फास्टिंग म्हणजे उपवास. खरंतर भारतीय संस्कृतीत उपवासाला फार महत्त्व आहे. उपवास करणं म्हणजे फक्त उपाशी राहणं नक्कीच नाही. त्यासोबत परमेश्वराच्या जवळ आपली बैठक असणं, नामस्मरण करणं हा ही त्यामागचा उद्देश आहे. मात्र सध्या डाएटच्या फॅडमुळे नव नवीन प्रकारचे डाएट आणि फास्टिंगचे प्रकार लोकप्रिय होत आहेत. ज्यांचा फक्त वजन कमी करणं हा एकच उद्देश असू शकतो. सध्या यातील एक ट्रेंडमध्ये असलेला डाएट प्रकार म्हणजे इंटरमिटेंट फास्टिंग. वजन कमी लवकर कमी करण्याचा हा एक सोपा प्रकार म्हणून या डाएटकडे पाहिलं जातं. काही जणं कुणाचं तरी वजन कमी झालं हे ऐकून अथवा नवं फॅड म्हणून हे डाएट करून पाहतात. मात्र त्यांना काहिच परिणाम जाणवत नाहीत अथवा झेपत नाही म्हणून ते हे डाएट अर्ध्यावरच सोडतात. याचा अर्थ इंटरमिटेंट डाएट केल्यामुळे तुमचं वजन कमी होत नाही असा नाही तर तुम्ही तुमचं वजन कमी का होत नाही याचा शोध घेतलेला नाही असा असतो.
इंटरमिटेंट फास्टिंग करूनही का होत नाही वजन कमी जाणून घ्या कारणं
इंटरमिटेंट फास्टिंग हे डाएट करूनही जर तुमचं वजन कमी झालं नाही तर त्यामागची कारणं तुम्ही शोधायलाच हवी. आज आपण या कारणांचा शोध घेऊ या
तुम्ही तुमच्या कॅलरिजचा हिशोब ठेवला होता का
कोणत्याही डाएटचा मुख्य भाग हा असतो की तुमच्या शरीरातील कॅलरिज नियंत्रित ठेवणं. त्यामुळे जर तुम्ही इंटरमिटेंट फास्टिंग करताना तुमच्या कॅलरिजचा हिशोब ठेवला नाही तर तुमचे डाएट पाण्यात जाऊ शकते.यासाठीच हे डाएट करताना तुमच्या प्रत्येक जेवणानंतर तुम्हाला किती कॅलरिज मिळाल्या याची नोंद करा. त्यासोबतच वजन कमी करण्यासाठी फॉलो करा हा डाएट प्लॅन
तुम्ही पुरेशी झोप घेता का
आता तुम्ही म्हणाल की आमच्या झोपेचा आणि डाएटचा काय संबंध. तर याचं उत्तर असं की तुमच्या झोपेचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावरच परिणाम होत असतो. जेव्हा तुम्ही शांत झोपता तेव्हा तुमचं मेटाबॉलिझम सुधारतं ज्याचा परिणाम तुमच्या भुकेवर होतो. शिवाय तुमचे हॉर्मोन्स नियंत्रित राहतात. यासाठी हे डाएट करण्यासोबतच चांगली आणि निवांत झोप घ्यायलाच हवी.
हॉर्मोनल असंतुलन झाले आहे का
जर तुम्हाला हॉर्मोन्स संबधित काही त्रास असेल तर त्याचा परिणाम तुमच्या वजनावर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही कितीही डाएट केलं तरी तुमच्या वजनावर परिणाम होत नाही. यासाठी तुम्हाला तुमच्या हॉर्मोन्स असंतुलनावर योग्य ते उपचार करायला हवेत. लक्षात ठेवा वजन कमी करण्यासाठी फक्त डाएटच नाही तर निरोगी जीवनशैलीदेखील खूप महत्त्वाची आहे.
तुम्हाला एखादी चिंता काळजी सतावते
जीवनातील छोट्या छोट्या चिंता काळजीचा परिणामही तुमच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे जर तुम्ही तणावात असाल तर कोणत्याच डाएटचा तुमच्यावर योग्य परिणाम होणार नाही. बऱ्याच जणांना स्ट्रेस हॉर्मोन्स वाढल्यास सतत खाण्याची इच्छा होते. याचाच अर्थ वजन कमी होत नाही तर त्यामागे हे ही एक कारण असू शकते.
योग्य व्यायाम तुम्ही करत नाही
वजन कमी करण्यासाठी आहारासोबतच व्यायामही खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही डाएट व्यवस्थित करत आहात पण तुमच्या शरीराची कोणतीच हालचाल होत नसेल तर तुमचं वजन कमी कसं होणार. अशा वेळी डाएटचा काहीच परिणाम तुमच्यावर होणार नाही. यासाठी तुम्हाला शारीरिक हालचाल आणि योग्य व्यायाम नक्कीच करायला हवा.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे ‘किटो डाएट’ (Benefits Of Keto Diet In Marathi)