Love

रिलेशनशिपमध्ये जोडीदाराला ‘नाही’ म्हणणंही गरजेचं आहे, कारण…

Harshada Shirsekar  |  Jan 23, 2020
रिलेशनशिपमध्ये जोडीदाराला ‘नाही’ म्हणणंही गरजेचं आहे, कारण…

प्रेमाचं नातं कायम टिकवायचं असल्यास प्रत्येक गोष्टीसाठी होकार द्यावा, असा सल्ला जोडप्यांना दिला जातो. पण खरंतर एखादं नाते दृढ करण्यासाठी जितकं ‘हो’ म्हणणं गरजेचं आहे, तितकंच नकार देणं देखील आवश्यक आहे. 

आवड-नावड समजण्यास मदत 

जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीस होकार दिल्यास तुम्हाला एकमेकांच्या आवडी-निवडी समजणे कठीण होईल. एका मर्यादेपर्यंत तुमच्या दोघांमधील सर्व गोष्टी सुरळीत चालतील. पण काही वेळानंतर तुम्हाला दोघांनीही याचा कंटाळा येईल. पार्टनरची एखादी गोष्ट न आवडल्यास त्यास नकार देणे किंवा नाही म्हणण्याची सवय लावून घ्या. यामुळे तुम्हा दोघांनाही एकमेकांना चांगल्या पद्धतीनं ओळखता येईल.  

(वाचा : मुलींच्या ‘या’ पाच वाक्यांवरून ओळखा त्यांची ‘दिल की बात’)

मन दुखावणार नाही 

तुम्हाला एखाद्या विशिष्ट प्रकारची मस्करी किंवा जोक्स करणं आवडत नाहीत, पण तुमच्या जोडीदाराला तसेच विनोद आवडत असल्यास अनेकदा त्याच्या विनोदी स्वभावामुळे तुम्ही दुखावलेही जात असाल. पण केवळ तो/ती दुखावला/दुखावली जाऊ नये, यासाठी तुम्ही मौन बाळगत आहात तर जास्त त्रास तुम्हालाच होणार आहे. योग्य वेळीच त्याला/तिला सर्वांसमोर तुमची मस्करी करण्यास रोखलं पाहिजे.  हीच बाब सवयी, वागणूक आणि बोलण्याची पद्धत या गोष्टींनाही लागू होते.

(वाचा : ‘लग्न कधी करणार’ या प्रश्नाचा भडीमार करणाऱ्यांपासून अशी मिळवा सुटका)

ताण वाढणार नाही 

ज्या गोष्टी तुम्हाला पसंत नाही, त्याच वारंवार करणं, ऐकणे किंवा पाहणं… यामुळे तुम्हाला भावनिक आणि मानसिक ताण सहन करावा लागू शकतो. मानसिक ताण-तणावामुळे तुमच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. ही समस्या टाळण्यासाठी जोडीदाराला एखाद्या नावडत्या  गोष्टीसाठी थेट नकार द्यायला शिका. 

बाँडिंग होईल मजबूत 

आपला पार्टनर एखाद्या गोष्टीमुळे थेट नाही म्हणत असेल तर त्याच्या भावनांचा आदर करायला शिका. त्यांचा नकार देखील स्वीकारा. यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या भावना समजण्यास मदत होईल. त्याच्या/तिच्या आवडीनिवडी समजतील. आपल्या कोणत्या सवयीमुळे जोडीदाराला त्रास होतोय, याची माहिती आपल्याला मिळण्यास मदत होते. छोट्या-मोठ्या गोष्टी समजल्यानं तुमचं बाँडिंग दृढ होण्यास मदत होईल. कोणत्याही गैरसमजुतीमुळे नात्यात दुरावा येणार नाही.

(वाचा : गर्लफ्रेंडच्या ‘या’ इच्छा तुम्ही करता का पूर्ण, असं करा तिला खूश)

हे लक्षात ठेवा

उगाचच होकार दर्शवून स्वतःला आणि समोरच्या व्यक्तीला त्रास देण्यापेक्षा ‘नाही’ म्हणणं केव्हाही उत्तम. पण सतत ‘नाही’ म्हणण्यामुळेही नात्यात नकारात्मकता निर्माण होऊ शकते. यामुळे तुमचं नातं मजबूत होण्यापेक्षा संपुष्टात येण्याची अधिक शक्यता आहे. हे लक्षात ठेवून होकार-नकार देण्याची योग्य वेळ पाहून आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी. 

हे देखील वाचा :

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From Love