बॉलीवूडमध्ये दरवर्षी स्टार किड्स लाँच होतच असतात. त्यापैकीच एक स्टारकिड म्हणजे अभिनेत्री सारा अली खान. ‘केदारनाथ’ या चित्रपटातून साराने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. तर साराचा लहान भाऊ तैमूर हा सोशल मीडियाचा फेव्हरेट आहे. त्यामुळे अभिनेत्री सारा अली खान आणि तिचा लहान भाऊ तैमूर हे दोन्ही स्टार किड्स गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहेत.
करीना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खान आपल्या जन्मापासूनच सोशल मीडियाचा लाडका आहे. तर अमृता सिंग आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान गेल्या काही महिन्यांपासून आपल्या बॉलीवूड डेब्यूमुळे मीडियामध्ये चर्चेचा विषय आहे. मुख्य म्हणजे या भावाबहिणींमध्ये एक सुंदर नातं आहे. सारा नेहमीचं तैमूरचे लाड करताना दिसून येते. पाहा त्यांचा हा क्यूट फोटो –
सारा आणि तैमूरमध्ये अनोखी चढाओढ
सिंबा सिनेमाच्या यशामुळे बॉलीवूडच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत गणली जात असलेली सारा आणि बॉलीवूडमधला सर्वात लोकप्रिय स्टारकिड तैमूर हे दोघंही आपल्या आई-वडिलांपेक्षा जास्त लोकप्रिय स्टार-किड्स आहेत.
या ‘टॉक ऑफ द टाऊन स्टार किड्स’च्या लोकप्रियतेची तुलना स्कोर ट्रेंड्स इंडियाने केलेल्या आकडेवारी नुसार डिजीटल न्यूज, न्यूजपेपर आणि व्हायरल न्यूजमध्ये 100 गुणांसह सारा अली खान पूढे असून ‘बेबी तैमूर’ने डिजीटल न्यूजमध्ये 4 टक्के, न्यूजपेपर कव्हरेजमध्ये 12 टक्के आणि व्हायरल न्यूजमध्ये 42 टक्के गुण मिळवलेले आहेत.
व्हायरल न्यूजमध्ये अव्वल तैमूर
स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या सहसंस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “तैमूर अली खानची व्हायरल न्यूजमध्ये मजबूत पकड आहे. तो एकुलता एक स्टारकिड आहे, ज्याच्या घराबाहेर त्याच्या एका फोटोसाठी कित्येक तास मीडिया ताटकळत उभी असते आणि त्याचा एक फोटो इंटरनेटवर आल्यावर मिळणा-या लाइक्सची संख्या लाखांमध्ये जाते. पण तैमूर आपल्या अपिअरन्सशिवाय न्यूजमध्ये नाही.
पण त्याची मोठी बहीण सारा आपल्या डिसेंबरमध्ये रिलीज झालेल्या दोन्ही फिल्म्समुळे न्यूजप्रिंट, डिजीटल न्यूज आणि सोशल मीडियावर सर्वत्र आहे. तिचे इंटरव्ह्यूज, अवॉर्ड फंक्शनमधला प्रेजेंस, बॉलीवूड मॅगझिनच्या कव्हरपेजेसवरसुध्दा ती झळकली आहे. त्यामुळे तिच्याविषयीच्या बातम्या सातत्याने येत असतात.“
कशी ठरली आकडेवारी
सारा आणि तैमूर हे दोघंही इतके प्रसिद्ध आहेत की, त्यांच्यातील सर्वाधिक लोकप्रिय कोण, हे ठरवणं खरंच कठीण आहे. या आकडेवारीच्या निकषाबाबत सांगताना अश्वनी कौल म्हणाल्या की, “आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजीटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक अल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. त्यामुळेच आम्हाला बॉलीवूड सेलिब्रिटींचा स्कोर आणि रँकिंग मिळवणं शक्य होतं.”
हेही वाचा –
2 ऱ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा क्यूट तैमूर अली खान
लव आज कल 2 मध्ये करणार सारा अली खान आणि कार्तिक आर्यन रोमान्स
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje