लग्नसराई

पौष महिन्यात का करू नये लग्न…शास्त्र असतं ते!

Dipali Naphade  |  Oct 17, 2021
paush month

खरं तर लग्न लवकरच करायचं होतं. थंडी पण हवी नवीन वर्ष पण आहे, सर्व काही जुळून आलं होतं …पण नेमका पौष महिना आला! अशी अनेक वाक्य आपण लग्न अथवा अन्य कार्याच्या मुहूर्तांच्या बाबतीत ऐकतो. काही जणांना ही कारणे पटतात तर काही जणांना पौषात काढीव मुहूर्त असतात मग लग्न का करायचं नाही? लग्न करायचंच नाही मग काढीव मुहूर्त तरी कशाला असतात असे अनेक प्रश्न मनात येतात. आपली पिढी कितीही पुढे गेली असली, तरीही आजही लग्न करताना भविष्य, पत्रिका, मुहूर्त या सगळ्या गोष्टी घरात नक्कीच पाहिल्या जातात. पंचांगानुसार दरवर्षी पौष महिन्यात काढीव मुहूर्त असतात. काही जण या दिवशी लग्नही करतात. पण काही जणांना पौषात लग्न का करत आहेत असे प्रश्न पडतात आणि नाहक भुवया उंचावल्या जातात. अर्थात हे सर्व आपल्या मानण्यावर आहे. 

अधिक वाचा – लग्नाचे विधी झाल्यावर खेळा असे गेम्स, येईल धमाल

पौषमध्ये लग्न करू नये – अंधश्रद्धा आहे का?

पौष या मराठी महिन्याच्या आधी येणारा महिना म्हणजे मार्गशीर्ष. साधारण या महिन्यात आधीच लग्नाचे खूप मुहूर्त असतात. तसंच हा महिना म्हणजे पवित्र महिना मानला जातो. पूर्वीच्या परंपरेनुसार पौष महिना हा साधारण जानेवारी महिन्यात येतो. यावेळी दिवस अत्यंत लहान असतात. अंधार लवकर पडतो. पूर्वीच्या काळी लग्न वेगवेगळ्या गावात व्हायची. त्यामुळे पौष महिन्यात लग्न असेल तर एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी काहीच सोय नसायची. त्यामुळे पौष महिन्यात लग्न करणे योग्य नाही असा पायंडा पडला असावा असा अंदाज लावला जातो. मात्र यात कोणतीही अंधश्रद्धा नाही. या महिन्यात लग्न केल्याने भविष्यामध्ये त्रास होतो असंही काही नाही. प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याचे भविष्य असते. त्यामुळे याचा सहसा संबंध लावला जात नाही. पौष महिना वाईट नाही. मात्र आजही अनेक गावांमध्ये लग्नासाठी हा महिना त्रासदायक ठरू शकतो म्हणून शक्यतो या महिन्यात लग्न करण्यात येत नाही. 

तर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पौष महिन्यात रात्र लहान असून थंडीमुळे वातावरणामध्ये रोगजंतूंचे प्रमाणही वाढलेले असतात. त्यामुळे वातारवण दूषित होऊन आजाराचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणून आधीपासून पौष महिन्यात लग्न न करता आराम करण्यावर भर देण्यात येत होता. 

अधिक वाचा – हिंदू लग्न विधी समारंभ असतो असा, विवाह विधी घ्या जाणून (Lagna Vidhi Marathi)

शास्त्र असतं ते…

आपल्याकडे अनेक गोष्टी या आजही शास्त्रानुसार अर्थात परंपरागत चालत आल्यानुसार करण्यात येतात. यामध्ये घाबरण्यासारखं अथवा घाबरविण्यासारखंदेखील काहीच नाही. भविष्यशास्त्रानुसार पौष महिन्यात गुरू अथवा शुक्र या ग्रहांचा अस्त बऱ्याचदा दर्शविला जातो. हे दोन्ही ग्रह नवरा आणि नवरीच्या आयुष्यात महत्त्वाचे मानले जातात. नवा संसार सुरू करताना या दोन्ही ग्रहांचा आयुष्यावर चांगला परिणाम व्हावा असंही घरातील दिग्गज मंडळींना वाटत असतं. त्यामुळे ज्या घरात भविष्यशास्त्रावर अथवा मुहूर्त आणि या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवला जातो, त्या घरांमध्ये सहसा पौष महिन्यात लग्न करण्यात येत नाही. तसंच पौष महिन्यात जर धनु राशीत सूर्य असेल तर विवाह करू नयेत असंही सांगण्यात येतं. त्यामुळे मुलगा आणि मुलीच्या पत्रिकेनुसार लग्न लाभेल की नाही हे पाहूनच पौष महिन्यात काढीव मुहूर्त पाहून लग्न लावले जाऊ शकते. 

सध्या मिळणारा वेळ, हॉलची उपलब्धता, नवरा आणि नवरीला मिळणाऱ्या सुट्टी या सगळ्याची गणितंदेखील नीट बसवावी लागतात. त्यामुळे पौष महिन्यातदेखील सर्रास लग्न काढीव मुहूर्तावर करण्यात येतात. पण आजही अनेक जण पौष महिन्यात लग्न करणे या कारणांमुळे टाळतातदेखील. 

अधिक वाचा – लग्नसराईसाठी साड्यांचे प्रकार (Marathi Wedding Sarees Shalu)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From लग्नसराई