कपिल शर्मा हा टेलिव्हिजन माध्यमातील एक जबरदस्त स्टार आहे. ‘The Kapil sharma show’ च्या माध्यमातून त्याने अनेक चाहत्यांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. लंडन बुक ऑफ रेकॉर्डच्या मते ‘दी कपिल शर्मा शो’ जगभरात पाहिला जाणारा एक लोकप्रिय शो आहे. मात्र या लोकप्रियतेसोबतच कपिल शर्मा नेहमी काही वादांमध्ये देखील अडकला आहे. ज्याचा परिणाम त्याच्या शो आणि लोकप्रियतेवर झाला होता. यासाठी या शोचा निर्माता आणि बॉलीवूडचा भाईजान सलमान खानने कपिलला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
कपिलच्या आयुष्यातील चढ-उतार
दोन वर्षांपूर्वी कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोव्हर यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता. ज्यामुळे सुनिल ग्रोव्हरला कपिलच्या शोमधून बाहेर काढण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर कपिलच्या शोचा टीआरपी मोठ्या प्रमाणावर घसरला होता. ज्यामुळे निर्मात्यांना शो बंद करावा लागला होता. या शो व्यतिरिक्त कपिलचे वादग्रस्त ट्विटही त्याच्यासाठी त्रासदायक ठरले. या सगळ्यानंतर तो पुन्हा कमबॅक करु शकेल अशी शक्यताही वाटत नव्हती. त्याचा कॉमेडी नाईट विथ कपिल हा शो पुन्हा सुरु झाला पण काही कारणांमुळे तो पुन्हा बंद झाला. ज्यामुळे कपिल तणावाखाली गेला. त्या काळात तो मानसिक ताणाखालीच वागत होता होता. त्याची ती अवस्था पाहून त्याचे फॅनही बिथरले होते. हा शो परत सुरु होणार की नाही अशी अनेकांना शंका होती. पण कपिलने आता कमबॅक केलं आहे आणि सर्व काही पुन्हा सुरळीत सुरू झालं आहे.
सलमानने काय दिला कपिलला सल्ला
अनेक चढ-उतार सहन करत कपिलने पुन्हा एकदा आपलं स्थान पटकावलं आहे. कपिल शर्मा शोला सर्वात जास्त लोकप्रियता आज मिळत आहे. मात्र कपिलच्या या यशामागे अभिनेता सलमान खानचं खूप मोठं योगदान आहे. दी कपिल शर्मा शोचा निर्माता सलमान खान आहे. सलमानने वेळोवेळी कपिलला मदत केली आहे. आता सलमानने कपिलला आणखी एक सल्ला दिल्याची बातमी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कपिलचा शो सध्या यशाच्या शिखरावर पोहचला आहे. या शोला सर्वात जास्त टीआरपी आहे. यासाठीच सलमानने कपिलला वादविवादांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्याने कपिलला सल्ला दिला आहे की, “ पुन्हा असा कोणताही वाद निर्माण करू नकोस. ज्यामुळे या शोवर परिणाम होईल.” कपिलनेदेखील सलमानचा हा सल्ला ऐकला आहे. कारण त्याला त्याची लोकप्रियता आणि सलमानसारखा निर्माता मुळीच गमवायचा नाही.
कपिल शर्मा लवकरच होणार बाबा
कपिलने 12 डिसेंबर 2008 रोजी त्याची बालमैत्रीण गिन्नी चतरथ हिच्याशी विवाह केला. कपिलचे लग्न हे बी टाऊनसाठी एक सोहळाच होता. त्याच्या लग्नसोहळ्यालाही बी टाऊनमधील दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यामुळे कपिलचे लग्न अगदी धुमधडाक्यात झाले होते. आता लवकरच कपिल बाबा होणार असल्याची चर्चा आहे. डिसेंबरमध्ये कपिल आणि गिन्नी आई-बाबा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. यासाठीच गिन्नीसोबत वेळ घालवण्यासाठी कपिल सध्या एका छोट्या ब्रेकवर आहे. कपिल आणि गिन्नी कॅनडामध्ये सध्या त्यांच्या बेबीमूनचा आनंद घेत आहेत.
अधिक वाचा
अभिनेता गोविंदाचा दुसऱ्या लग्नाबद्दल खुलासा, पहिलं लग्नही लपवलं होतं
सनी लिओनच्या चुकीने होतोय एका व्यक्तीला त्रास
कपिल शर्माची ‘रिंकू भाभी’ शोमध्ये परतणार ?
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje