सध्या ऑनलाईन मनोरंजन जगतात चलती आहे ती, वेबसीरिजची. त्यामुळे बी टाऊन असो वा एम टाऊन दोन्ही इंडस्ट्रीतील कलाकार हे वेबसीरिजला पसंती देत आहेत. स्कोर ट्रेंड्स इंडियाने नुकतीच मार्चमध्ये लोकप्रिय ठरलेल्या 20 वेबसीरिजची लिस्ट काढली. गेल्या महिन्यात वेब दुनियेत ‘मेड इन हेवन’, ‘दी फायनल क़ॉल’, ‘फ्लिप’, ‘दिल्ली क्राइम’ आणि ‘दी शोले गर्ल’ या वेबसीरिज रिलीज झाल्या. त्यापैकी ‘मेड इन हेवन’ ही वेबसीरिज लोकप्रियतेत सर्वौच्च स्थानी दिसून येतेय.
गेल्या काही दिवसांपासून स्कोर ट्रेंड्स इंडिया चार्ट्सवर ‘सॅक्रेड गेम्स’ आणि ‘मिर्झापुर’ या दोन क्राइम थ्रिलर्सची प्रचंड लोकप्रियता दिसून आली. या दोन्ही वेबसीरिज लोकप्रियतेत नेहमी पहिल्या किंवा दुस-या स्थानावरच असतात. त्यांना त्या स्थानावरून हटवणं हे बाकी वेबसीरिजसाठी एक आव्हानच म्हणावं लागेल.
यंदा मार्चमध्ये अमेझॉन प्राइमची नवी वेबमालिका ‘मेड इन हेवन’ रिलीज झाल्यावर डिजीटल न्यूज, न्यूज प्रिंट आणि व्हायरल न्यूजमध्ये या मालिकेला चांगली लोकप्रियता मिळाली. त्यामुळेच तर 67.57 गुणांसह ही मालिका तिस-या स्थानावर आली आणि मार्च 2019 मध्ये झळकलेल्या वेबसीरिजमध्ये ती सर्वोच्च पदावर पोहोचली.
यासोबतच, अर्जुन रामपाल, जावेद जाफरी आणि नीरज काबी स्टारर ‘झी-5 ओरिजिनल’च्या ‘द फाइनल कॉल’ने 42.57 गुणांसह लोकप्रियतेत सहावे स्थान पटकावलं आहे. तर मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये ती दुस-या स्थानावर पोहोचली आहे.
इरॉस नाउ ओरिजिनलची बिजॉय नांबियार दिग्दर्शित, ‘फ्लिप’ 25.54 गुणांसह वेबसीरिजच्या लोकप्रियतेच्या चार्टमध्ये 11 व्या स्थानी पोहोचलीय. तर मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये तिस-या स्थानावर आहे.
याशिवाय नेटफ्लिक्स ओरिजिनल्सची ‘दिल्ली क्राइम’ 20.27 गुण मिळवून लोकप्रियतेच्या लिस्टमध्ये 12 व्या पदावर आहे आणि मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबमालिकांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.
भारताची पहिली स्टंटवुमन रेश्मा पठाणवर आधारित बायोपिक सीरीज, Zee 5 ओरिजिनलची ‘दि शोले गर्ल’ 10.41 गुणांसह14 व्या स्थानी पोहोचली आहे. तर मार्च 2019 मध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये पाचव्या स्थानावर आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.
स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात की, “मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये ‘मेड इन हेवन’ लोकप्रियतेच्या शिखरावर खूपच कमी अवधीत अग्रेसर ठरली. ‘द फाइनल कॉल’, फ्लिप आणि ‘द शोले गर्ल’ या मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजही सध्या प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झालेल्या दिसून येतायत. वेबसीरीजच्या अभिनेत्यांची वाढती लोकप्रियता जेव्हा आम्ही बारकाईने पाहू लागलो. तेव्हा आम्हांला असं लक्षात आलं की, आज बॉलीवूड स्टार्सप्रमाणेच या वेबमालिकांमध्ये काम करणा-या अभिनेत्यांची लोकप्रियता आहे. सोशल प्लेटफॉर्म, व्हायरल न्यूज, डिजीटल न्यूज आणि न्यूजपेपर्समध्ये त्यांचा वाढता प्रेजेंस ते स्टार्स झाल्याचाच पुरावा आहे. मार्चमध्ये रिलीज झालेली ‘दिल्ली क्राइम’ सुध्दा कमी अवधीत लोकप्रिय झाली. ज्यामुळे आम्हांला असं वाटतंय की, ही वेबसीरिज येत्या काही दिवसांमध्ये लोकप्रियतेची शिखरं पादाक्रांत करेल. “
रेवा- सत्याचा ब्रेकअप झाला?, #MovingOut चा सीझन २ आला
स्कोर ट्रेंड्स इंडियाचा डेटा हा 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा केला जातो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजीटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश असतो. विविध अत्याधुनिक अल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. यावरूनच बॉलीवूड सेलिब्रिटींचं स्कोर आणि रँकिंग कळतं.
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade