सेक्स हे सुखी आयुष्याचं एक गमक आहे असं म्हटलं जातं आणि ते खरंदेखील आहे. तुमचं सेक्स लाईफ चांगलं असेल तर तुमच्या नात्यातील गोडवादेखील टिकून राहतो. पण बऱ्याचदा सेक्स करताना तुम्हाला दुखतं. मग याची नक्की कारणं काय आहेत? यावर नक्की काय उपाय करायला हवा तेदेखील जाणून घ्यायला हवं. तुम्हाला सेक्स करताना जास्त त्रास होत असेल अथवा तुम्ही सेक्सचा आनंद घेतानाही तुम्हाला दुखत असेल तर तुम्ही तुमचा संकोच सोडून याबद्दल बोलणं अत्यंत गरजेचं आहे. याची नक्की काय कारणं आहेत हे कधीकधी समजत नाही. तसंच संकोच असल्याने काही जण डॉक्टरांकडेही जात नाहीत. त्यामुळे तुम्हाला याची कारणं जाणून घेऊन नक्की यावर काय करता येऊ शकतं हे तुम्हाला माहीत असायला हवं.
1. Vagina मध्ये रबिंग फील होणं
Shutterstock
इंटरकोर्स दरम्यान जर तुम्हाला व्हजायनामध्ये रबिंग फील होत असेल तर तुम्ही सेक्समध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह आहात हे समजू शकतं. पण तुम्हाला याचा त्रास होत असेल तर या त्रासापासून वाचण्यासाठी तुम्ही काही दिवस सेक्स न करणंच योग्य आहे. त्यामुळे तुम्हाला होणारा त्रास कमी होईल. तसंच तुम्हाला हा त्रास होत असेल तर तुम्ही काही दिवस घट्ट कपडे घालणं टाळा. त्यामुळे हा त्रास बरा होण्यास मदत होईल.
2. कोरडेपणा
व्हजायनामध्ये खूपच कोरडेपणा आला असेल तर सेक्स करताना तुम्हाला या त्रासाला सामोरं जावं लागतं. बऱ्याचदा हा कोरडेपणा तणाव, ताण आणि आपल्यातील हार्मोन्स बदलामुळे आलेला असतो. तसंच आपली येणारी मासिक पाळीही यासाठी काही प्रमाणात जबाबदार असते. तुम्हाला जर मासिक पाळी येणार असेल तर दोन तीन दिवस आधी परिस्थिती उद्भवते. हा कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे मेडिकेटेड क्रिम, लोशन अथवा ल्युब्रिकंटचा वापर करू शकता. तसंच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सेक्स करण्याआधी फोरप्लेचा आनंद घेणं गरेजचं आहे अन्यथा या कोरडेपणाचा त्रास होऊ शकतो. फोरप्लेमुळे तुमची व्हजायना ओली होण्यास मदत होते. कारण पेनिट्रेशन होण्यापूर्वी तुमची व्हजायना ओली असणं अत्यंत गरजेचं असतं अन्यथा तुम्हाला सेक्स करताना त्रास होतो.
3. व्हजायनमध्ये येणारी खाज, आणि व्हाईट डिस्चार्ज
याचं कारण इन्फेक्शन असून शकतं. तसंच हे STD वाला बॅक्टेरियल इन्फेक्शनचादेखील एक प्रकार असू शकतो. तुम्हाला यादरम्यान होणारा डिस्चार्च सर्व काही याबद्दल सांगतो. जर तुम्हाला जास्त जाड स्वरूपातील डिस्चार्ज येत असेल तर हे यीस्ट इन्फेक्शन असू शकतं आणि जर डिस्चार्ज करड्या रंगाचा होत असेल अथवा ग्रिनिश असेल तर हे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. असं असल्यास, तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना भेटण्याची गरज आहे.
