आरोग्य

या कारणांमुळेही दुखू शकतं तुमचं डोकं

Leenal Gawade  |  Feb 23, 2020
या कारणांमुळेही दुखू शकतं तुमचं डोकं

 

लहानपणी शाळेत जायचं नसेल तर आपलं हमखास ठरलेलं कारण असायचं ते म्हणजे डोकेदुखी किंवा पोटदुखी. या डोकेदुखीच्या कारणाने आपण आतापर्यंत कित्येकांना हैराण केले असेल. पण ज्यावेळी आपल्याला खरंच डोकेदुखीचा त्रास होऊ लागतो त्याक्षणी मात्र आपल्याला सगळ्या गोष्टी नकोशा होतात. डोकेदुखीची अनेक कारणं आहेत. आज आपण या डोकेदुखीची कारणं पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला नेमका काय इलाज करायचा ते कळू शकेल. चला तर मग जाणून घेऊया डोकेदुखीची कारणे

पाठ दुखीतून सुटका मिळवण्यासाठी करा ही दहा योगासने (Yoga For Back Pain In Marathi)

पित्त आणि सर्दी

shutterstock

 

 पित्त किंवा सर्दी झाली की, तुम्हाला हमखास डोकेदुखीचा त्रास होतो. पित्त होणारे पदार्थ खाल्ले किंवा चुकीच्या वेळी जेवणाचे सेवन केले तरी  आपल्या शरीरात पित्त चढते. खरतरं तुमच्या पोटाशी संबधित असलेला हा आजार तुमच्या डोक्यापर्यंत कसा काय जातो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर पित्ताचे प्रमाण जास्त झाले की, ते डोक्यापर्यंत जाते. जो पर्यंत तुमचे पित्त उलटी वाटे बाहेर पडत नाही तो पर्यंत तुम्हाला डोक्यातून कळा येताना जाणवत राहतात. तर दुसरीकडे सर्दीच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. सर्दी वाहणारी असो किंवा चोंदलेली सर्दी झाल्यानंतर आपण सतत ती आत ओढत राहतो किंवा नाक शिंकरतो यामुळेही .तुमचे डोके दुखू शकते. 

उपाय: अशावेळी तुम्ही आलं-लसूण किंवा ओली हळद, तुळशीची पाने चाटावी. आम्लपित्तामुळे डोके दुखत असेल तर थंड दूध प्यावे आराम मिळेल.

जागरण किंवा अपुरी झोप

shutterstock

 

हल्ली सगळ्यांनाच असणारा त्रास म्हणजे ‘जागरण’ . हल्ली कामाचा ताण किंवा ऑफिस प्रेशर या नावाखाली आपण लॅपटॉपवर तासनतास बसून असतो. काही जण तर रात्रीसुद्धा काम संपवण्यासाठी स्क्रिनवर असतात.याचा परिणाम त्यांच्या झोपेवर होतो. त्यामुळेही डोकेदुखीचा त्रास तुम्हाला होऊ लागतो. जागरण झाल्यामुळे तुम्हाला आवश्यक असलेली झोप पूर्ण होत नाही.  मग काय दिवसभर आपण डुलक्या देत राहतो. त्याचा परिणाम डोकेदुखी. 

उपाय: यावर जर तुम्ही गोळ्यांचा मारा करत असाल तर असे करु नका. त्यापेक्षा ज्यावेळी डुलकी येईल त्यावेळी पावर नॅप घ्या. 

पाठ दुखीतून सुटका मिळवण्यासाठी करा ही दहा योगासने (Yoga For Back Pain In Marathi)

उन्हाचा त्रास

shutterstock

 

आता लवकरच उन्हाळा सुरु होणार आहे. उन्हाळ्यात जर तुम्हाला कसला त्रास होण्याची भीती असते तर तो आहे डोकेदुखीचा. उन्हाच्या झळा कधी तीव्र होतात तुम्हालाही कळत नाही. सतत उन्हात राहिल्यामुळे तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते. शिवाय तुम्हाला पित्ताचा  त्रास होऊ शकतो. या पित्ताच्या त्रासमुळेच तुम्हाला डोकेदुखी होते.
उपाय: जर तुम्हालाही सतत उन्हात उभे राहिल्यामुळे किंवा काम केल्याने डोकेदुखी होत असेल तर तुम्ही तुमच्यासोबत टोपी किंवा स्कार्फ ठेवा.

पोट साफ न होणे

 

आता तुम्ही म्हणाल पोट साफ न होणे आणि डोकेदुखीचा काय संबंध? पण तुमचे पोट साफ नसेल तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास अगदी हमखास होऊ शकतो. पोट साफ नसेल तर तुमच्या पोटात असलेले गॅसेस यामुळे तुमच्या स्नायुंचे आकुंचन होते. हा गॅस तुमच्या थेट मेंदूपर्यंत जाऊन पोहोचतो. गॅसमुळे तुमच्या रक्तपुरवठ्यामध्ये काही अडचणी आल्या की, मात्र तुम्हाला हा त्रास होऊ लागतो. त्यामुळे पोट साफ ठेवण्यासाठी आहार योग्य असू द्या. 

उपाय: आहारामध्ये योग्य प्रमाणात फळ, पाणी, भाज्या असू द्या. 

डोळ्यांचा अति वापर

shutterstock

 

हल्ली सगळेच अपरिहार्य कारणास्तव लॅपटॉप आणि मोबाईलचा वापर करतात. त्याच्यातील तीव्र रेडियेशन तुमच्या डोळ्यांवर परिणाम तर करतातच. शिवाय त्याच्या अतिवापरामुळे तुम्हाला डोके दुखीचा त्रास होऊ शकतो. तुम्ही सतत मोबाईलमध्ये गुंतला असाल तर तुम्हाला हे नक्की जाणवेल की, काही वेळाने तुमचे डोके आणि डोळे दोन्ही दुखत आहेत. त्यामुळे शक्य असेल तेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप बाजूला ठेवून आराम करा. 

उपाय: हल्ली लॅपटॉपसाठी खास चष्मे मिळतात त्यांचा वापर केला तरी तुम्हाला चालू शकेल

आता तुम्हालाही डोकेदुखीचा त्रास सतत होत असेल तर ही काही कारणं असू शकतात. 

Read More From आरोग्य