बॉलीवूड

सूर्यवंशीसाठी रोहीत शेट्टीचा अनोखा प्रमोशन फंडा, असा करणार प्रचार

Trupti Paradkar  |  Oct 14, 2021
Rohit Shetty to follow a unique marketing strategy for Sooryavanshi

सिनेमागृहे बंद असल्यामुळे मागील दोन वर्षांपासून रोहीत शेट्टीचा सूर्यवंशी चांगलाच रखडला आहे. वास्तविक सिंघम आणि सिम्बानंतर प्रेक्षक सूर्यवंशीची आतूरतेने वाट पाहत होते. रोहीत शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी मध्ये अक्षय कुमारचा कॉप ड्रामा पाहायला मिळणार आहे. अनेक वेळा प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलत आता फायनली दिवाळीला म्हणजे पाच नोव्हेंबरला सूर्यवंशी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. मात्र प्रदर्शनाची  तारीख जवळ आली तरी रोहीत शेट्टीचा प्रमोशन प्लॅन प्रेक्षकांना समजू शकला नाही. कारण पहिला ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अजूनही चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झालेला नाही. यावरून रोहीत या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काहितरी खास करत असल्याचं जाणवत आहे.

दुर्गापूजा करताना अभिनेत्री काजोल अचानक लागली रडायला, का झाली इतकी भावूक

सूर्यवंशीचे हटके प्रमोशन

रोहीतने असा निर्णय घेतला आहे की तो यावेळी सूर्यवंशीचे नेहमीप्रमाणे प्रमोशन करणार नाही. यासाठीच त्याने अजूनही सूर्यवंशीचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित केलेला नाही. कारण या चित्रपटाचा पहिला ट्रेलर खूप मोठा होता आणि त्यातून प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथानकाचा अंदाज आला होता. आता दुसरा ट्रेलर प्रदर्शित करून चित्रपटाची कथा पूर्णपणे उघड करण्याचा त्याचा मुळीच विचार नाही. उलट थोड्या हटके पद्धतीने तो सू्र्यवंशीच्या प्रमोशनची आखणी करत आहे. या चित्रपटासाठी त्याने प्रिंट माध्यमाचा वापर करण्यासही नकार दिला आहे. डिजिटल माध्यमातूनच पण जरा वेगळ्या पद्धताने तो सूर्यवंशीबद्दल उत्सूकता निर्माण करणार आहे. यासाठी त्याने चित्रपटाच्या ट्रेलर ऐवजी यातील चित्रपटातील तीन गाणी आधी सर्वांसमोर आणणार आहे. याचाच अर्थ रोहीतने आता सूर्यवंशीसाठी प्रमोशन स्ट्रॅटजीच चेंज केली आहे. प्रमोशनसाठी खूप कमी वेळ राहिला असल्याने तो शहरा शहरांमध्ये मोठमोठ्या होर्डिंगचाही वापर करणार आहे. 

बिग बीच्या पायाच्या बोटाला झाली दुखापत, ही युक्ती वापरत शूटिंग केलं पूर्ण

चित्रपटातील अफलातून गाणी

रोहीत शेट्टीच्या मते सूर्यवंशीच्या प्रमोशनसाठी या चित्रपटातील फक्त तीन गाणीच पुरेशी आहे. यातील आयला रे आयला हे गाणं तर लोकांमध्ये धमाल निर्माण करणार आहे. कारण या गाण्यात रोहीतचे सिंघम, सिम्बा आणि सूर्यवंशी एकत्र दिसणार आहेत. एकाच गाण्याच्या बीटवर जेव्हा अजय देवगण, रणवीर सिंह आणि अक्षय कुमार एकत्र दिसतील तेव्हा प्रेक्षक त्यांना पाहण्यासाठी नक्कीच सिनेमागृहाकडे वळतील अशी त्याला अपेक्षा आहे. शिवाय या चित्रपटात अक्षय कुमार आणि कतरिना कैफचे टिप टिप बरसा पानी हे गाणंही एका हॉट अंदाजमध्ये सादर केलं जाणार आहे. रोहीतच्या मते ही दोन्ही गाणी सोशल मीडिया सेंसेशन ठरणार आहेत. सूर्यवंशी हा एक मसालेदार मनोरंजन करणारा चित्रपट आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत असणार आहेत. शिवाय रोहीत चा सिंघम म्हणजेच अजय देवगण आणि सिम्बा म्हणजेच रणवीर सिंह स्पेशल कॅमियो मध्ये असणार आहेत. सूर्यवंशी रोहीत शेट्टी दिग्दर्शित करत असून त्यासोबत करण जौहर निर्मित्याच्या भूमिकेत असणार आहे. आता  हा बिग बजेट चित्रपट दिवाळीला प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा धुमधडाका घेऊन येण्यास सज्ज झाला आहे.

ती’ आणि ‘ती’ पण आहे रीना मधुकरच्या आयुष्यातील आदिशक्ती

Read More From बॉलीवूड