खाणंपिण आणि नाइटलाईफ

पराठ्यांबरोबर करा अशी तीळाची चटणी, बोटं चाटण्याइतकी होते चविष्ट

Dipali Naphade  |  Jun 28, 2022
recipe-of-sesame-chutney-in-marathi

गरमागरम पराठे नाश्त्याला खाल्ल्यानंतर दिवसभर पोट भरून राहाते आणि जास्त भूकही लागत नाही. पराठ्यांबरोबर पुदिन्याची चटणी, कोथिंबीरची चटणी अथवा लसणीची चटणी बऱ्याचदा खाल्ली जाते. मात्र तुम्ही पराठ्यांबरोबर तीळाची चटणी कधी खाल्ली आहे का? नसेल तर तुम्ही बटाटा पराठा असो पुदिना पराठा ही तीळाची चटणी नक्की ट्राय करायला हवी. साधारण उत्तरेकडच्या राज्यांमध्ये ही चटणी अधिक प्रमाणात बनवली जाते. ही चटणी अत्यंत स्वादिष्ट असते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही पराठ्यासह याचा स्वाद घेऊ शकता. तुम्ही केवळ पराठ्यासहच नाही तर बटाटावडा अथवा भजीसहदेखील ही चटणी खाऊ शकता. ही चटणी आंबट – गोड चवीची असते त्यामुळे अधिक चविष्ट लागते. तर मग अशी बोटं चाटण्यासारखी चटणी (Recipe Of Til Chutney In Marathi) कशी बनवायची ते आपण या लेखातून पाहूया. तुम्हीही ही चटणी करून घ्या याचा अप्रतिम स्वाद!

तीळाची चटणी बनविण्यासाठी लागणारे साहित्य आणि बनविण्याची पद्धत 

बनविण्याची पद्धत 

तुम्हाला हवं असल्यास, यामध्ये तुम्ही लाल मिरचीचाही वापर करू शकता. मात्र हे तुमच्या आवडीनुसार आहे. तुम्हाला किती प्रमाणात तिखट आवडते आणि कोणत्या मिरचीचा तुम्हाला उपयोग करायचा आहे यानुसार तुम्ही या चटणीत मिरचीचा वापर करावा

टीप – ही चटणी चविष्ट असते. मात्र तुम्ही अति प्रमाणात याचे सेवन करू नका. तीळ हे शरीरासाठी उष्ण असतात. तुमची शरीरप्रकृती उष्ण असल्यास, तुम्हाला याचे अतिसेवन केल्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला ही चटणी कितीही आवडली तरीही ती प्रमाणातच खा. तसंच तुम्ही या चटणीसाठी तुम्हाला आवडत असल्यास, काळ्या तीळांचाही वापर करू शकता. मात्र या तीळाची चटणी तितकी चविष्ट होत नाही. ही चटणी तुम्ही भाकरीसहदेखील खाऊ शकता. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काळ्या तीळाच्या चटणीचा वापर होतो. यामध्ये सुक्या खोबऱ्याचा वापर करण्यात येतो. तसंच ही चटणी थोडी सुकी असते आणि पांढऱ्या तीळाची चटणी ही ओली चटणी असते. त्यामुळे काळ्या तीळाची चटणी तुम्ही स्टोअर करून ठेऊ शकता मात्र पांढऱ्या तीळाची ही चविष्ट चटणी तुम्ही एका दिवसात संपवणं अधिक चांगले.  तसंच तिळाच्या तेलाचेही फायदे असतात. तुम्हाला हवं असेल तर तिळाचे तेल यामध्येही वापरू शकता.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