बॉलीवूड

या कारणासाठी बदलली बहुचर्चित ‘आरआरआर’ चित्रपटाची रिलीज डेट

Trupti Paradkar  |  Sep 13, 2021
या कारणासाठी बदलली बहुचर्चित ‘आरआरआर’ चित्रपटाची रिलीज डेट

बहुचर्चित आरआरआर चित्रपट तेरा ऑक्टोबरला प्रदर्शित होणार होता. मात्र आता या चित्रपटाची नवी रिलीज डेट जाहीर केली जाणार आहे. तेरा ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित होईल अशी घोषणा निर्मात्यांनी मोठ्या उत्साहात केली होती.एस.एस.राजमौली चित्रपटात हे भव्य दिव्यता आणि अॅक्शन सीन्स साठी नेहमीच पाहण्यासारखे असतात. ज्यामुळे सहाजिकच प्रेक्षकांनाही या चित्रपटाबाबत खूपच उत्सुकता लागलेली आहे. मात्र काही कारणांसाठी आता या चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलेले आहे. 

माही विजने पती जय भानूशालीला केले इन्स्टाग्रामवर ब्लॉक, कारण वाचून व्हाल हैराण

का ढकललं आरआरआरचं प्रदर्शन पुढे

आरआरआर मुव्हीजच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरून निर्मात्यांनी ही गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सहाजिकच ही पोस्ट वाचून चाहते काहिसे नाराजदेखील झाले आहेत. मात्र निर्मात्यांनी हा निर्णय प्रेक्षकांच्या हितासाठी आणि सुरेक्षेसाठी घेतलेला आहे. याचं कारण असं की अनलॉकनंतरही अजूनही चित्रपटगृहांना सरकार कडून परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे देशभरातील सर्व चित्रपटगृहे सुरू होण्यास अजून काही दिवसांचा अवकाश लागण्याची शक्यता आहे. जर ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व चित्रपटगृहे सुरूच झाली नाहीत तर चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकणार नाही. शिवाय आरआरआर हा चित्रपट प्रेक्षकांनी फक्त चित्रपटगृहातच पाहावा अशा पद्धतीचा बनवलेला आहे. म्हणूनच सावधपणे आधीच निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख बदलली आहे. याबाबत ट्विटमध्ये असं शेअर करण्यात आलेलं आहे की, आरआरआर चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शन पूर्ण झालेलं असून चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी तयार आहे. पण, तरिही आम्ही चित्रपटगृहे पूर्णपणे सुरू न झाल्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलत आहोत.  नवीन तारिख आताच सांगता येणार नाही. पण चित्रपटगृहे सुरू होताच आम्ही लवकरात लवकर चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करू”

नागाचैतन्य आणि समांथामधील वाद मिटवण्याचा नागार्जुन करत आहेत प्रयत्न

युट्युबर कॅरी मिनाटी अडचणीत, दिल्लीत गुन्हा दाखल

‘आरआरआर’ ची प्रेक्षकांना उत्सुकता

आर.आर. राजमौलीनच्या आरआरआरमधील भव्य दिव्यता फक्त चित्रपटगृहातच अनुभवण्यासारखी असेल. त्यामुळे हा चित्रपट सिनेमागृहे सुरू झाल्यावरच पाहण्यात मजा आहे. या चित्रपटात एनटीआर ज्युनिअर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट अशा दिग्गज कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती डीवीवी दानय्या द्वारा केली गेली असून भारताचा सर्वात प्रसिद्ध चित्रपट निर्माता एस. एस राजमौलीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे आता कधी एकदा सर्व पुर्ववत होतं आणि सिनेमागृहात हा चित्रपट पाहता येतो असं प्रेक्षकांना झालेलं आहे. 

Read More From बॉलीवूड