वजन कमी करण्याची हुक्की खूप जणांना अधून-मधून येतेच. पण वजन कमी करण्यासाठी अनेकदा चुकीच्या पद्धतीचा डाएट अवलंबला जातो. तर अनेकांना वजन कमी करणे म्हणजे उपवास करणे असे वाटते. म्हणून खूप जण उपाशी राहून स्वत:चे हाल करुन घेतात. पण तसे करुन तुम्ही तुमचे निरोगी आरोग्य धोक्यात घालत आहात हे लक्षात राहू द्या कारण असे करुन तुम्हाला केवळ हॉस्पिटलच्या पायऱ्या चढाव्या लागतील आणखी काही नाही. डाएट म्हणजे उत्तम खाणे हे तुम्हाला आधीही आम्ही सांगितले आहे. तुमच्यासोबत आम्ही परफेक्ट फिगरसाठी परफेक्ट डाएटही शेअर केला आहे. पण तुम्हाला वजन कमी करायची खरचं खूप घाई असेल आणि तुम्हाला योग्य डाएट करायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. तुमच्यासोबत आम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट (7 divsat vajan kami karnyasthi diet plan) शेअर करणार आहोत जो केवळ ७ दिवसात तुमचे वजन कमी करु शकेल. सात दिवसात वजन कमी करणे तुमच्या यादीत असेल तर मग करा सुरुवात
Table of Contents
GM डाएट म्हणजे काय? (What Is GM Diet)
GM Diet काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचा फुलफॉर्म आहे ‘General Motors’ हा डाएट प्लॅन खास त्यांनी तयार केलेला असून त्या मागील खरे उद्दिष्ट कामगारांमधील कामाची उर्जा वाढवणे असा आहे. हा डाएट प्लॅन १९८५ पासून आहे. सात दिवसांच्या या डाएटमध्ये प्रत्येक दिवशी तुम्हाला वेगवेगळे खाण्याचा सल्ला दिला जातो. GM डाएट म्हणजे वेगळे काही नाही तर कामगारांसाठी तयार केलेला डाएट आहे. हे डाएट २ ते ६ किलो वजन कमी करण्याचा दावा करतो.
डाएटसाठी स्वत:ला तयार करताना (How To Prepare Yourself For Diet)
‘डान्स एक आर्ट है एक कला’ हा दीपिकाचा डायलॉग तुम्हाला आठवत असेल तर तिने हॅपी न्यू इयर या चित्रपटात हा म्हटला आहे. यात तिने डान्ससाठी स्वत:ला वाहून घेतले होते. आता डाएट म्हणजे एक प्रकारची साधनाच आहे. कारण डाएट करताना तुम्हाला बऱ्याच गोष्टी टाळायच्या असतात आणि काही गोष्टी पाळायच्या असतात.त्यामुळे तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या मनावर आणि जीभेवर ताबा मिळवायचा आहे. जी सोपी गोष्ट नाही. एकदा आरशात उभे राहा तुमचे शरीर नीट न्याहाळा. तुम्हाला तुमचे शरीर फिट वाटते का पाहा. तुमचे पोट..तुमच्या मांड्या, तुमचे दंड नीट आहेत का? जर तुमच्या शरीरावर अतिरिक्त मांस वाढले असेल तर तुम्हाला या डाएटची गरज आहे हे समजा. हा डाएट करण्याआधी तुम्हाला काही गोष्टी करायला लागतील. लवकर वजन कमी करण्यासाठी हे उपाय तुमच्यासाठी आहेत उपयुक्त
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे ‘किटो डाएट’
भरपूर पाणी प्या (Increase Water Intake)
तुमचे संपूर्ण आरोग्य पाण्यावर अवलंबून असते. शरीरासाठी पाणी खूप महत्वाचे आहे. डाएटमध्येही पाण्याचे महत्व आहे. कारण तुम्ही जितके पाणी प्याल तितके टॉक्झिक तुमच्या शरीरातून बाहेर पडेल. शिवाय पाणी प्यायलामुळे तुमचे पोट भरते आणि तुम्हाला काहीही खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे खाण्याच्या योग्यवेळा वगळता तुम्हाला काहीही खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही पाणी प्या. पोट कमी करण्याचे घरगुती उपाय तुम्ही वाचले असतील तर तुम्हाला यामध्ये पाणी पिण्याचा सल्ला नक्की दिसेल.
*आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्वाची आहे की, तुम्हाला पाणी प्यायला सांगितले आहे. म्हणून सतत पाणी पित राहू नका. त्याने देखील तुम्हाला त्रास होऊ शकतो. साधारण प्रत्येक तासाला एक ग्लास पाणी प्याच. तासाभराने पाणी प्यायची सवय तुम्हाला लावायची आहे
हल्ली प्ले स्टोअरमध्ये अनेक अॅप आहेत जे तुम्हाला पाणी पिण्याची आठवण करुन देतात. जर तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्ही हे अॅप डाऊनलोड करु शकता. या अॅपच्या मदतीने तुम्हाला योग्यवेळी पाणी पिण्याची सवय लागेल.शिवाय तुमच्या वजनानुसार तुम्हाला किती पाणी प्यायला हवे ते देखील यामुळे कळेल
Also Read Best Dietitian In Pune In Marathi
2. मद्यप्राशन करा बंद (Avoid Alcohol)
तुमचे वजन वाढण्यामागे दारुचे सेवन हे देखील एक कारण आहे. तुम्ही वजन कमी करायचे ठरवले असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी मद्य सेवन बंद करायचे आहे. मद्यसेवन बंद करणे ही चांगली सवय आहे. त्यामुळे तुम्हाला वजन आणि सवय या दोन्ही गोष्टींचा विचार करायचा आहे. जर तुम्हाला कुठलेच व्यसन नसेल तर छानच आहे की, कारण तुम्ही पटकन डाएटला सुरुवात करु शकता.
3. डॉक्टरांचा सल्ला (Take Doctor’s Advice)
कोणतीही नवी गोष्ट ट्राय करण्याआधी तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. कारण तुम्हाला जर काही त्रास असतील तर तुम्ही हा डाएट करायला हवा की, नको हे तुम्हाला तुमचे डॉक्टर अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. त्यामुळे डॉक्टरांनी होकार दिल्यानंतरच हे डाएट करा.
वाचा – त्वचेसाठी बीट खाण्याचे फायदे
4. व्यायाम (Exercise)
नुसत्या खाण्या पिण्याच्या सवयींवर तुमचे वजन असते असे नाही. तर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचाल करणे महत्वाचे असते. त्यामुळे या सात दिवसांमध्ये तुम्हाला व्यायामदेखील करायचा आहे. तुम्ही नेमका कोणता व्यायाम करणार आहात त्याचेही एक वेळापत्रक बनवून घ्या. वजन कमी करण्यासाठी योगासने सुद्धा आहेत ती तुम्ही अगदी घरच्या घरी करू शकता.
5. चला खरेदीला (Lets Go Shopping)
आता ७ दिवसांचे डाएट म्हणजे सोपी गोष्ट थोडीच आहे. तुम्हाला बऱ्याच गोष्टी घरी आणून ठेवायच्या आहेत. केळी, सफरचंद, खरबुज, कलिंगड, संत्री, पेरु अशी फळे तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये आणायची आहेत. तर भाज्यांमध्ये तुम्हाला काकडी, कोबी, ब्रोकली, टोमॅटो, पालक, फ्लॉवर, बटाटा अशा भाज्या आणायच्या आहेत. भाज्या आणि फळे हे सगळे घरी आणून ठेवा. आता तुम्ही सात दिवसांचा हा GM डाएट करण्यासाठी एकदम तयार आहात. ७ दिवस यांचे सेवन करायचे कसे ते पाहुया.
तुम्हालाही हवेत का सेक्सी थाईज?
७ दिवसांचा वजन कमी करण्याचा डाएट प्लॅन (7 Day Diet Plan For Weight Loss In Marathi)
७ दिवसांचा डाएट प्लॅन आपण पाहत आहोत. या सात दिवसात काय आणि कधी खायचे याच्या वेळा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. शिवाय तुमचे खाणे चार वेगवेगळ्या मिलमध्ये वाटण्यात आले आहे. त्यानुसार सकाळचा नाश्ता, मिड मॉर्निंग स्नॅक, दुपारचे जेवण, पोस्ट लंच स्नॅक, संध्याकाळचे स्नॅक आणि रात्रीचे जेवण अशी ही फोड करण्यात आली असून त्यानुसारच तुम्हाला जेवण करायचे आहे. शिवाय पोट कमी करण्यासाठी हा डाएट प्लॅन अगदी परफेक्ट आहे.
दिवस १ (Day 1)
आजपासून तुम्हाला तुमच्या डाएटला सुरुवात करायची आहे. थोडासा त्रास होईल कारण तुम्हाला बदल अगदीच पटकन जमेलच असे नाही. पण तुम्हाला तरीही स्वत:वर विश्वास ठेवून हा दिवस सुरु करायचा आहे.
सकाळचा नाश्ता (Morning Breakfast)
सकाळचा नाश्ता हा पोटभरीचा असला पाहिजे. जर तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली झाली तर तुमचा दिवसही चांगला जातो. तुमच्या दिवसाची सुरुवात छान फळांनी करायची आहे. खरबूज, पपई आणि सफरचंद असे मिक्स फळे तुम्हाला खायची आहेत. त्यावर तुम्हाला १ ते २ ग्लास पाणी प्यायचे आहे. सकाळी फळे खाण्यामागचे कारण म्हणजे फळांमध्ये फायबर असते. जे तुमच्या शरीरासाठी चांगले असते. शिवाय फळे गोड असल्यामुळे गोड खाण्याची इच्छा देखील मरुन जाते. वजन कमी करण्यासाठी डाएट तुम्ही सुरु केला असेल तर तुमच्या दिवसाची सुरुवात अशी व्हायला हवी.
मॉर्निंग स्नॅक (Morning Snacks)
तुम्ही कितीही नाश्ता केला तरी तुम्हाला त्यानंतर काहीवेळाने भूक लागतेच. ती भूक तुम्हाला मारायची नाहीए. तर त्या वेळेत तुम्हाला एक बाऊलभर खरबुजाचे तुकडे चालू शकतील. त्यावर तुम्हाला २ ग्लास पाणी प्यायला विसरायचे नाही.
दुपारचे जेवण (Lunch)
आता येते दुपारच्या जेवणाची वेळ..दुपारच्या जेवणातही तुम्हाला फळेच खायची आहेत. सगळ्यात आधी तुम्हाला १२ ते २ या वेळेमध्ये जेवायचे आहे. जेवणात तुम्हाला सफरचंद आणि कलिंगड खायचे आहे. जर तुम्हाला किवी खाणे शक्य असेल तर किवी खाल्ले तरी चालेल. जर तुम्हाला फळे खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही किवीची स्मुदी करुनही खाऊ शकता. त्यानंतर तुम्हाला १ ते २ ग्लास पाणी प्यायचे आहेत.
पोस्ट लंच स्नॅक (Post Lunch Snack)
जर तुम्ही १२ ते ३ मध्ये जेवण केले. तर तुम्हाला नक्कीच साधारण तीन ते ४ वाजता पुन्हा भूक लागणार.. या भुकेच्यावेळी तुम्हाला एखादे संत्र किंवा मोसंब खायचे आहे. त्यावर पुन्हा १ ते २ ग्लास पाणी प्यायचे आहे.
इव्हिनिंग स्नॅक (Evening Snack)
आता ही ती वेळ जेव्हा तुम्ही ऑफिसमधून निघता. त्यावेळी तुम्हाला पुन्हा भूक लागते. अशावेळी पाणीपुरी, चाट खाण्याची इच्छा होते. त्यावेळी तुम्हाला एखादे नासपती किंवा पेअर खायचे आहे. त्यावर १ ते २ ग्लास पाणी प्यायचे आहे.पोट कमी करण्याचे घरगुती उपाय तुम्ही कुठे वाचले असतील तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की, संध्याकाळचा नाश्ता हा फारच महत्वाचा असतो.
