलतात. त्यामुळे हे एक महत्त्वाचं कारण मोठ्या वयाच्या  महिलेकडे आकर्षित होण्याचं आहे. अशा जबाबदार असणाऱ्या महिलांकडे मुलं लवकर आकर्षित होतात. मग मुलं त्यामध्ये त्यांच्या वयाकडे जास्त लक्ष देत नाहीत. त्या आपल्याला आणि इतरांना जबाबदारीने सांभाळू शकतील यांची त्यांना पूर्ण कल्पना असते आणि त्यामुळेच मुलांना अशा मुलींशी लग्न करण्यात जास्त इंटरेस्ट असतो. 

निकचं चुकीचं वय सांगितल्याने पुन्हा एकदा प्रियांका चोप्रा झाली ट्रोल

जास्त मॅच्युरिटी अर्थात समंजसपणा

मुलं स्वतः कितीही असंमजस असली तरीही त्यांना  आपल्यापेक्षा अधिक समंजस असणारी मुलगी जोडीदार म्हणून हवी असते. तसंच आपल्या प्रत्येक गोष्टीची काळजी समोरची व्यक्ती घेऊ शकेल अशी त्यांची मुलीकडून अपेक्षा असते. मोठ्या वयाच्या मुली या बऱ्यापैकी समजूतदार असतात. प्रत्येक लहानसहान गोष्टीत भांडण करत बसणं त्यांना योग्य वाटत नाही. त्याशिवाय आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलांना त्या व्यवस्थित सांभाळून घेतात त्यामुळे मुलं अशा महिलांकडे अर्थात आपल्यापेक्षा वयाने जास्त मोठ्या असणाऱ्या मुलींकडे आकर्षित होत आहेत. 

बॉलीवूडमधील हे सेलिब्रिटी आहेत यंग.. जाणून घ्या त्यांचे वय

पैसे वाचवण्यातही माहीर

मोठ्या वयाच्या मुलींना पैसे व्यवस्थित वाचवता येतात. त्याशिवाय काय चांगलं आणि काय वाईट याचीही जाण  त्यांना अनुभवांमुळे मिळालेली असते. त्यामुळे लग्न झाल्यानंतरही व्यवस्थित संसार करून काटकसरीत आणि योग्यरित्या अशा मुली संसार करतील याची कल्पना मुलांना असते. मुलींचा स्वभाव बघून मुलं त्यांच्याकडे आकर्षित होत असतात. त्यांना त्यासाठी त्यांच्या वयाचा विचार करायचा नसतो. कोणता खर्च करायचा आणि कोणता खर्च नाही करायचा हे या मुलींना योग्यरित्या माहीत असतं. उगीच पैसा मिळत आहे म्हणून तो उधळायचा असं या मुली करत नाहीत याची पूर्ण कल्पना मुलांना असल्यामुळेच मुलं आपल्यापेक्षा मोठ्या मुलींच्या प्रेमात जास्त पडताना सध्या दिसून येत आहे. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

Read More From Love