घरी राहून हल्ली अनेक जण स्वत:ची काळजी घेत आहेत. ज्यांना या पूर्वी फिटनेस राखता येत नव्हता. त्यांनी तर अगदी नेटाने काही व्यायाम आणि डाएट करायला घेतला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही जर तोच तोच व्यायाम सतत करत राहिलात तर तुमच्या शरीरावर त्याचे परीणाम मुळीच दिसणार नाहीत. जर तुम्ही साधारण 2 महिने तोच तोच व्यायाम करत असाल तर तुम्हाला तुमची ही सवय बदलण्याची फारच गरज आहे. काय आहे याचे कारण ते आज आपण जाणून घेऊया.
अपचन होतंय तर करा झटपट घरगुती उपचार
शरीराला होते सवय
जर तुम्ही रोज व्यायाम करत असाल तर तुम्हाला माहीत असेल की, एखादा व्यायाम प्रकार तुम्ही रोज करत असाल तर तुमच्या शरीराला त्याची सवय होऊन जाते. तुमचे शरीर कितीही कठीण व्यायामप्रकार असला तरी तुमचे शरीर त्या व्यायामासाठी तयार होते. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट कायम लक्षात घ्यायला हवी.
उदा. तुम्ही रोज 10 पुशअप्स मारत असाल आणि ते तुम्हाला अगदी सहज करता येत असतील याचा अर्थ तुमचे शरीर त्यासाठी तयार झाले आहे. आता तुम्हाला त्याहून अधिक करण्याची गरज आहे. म्हणजे तुमच्या शरीराला अपेक्षित असलेला व्यायाम होईल.
उन्हाळ्यात वेटलॉस करणे खरचं असते का सोपे?, जाणून घ्या कारण
व्यायामामध्ये आणा विविधता
आता दर 15 दिवसांनी व्यायाम बदला याचा अर्थ तुम्हाला काय बदल करायचा हा गोंधळ असेल तर अगदी सोपा उपाय. तुम्हाला तुमच्या व्यायामामध्ये थोडी विविधता आणायची आहे. आठवड्यातील 5 दिवस तुम्ही व्यायाम करत असाल तर तुम्ही एक दिवस आड कार्डिओ करायला काहीच हरकत नाही. किंवा जर तुम्हाला अगदीच सोपं काहीतरी हवं असेल तर तुम्ही एका दिवशी पायाचा सगळा व्यायाम करा, एक दिवस चेस्ट, बायसेपचा व्यायाम करा. तुम्ही जर जीमला जाणारे नसाल तर अगदी बिगीनर व्यायाम निवडा. म्हणजे तुम्हाला खूप काही बदल करण्याची गरज भासणार नाही. आता या कोणत्याही गोष्टी तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही एक दिवस फक्त चाला किंवा धावा, एक दिवस दोरीच्या उड्या मारा अशा पद्धतीनेही तुम्ही विविधता आणू शकता.
व्यायाम बदलताना ही घ्या काळजी
व्यायाम बदलणे हे जितके गरजेचे आहे. तितकेच तुम्हाला व्यायामाचा प्रकार बदलताना काही काळजी घेणे गरजेचे आहे. तुमच्या शरीराची क्षमता ओळखून तुम्हाला व्यायाम करणे गरजेचे आहे. तुम्ही एखादा नवा व्यायाम प्रकार करताना तो योग्य करत आहात की नाही हे देखील पाहा. कारण तुम्ही जास्त करण्याच्या नादात स्वत:ला त्रासही करुन घेऊ शकता. त्यामुळे प्रोफेशनल मदत घ्या. जर अशी मदत मिळणे शक्य नसेल तर तुमच्या शरीरानुसार आणि तुम्ही किती व्यायाम करता यानुसार व्यायामप्रकार निवडा.
महिलांसाठी वरदान आहे ज्येष्ठमध, जाणून घ्या फायदे (Jeshthamadh Benefits In Marathi)
नवा व्यायामुळे येऊ शकतो थकवा
कोणतीही नवी गोष्ट अचानक सुरु केल्यानंतर थकवा जाणवणे हे अगदी स्वाभाविक आहे. जर एखादा व्यायामप्रकार योग्य पद्धतीने करुन तुम्हाला थकवा किंवा अंग दुखी होत असेल तर ठीक आहे. याचा अर्थ नवा व्यायामप्रकार तुमच्या शरीरावर परीणाम करायला घेत आहे. हा थकवा किंवा अंगदुखी अगदी क्षणिक असते. तुम्हाला काहीवेळाने नक्कीच बरे वाटायला लागते. पण तुमचा थकवा आणि अंगदुखी अगदी खूपच असेल तर मात्र तुम्ही याकडे दुर्लक्ष करु नका. लगेच डॉक्टरांची मदत घ्या.
आता तुम्ही जर रोज व्यायाम करणार असाल तर लक्षात ठेवा शरीराला सवय झाली असे वाटत असेल तर तुम्ही तातडीने व्यायामप्रकार बदला.