Periods

एकत्र राहणाऱ्या मुलींची मासिक पाळीची तारीख का येते पुढेमागे, जाणून घ्या सत्य

Dipali Naphade  |  Dec 16, 2019
एकत्र राहणाऱ्या मुलींची मासिक पाळीची तारीख का येते पुढेमागे, जाणून घ्या सत्य

तुम्ही कधी ही गोष्ट नोटीस केली आहे का? तुमची रूममेट असो वा तुमची मैत्रीण. बऱ्याचदा तुमची मासिक पाळी ही  एकत्र येते. बऱ्याचदा तुमच्या डेट्स वेगळ्या असतात पण तरीही तुमची मासिक पाळी लागोपाठ येते. जास्त मुलींनी ही गोष्ट नक्कीच नोटीस केली असेल. शिवाय काही वेळा तर आपण असं ऐकलं पण असेल की, एखादी मुलगी दुसऱ्या मुलीला सांगते, ‘तुला पाळी आली आहे तर तुझी सावली माझ्यावर पडू दे गं बाई’ पण खरंच असं असतं का? एकत्र असणाऱ्या मुलींची मासिक पाळी ही पुढेमागे असते का? किंवा एखाद्या मुलीला मासिक पाळी आली आहे तर दुसरीला तिच्यामुळे मासिक पाळी येते का? असे प्रश्न मनात असतात पण त्याची उत्तरं सहसा मिळत नाहीत. पण या लेखातून आम्ही ही उत्तरं मिळवून द्यायचा प्रयत्न करणार आहोत. नक्की जाणून घेऊया काय आहे यामागचं सत्य. काय आहे कारण. 

मासिक पाळी अनियमित होण्यामागची कारणं

काय आहे पिरियड सिकिंग?

Shutterstock

बऱ्याच मुलींंना असा विश्वास आहे की, मासिक पाळी असणाऱ्या मुलींसह राहिल्यानंतर त्यांना मासिक पाळी येते. यालाच पिरियड सिकिंग असं म्हटलं जातं. पिरियट सिंकिंगला मेन्स्ट्रूअल सिंक्रॉनी, मॅकक्लिंटॉक इफेक्ट असंदेखील म्हटलं जातं. असं म्हटलं जातं की, एखाद्या महिलेची पाळी चालू असेल आणि ती दुसऱ्या महिलेच्या संपर्कात आली तर दोघांचीही मेन्स्ट्रूअल सायकल मॅच करू लागतात. पण हे होण्याचं नक्की कारण काय? तर असं होतं कारण शरीरातून येणारे फेरोमोन्स (एक प्रकारचे बॉडी केमिकल्स). फोरोमन्समुळे हे शक्य होतं. त्यामुळे जेव्हा महिलांना असं वाटतं की असं शक्य असतं तर ही गोष्ट नक्कीच खरी आहे. यामध्ये तत्थ्य आहे. याबद्दल अजूनही अभ्यास चालू आहे. काही प्रमाणात हे अजून सिद्ध झालं नसलं तरीही बऱ्याच ठिकाणी असं सांगण्यात आलं आहे आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं हे आहे की, अनेक महिलांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. जसं पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेतल्या पण दुसरीच्या संपर्कात आल्यामुळे पाळी आली असं बरेचदा होतं.

मासिक पाळीच्या समस्या आणि त्यावरील उपाय

मॅकक्लिंंटॉक इफेक्ट म्हणजे नक्की काय

Shutterstock

मासिक पाळी मॅच करण्याची गोष्ट ही अनेक काळापासून अस्तित्वात आहे. यासाठी मेडिकल सायन्समध्ये एक रिसर्च करण्यात यावा असंही म्हटलं गेलं. मार्था मॅकक्लिंटॉफ नावाच्या रिसर्चरने 135 कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींवर हा रिसर्च केला. या मुलींना एकत्र ठेवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची मासिक पाळीच्या सायकल्स मॅच झाल्या. त्यामुळे या गोष्टीला मॅकक्लिंटॉफ इफेक्ट असंही म्हटलं जातं. या रिसर्चमध्ये बाकी फॅक्टर्स शोधण्यात आले नाहीत तर मुलींची मासिक पाळी कधी सुरू झाली ते बघण्यात आलं. बऱ्याच मुलींच्या मासिक पाळीची तारीख ही एकच आली. त्यामुळे या गोष्टीला मॅकक्लिंटॉफ इफेक्ट असं नाव देण्यात आलं आहे. 

मासिक पाळीच्या स्वच्छतेचे महत्त्व माहीत आहे का तुम्हाला

नुकत्याच झालेल्या अभ्यासातूनही झालं सिद्ध

यानंतर या गोष्टींवर अनेक लोकांनी अभ्यास केला. एकत्र राहणाऱ्या मैत्रिणींंची मासिक पाळीची तारीख ही सिंक होते. 2017 मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात सहभागी झालेल्या 44 टक्के महिलांना एकत्र पाळी आली. इतकंच नाही मासिक पाळीच्या दरम्यान होणारी लक्षणंही या महिलांना एकत्रच सुरू झालेली दिसली. यामधून एकत्र राहणाऱ्या मुलींंची पाळी सहसा एकत्र येते हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे हे सत्य असून त्याचं महत्त्वाचं कारण नक्की काय आहे हे आता तुम्हालाही कळलं असेल. केवळ पूर्वीपासून सांगितलं जात आहे म्हणून मासिक पाळीबद्दल महिला असं वक्तव्य करत नाहीत. तर त्यामागे अशा प्रकारचं वैज्ञानिक कारण असून एकत्र राहिल्याने नक्कीच मासिक पाळीची तारीख एकत्र येऊ शकते.

Read More From Periods