रात्रीचे जेवण (Dinner)
रात्रीच्या जेवणातही पहिल्या दिवशी फळांचा समावेश असणार आहे. संत्र, किवी, पिअर, पेरु, खरबूज या फळांचे सेवन तुम्हाला करायचे आहे. पण रात्री जास्त पाणी असलेली फळे खाऊ नका. कारण ती पचण्यास कठीण असतात. त्यानंतर तुम्हाला पुन्हा २ ग्लास पाणी प्यायचे आहे.
*पहिल्या दिवशी कसे वाटेल ? (How Do You Feel On The First Day)
तुमचा पहिला दिवस अगदीच कठीण असेल कारण जर तुम्हाला खूप वेगवेगळ्या गोष्टी खाण्याची सवय असेल तर तुमच्यासाठी पहिला दिवस कठीण असेल. तुम्हाला थोडे थकल्यासारखे वाटेल. पण तुम्ही भरपूर भरपूर फळे आणि पाणी प्यायलेले प्यायल्यामुळे तुमचे पोटही साफ राहील.
दिवस दुसरा (Day 2)
दुसरा दिवस हा भाज्यांचा आहे. पहिला दिवस फक्त फळांचा गेल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी फळे खाण्याची फार इच्छा होणारही नाही. पण भाज्या कशा खायच्या यामध्येही एक शिस्त आहे. त्यानुसारच तुम्हाला भाज्या खायच्या आहेत.
सकाळचा नाश्ता (Morning Breakfast)
पहिल्या दिवशी शरीराला आवश्यक असलेले कार्बोहायड्रेट तुम्ही खाल्लेले नाही त्यामुळे पहिल्या दिवशी तुम्हाला एक उकडलेला बटाटा खायचा आहे. एक मध्यम आकाराचा बटाटा तुमची भूक भागवू शकेल. अगदीच उकडलेला बटाटा तुम्हाला खाल्ला जात नसेल तर तुम्ही त्यात थोडे बटर, काळेमिरी, लिंबू पिळू शकता. त्यानंतर त्यावर २ ग्लास पाणी प्या आणि तुमच्या दिवसाची सुरुवात करा.
हा परफेक्ट डाएट तुम्हाला देईल परफेक्ट फिगर
मॉर्निंग स्नॅक (Morning Snack)
कोबी आणि लेट्युसचे सलाद करुन खा. त्यावर जर तुम्हाला ऑलिव्ह ऑईल आवडत असेल तर तुम्ही त्याचे ड्रेसिंगही टाकू शकता.
दुपारचे जेवण (Lunch)
दुपारच्या जेवण तुम्हाला थोडे लाईट ठेवायचे आहे. तुम्हाला जास्तीत जास्त सलाद आज खायचा आहे. कोबी, काकडी, गाजर, कांदा याची कोशिंबीर बनवून खा. त्यावर २ ग्लास पाणी प्या.
पोस्ट लंच स्नॅक (Post Lunch Snack)
पोस्ट लंचमध्ये तुम्हाला वाफवलेली ब्रोकोली आणि अर्धा कप वाफवलेले बेल पेपर, त्यात थोडी काळीमिरी, मीठ आणि लिंबूदेखील पिळू शकता.
इव्हिनिंग स्नॅक (Evening Snack)
साधारण ४ वाजता तुम्हाला भूक लागल्यानंतर तुम्हाला उकडलेला फ्लॉवर खायचा आहे. त्यातही एखादे लाईट ड्रेसिंग वापरु शकता. त्यावर तुम्हाला दोन ग्लास पाणी प्यायचे आहे.
रात्रीचे जेवण (Dinner)
उकडलेले बीट,गाजर, फरसबी उकडून खायच्या आहेत. एक बाऊलभर तरी उकडलेल्या भाज्या खायच्या आहेत. त्यावर २ ग्लास पाणी प्यायचे आहे.
