हॉलीवूडचा हार्ट थ्रॉब रॉबर्ट डाउनी ज्युनियर म्हणजेच आर्यन मॅन याचं भारतातही जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. भारतीय फिल्म प्रेक्षकांना तो किती आवडतो, हे नुकत्याच एका पाहणीतून समोर आलंय. स्कोर ट्रेंड्स इंडियाने ही पाहणी केली होती. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या सर्वेक्षणानुसार, ‘आर्यन मॅन’ रॉबर्ट डाउनी ज्युनियर भारतातला सर्वाधिक लोकप्रिय हॉलीवुड अभिनेता आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार रॉबर्ट डाउनी ज्युनियरनंतर विल्स स्मिथ हा भारतात सर्वाधिक लोकप्रिय हॉलीवूड अभिनेता आहे.
इंडियन लव्ह आर्यन मॅन 3000
अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. डिजीटल (सोशल प्लेटफॉर्म आणि वेबसाईट), व्हायरल न्यूज आणि न्यूजप्रिंट या सर्वांमध्ये रॉबर्ट डाउनी अग्रेसर असून 100 गुणांसह त्यांनी लोकप्रियतेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
आर्यन मॅननंतर जिनी
तर, ‘अल्लादीन’ चित्रपट फेम जिन म्हणजेच अभिनेता विल स्मिथने 90 गुणांसह लोकप्रियतेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. ई पेपर (न्यूज़प्रिंट) आणि व्हायरल न्यूज श्रेणीमध्ये विल स्मिथच्या असलेल्या प्रचंड लोकप्रियतेमुळे स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर विल स्मिथ दूस-या स्थानावर आहे. ‘अव्हेंजर्स’मधील थॉर म्हणजेच अभिनेता क्रिस हेम्सवर्थ हॉलीवूड अभिनेत्यांच्या लोकप्रियतेत तिस-या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या अभिनेता क्रिस हेम्सवर्थचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे 73 गुणांसह क्रिस हेम्सवर्थ स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर तिस-या स्थानावर पोहोचला आहे.
आपल्या सुपरहिरो भूमिकांसाठी ओळखला जाणारा अभिनेता क्रिस्टोफर इवांस या लोकप्रियतेच्या यादीत चौथ्या पदावर आहे. डिजीटल (सोशल प्लॅटफॉर्म आणि वेबसाईट) श्रेणीमध्ये क्रिस्टोफरच्या फॅनफॉलोइंगमुळे त्याच्याविषयी भरपूर कव्हरेज दिसून आलंय. या ‘कॅप्टन अमेरिका’ने 58 गुणांसह चौथं स्थान पटकावलं आहे. तर, अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओचा गेल्या कित्येक वर्षांपासून भारतात एक चाहतावर्ग आहे. हे फॅन्स लिओनार्डोच्या प्रत्येक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतात. त्यामुळे लिओनार्डोच्या फॅनफॉलोइंगमध्ये एक सातत्य दिसून आलं आहे. 45 गुणांसह लिओनार्डो डिकॅप्रिओ स्कोर ट्रेंड्स चार्टवर पाचव्या रँकिंगवर आहे.
स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल या रँकिंगविषयी सांगतात की, “निसंदेहपणे संपूर्ण भारतात अव्हेंजर्स हा सर्वाधिक पाहिला गेलेला हॉलीवूड चित्रपट आहे आणि म्हणूनच या चित्रपटातील अभिनेते रॉबर्ट डाउनी ज्युनियर, क्रिस हेम्सवर्थ आणि क्रिस्टोफर इवांस भारतीय लोकप्रियतेच्या यादीत अग्रेसर स्थानावर दिसून आले आहेत.”
कसं ठरतं हे रँकिंग
अश्वनी कौल याबाबत पूढे सांगतात की, “आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजीटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक अल्गोरिदममुळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंगपर्यंत पोहोचू शकतो.”
हेही वाचा –
दबंग सलमान खान बनला बॉलीवूड ‘किंग’ तर देसी गर्ल प्रियांका बॉलीवूड ‘क्वीन’
दक्षिणेची आजही पहिली पसंती ‘थलायवा’ रजनीकांत
वेबसीरिजमध्ये सॅक्रेड गेम्स आणि मिर्जापूरच सर्वाधिक लोकप्रिय
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade