सौंदर्य

चेहऱ्यावरील ओपन पोअर्स तुम्हाला असे करता येतील कमी

Leenal Gawade  |  Feb 8, 2019
चेहऱ्यावरील ओपन पोअर्स तुम्हाला असे करता येतील कमी

बेबी सॉफ्ट स्किन सगळ्यांना हवी असते, अशी त्वचा जी नितळ आणि पिंपल्स फ्री आहे. पण वयोमानानुसार चेहऱ्यावर अनेक बदल होऊ लागतात. त्यापैकी नको असलेला बदल म्हणजे ओपन पोअर्स . कारण हेच ओपन पोअर्स तुमच्या पिंपल्सचे कारण बनतात. तुमचा चेहरा तुम्ही निरखून पाहिला असेल तर तुम्हाला चेहऱ्यावर  बारीक बारीक छिद्र दिसतील त्यालाच ‘ओपन पोअर्स’ म्हणतात. जर तुम्ही ओपन पोअर्सकडे असेच दुर्लक्ष केले तर मात्र त्याचा त्रास अधिक होऊ शकतो. कारण त्यामुळेच पिंपल्स येतात आणि तुमच्या नितळ त्वचेचे स्वप्न स्वप्नच राहते. तुमच्या चेहऱ्यावरही अशीच बारीक छिद्र असतील तर तुम्हाला आताच त्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

शरीरावरील अनावश्यक केस असे काढता येतील

 ओपन पोअर्सविषयी सांगायचे झाले तर ते  पिंपल्ससारखे घालवता येत नाही. फक्त पोअर्सचा आकार कमी करता येऊ शकतो. जर तुम्ही आतापासून काळजी घ्यायला सुरुवात केली तर ओपन पोअर्स त्वचेवर लवकर येणार नाही

आता कशी काळजी घ्यायची ते पाहूया

गरम पाणी टाळा

अनेकांना कडकडीत गरम पाण्याने आंघोळ करायची सवय असते. सगळ्यात आधी तुम्हाला चेहऱ्यावर गरम पाणी वापरणे बंद करायचे असते. कारण  तुम्हाला माहीत आहे की, गरम पाण्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील बारीक बारीक छिद्र उघडली जातात. ती छिद्र बंद नाही झाली तर त्यामध्ये धूळ जाण्याची शक्यता असते आणि मग त्यामुळे तुमची त्वचा निस्तेज वाटायला लागते. त्यामुळे सगळ्यात आधी तुम्हाला गरम पाणी वापरणे बंद करायचे आहे. जेव्हा तुम्हाला चेहरा धुण्याची इच्छा होईल त्यावेळी तुम्हाला थंड पाणीच चेहऱ्याला वापरायचे आहे. त्यामुळे तुमचा चेहऱ्यावरील पोअर्सचा आकार लहान होईल. साधारण महिन्याभरानंतर तुम्हाला तुमच्यातील हा बदल दिसून येईल.

म्हणूनच आलिया भट दिसते इतकी सुंदर

 स्क्रब! स्क्रब! स्क्रब!

 प्रदूषणामुळे तुमच्या चेहऱ्यावर धूळीचे आणि मातीचे कण साचून राहतात.तेच तुमच्या चेहऱ्यावर ते अधिक साचून राहिले की, तुमच्या चेहऱ्यावरील छोटी छिद्र मोठी होतात.  त्यामुळे ही घाण मुळातच साचू न देण्यासाठी तुमचा चेहरा चांगल्या स्क्रबने चेहरा स्क्रब करा. बाजारात अॅपरीकॉट, स्ट्रॉबेरी, कॉफी, शुगर स्क्रब असे बरेच प्रकार मिळतात. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही स्क्रब निवडू शकता. आठवड्यातून दोनदा स्क्रब करा.

टीप- अनेक जण स्क्रब करताना त्वचा अक्षरश: घासून काढतात. पण असे करणेही त्वचेसाठी चांगले नाही. कारण तुमची चेहऱ्याची त्वचा नाजूक असते. अगदी हलक्या हाताने आणि काही मिनिटांसाठी तुम्हाला तुमचा चेहरा स्क्रब करायचा आहे.

Also Read मुखवटे उत्तम कोळशाची साल

तेलकट त्वचा अधिक त्रासदायक

सकाळी झोपून उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या नाकाजवळ, हनुवटीजवळील त्वचा तेलकट दिसत असेल तर तुमची त्वचा ऑईली आहे अशी समजावी. अशी त्वचा त्वचेच्या आरोग्यासाठी हानीकारक असते. त्वचेतला हा तेलकटपणा कमी करण्यासाठी काही फेस मास्क लावणे गरजेचे असते. सध्या चारकोल फेस मास्क जास्त प्रसिद्ध आहे.तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त घाण काढण्यासाठी उपयुक्त पडू शकतो. याशिवाय घरगुती काही मास्कही तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करु शकतात.

वाचा – Home Remedies To Take Care Of Oily Skin

चेहऱ्यावरील पिंपल्सपासून अशी होईल सुटका

फेस मसाज

फेशिअल केल्यामुळे तुम्ही छान दिसता असे आपल्याला नेहमी वाटत असते. फेशिअल केल्यानंतर काही दिवस तो ग्लो टिकून राहतो. पण त्या ग्लो मागे असतो मसाज.. मसाज केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील रक्तप्रवाह सुधारतो त्यामुळे आपणच तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येत असतो. त्यामुळे महिन्यातून एकदा तरी चेहऱ्यावर मसाज मिळावा म्हणून फेशिअल करुन घ्या. अनेक जण त्रास होईल या भितीने फेशिअल करायला घाबरतात. पण साधारण  पंचवीशीनतर तुमच्या चेहऱ्याला काही गोष्टींची गरज असते. तुमचा चेहऱ्याची त्वचा सैल पडायला लागते. मसाज केल्यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या नसा रिलॅक्स होतात. तुम्हाला तर आराम मिळतोच सोबत त्वचेवरील ओपन पोअर्सही लहान होण्यास मदत मिळते.

(फोटो सौजन्य- Instagram)

Read More From सौंदर्य