4. लेबियामध्ये होणारं इरिटेशन आणि जळजळ
Shutterstock
जर व्हजायनाच्या वरच्या भागात लेबिया (व्हजायनाच्या बाहेरचा भाग) तुम्हाला इरिटेशन अथवा जळजळ होत असेल तर त्याचं कारण तुम्ही वापरत असलेलं उत्पादन असू शकतं. तुम्ही तुमच्या पर्सनल केअरसाठी वापरण्यात येत असलेला साबण, मालिशवालं तेल अथवा बॉडी शॉवर याची नीट तपासणी करून घ्या. यापासून वाचण्यासाठी काही दिवसांसाठी ही उत्पादनं वापरणं बंद करा. फक्त पाण्याने ही जागा धुवा. जास्तच त्रास होत असेल तर डॉक्टरांना दाखवा. तसंच तुम्ही नक्की कोणती उत्पादनं वापरत आहात याची डॉक्टरांना माहिती द्या. सेक्स करताना यामुळे त्रास होतो.
तुमच्या नात्यात आणा स्पाईसी सेक्स रिझॉल्युशन्स
5. केवळ डीप थ्रस्टदरम्यान होतो त्रास
सेक्सदरम्यान तुम्हाला फक्त डीप थ्रस्ट वरच त्रास होत असेल तर त्याचं कारण म्हणजे तुमचं टिप्ड अथवा टिल्टेड यूटेरस असू शकतं. अशा प्रकारचं युट्रेस असेल तर आरोग्य अथवा गरोदरपणाच्या बाबतीत त्रास होत नाही. पण तुम्हा डीप पेनिट्रेशच्या वेळी मात्र त्रास होतो. जर तुमच्या जोडीदाराचं पेनिस हे मोठं असेल तर त्यावेळी त्रास होण्याची शक्यता असते. यापासून वाचण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराला डीप पेनिट्रेशन करू नका म्हणून सांगा. जर तसं शक्य नसेल तर तुम्ही सेक्स करताना त्यांच्यावर या. सेक्सच्या वेगवेगळ्या पोझिशन ट्राय करा. जोपर्यंत तुम्हाला परमोच्च आनंद मिळत नाही तोपर्यंत पोझिशन बदलत राहा.
6. जर तुम्हाला पेनिट्रेशन अशक्य वाटेल
तुम्हाला जर इतकं दुखत असेल की, पेनिट्रेशन होणंही अशक्य वाटत असेल तर तुम्ही ताण घेऊ नका. याचं कारण तुमची व्हजायना अधिक टाईट होण्यामुळे होतं. याला व्हजायनिझम असं म्हणतात. यासाठी तुम्ही एखाद्या महिला डॉक्टरांना भेटण्याची गरज आहे.
7. मुलाच्या जन्मानंतर
बऱ्याचदा महिलांना मुलांना जन्म दिल्यानंतर सेक्स करण्यात त्रास होतो. तुम्हाला तुमची व्हजायना खूपच संवेदनशील असल्याचं जाणवतं. त्यामुळे सेक्स करताना खूपच त्रास होतो. मुलांच्या जन्मादरम्यान देण्यात येणाऱ्या काही मेडिकल प्रोसेसमुळे असं होतं.
तुमचा ‘सेक्स मूड’ तयार होण्यासाठी ‘या’ आहेत परफेक्ट टॉप 10 ट्रिक्स!
8. व्हजायनामध्ये कधीही त्रास होणं
Shutterstock
बऱ्याचदा फ्लेक्सिबिलिटी कमी असल्यामुळे सेक्सदरम्यान त्रास होऊ लागतो. दुखायला लागतं. तुम्हाला सतत असा त्रास होत असेल तर तुम्ही त्यासाठी डॉक्टरांकडून उपचार करून घ्या. योग्य उपचार यावर होणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला हवं असल्यास ओव्हरीज तुम्ही सर्जरी करून काढूनही टाकू शकता.
9. जास्त दुखणं आणि त्रासदायक मासिक पाळी
तुम्हाला जर तुमच्या मासिक पाळीदरम्यान खूप रक्तस्राव होत असेल आणि व्हजायनल क्षेत्रातही खूप दुखत असेल तर यामध्ये युरेटस फायब्रॉईड होऊ शकतं. असं असल्याने तुम्हाला पेनिट्रेशनच्या वेळी खूपच त्रास होतो. पण त्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे जायला हवं.
सेक्स करण्याचे नक्की फायदे काय
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.