*आज कसे वाटेल? (How Would You Feel Today)
पहिला दिवस फळांचा असल्यामुळे किमान तुम्हाला ती फळे खावीशी वाटत होती. पण दुसरा दिवस कदाचित खाज्या न खाणाऱ्यांना आवडणार नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातून सगळ्या चांगल्या गोष्टी निघून गेल्यासारखे वाटेल.
बेली फॅट कमी करण्यासाठी हे करा सोपे उपाय
दिवस तिसरा (Day 3)
आजचा दिवस हा भाज्या आणि फळांच्या कॉम्बिनेशचा आहे. पहिले दोन दिवस तुम्हाला थोडे कठीण गेले असतील. पण हा दिवस तुमच्यासाठी थोडा इंट्रेस्टिंग असेल. आज तुम्हाला जास्तीत जास्त न्युट्रीशन मिळेल. तुमच्या शरीराला चांगला तजेला मिळेल.
सकाळचा नाश्ता (Morning Breakfast)
आज तुम्हाला एक उकडलेला बटाटा आणि एक सफरचंद खायचे आहे. हे दोन्ही पदार्थ तुम्हाला दिवसभरासाठी ताकद देऊ शकतील.
मार्निंग स्नॅक (Morning Snack)
१ पेअर, १ वाटी अननसचे तुकडे आणि १ ग्लास पाणी. आज तुमच्या डाएटमध्ये अननस आहे. अननसामुळे काही गोड खाण्याची तुमची इच्छा कमी होईल. १ ग्लास पाणी त्यावर प्यायला विसरु नका.
दुपारचे जेवण (Lunch)
आजचे जेवणही फळ आणि भाज्यांचे कॉम्बिनेशन असणार आहे. गाजर, काकडी, कांदा, लेट्युस असे काही सॅलेड करुन खा. आणि आवडत असल्यास काही उकडलेल्या भाज्या खाल्या तरी चालतील. त्यावर २ ग्लास पाणी प्या. त्यावर दोन ग्लास पाणी प्या.
पोस्ट लंच स्नॅक (Post Lunch Snack)
एक संत्र किंवा मोसंबी. त्यावर १ ग्लास पाणी
इव्हिनिंग स्नॅक (Evening Snack)
एक पेअर किंवा पेरु आणि १ ग्लासपाणी प्या
रात्रीचे जेवण (Dinner)
एक बाऊल उकडलेली ब्रोकोली, १/२ उकडलेले बीट, उकडलेली कच्ची पपई १/२ कप, जेवण थोडे मजेदार बनवण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचे ड्रेसिंग त्यात चिली फ्लेक्स ओरिगॅनो, काळीमिरी घातली तरी चालेल
*आज कसे वाटेल ? (How Would You Feel Today)
कंटाळा आलेला असेल. बेचव आणि उकडलेल्या भाज्यांनी तुम्ही कंटाळून जाल. पण तुमची इच्छाशक्ती सोडू नका.
दिवस चौथा (Day 4)
डाएटचा चौथा दिवस तुमच्यासाठी सरप्राईज आहे. कारण तुम्ही पहिले तीन दिवस फळे आणि भाज्या खात आहात. अशा भाज्या ज्यात कार्बस नाहीत. आता चौथ्या दिवशी तुम्ही कार्ब्स घालवल्यानंतर तुमच्या शरीराला मिनरल्स मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज केळी आणि दूध आणि सूप यांचा समावेश डाएटमध्ये केला जाणार आहे. मग आजचा डाएट प्लॅन काय आहे तो बघुया
सकाळचा नाश्ता (Morning Breakfast)
२ केळी आणि ग्लासभर दूध (नाश्त्यानंतर पाणी प्यायले नाही तरी चालेल. कारण तुम्ही दूध प्यायला आहात)
मिड मॉर्निंग स्नॅक (Mid Morning Snack)
बनाना शेक (१ केळ आणि १ ग्लास दूध)
दुपारचे जेवण (Lunch)
२ केळी आणि १ ग्लास दूध
पोस्ट लंच स्नॅक (Post Lunch Snack)
बनाना स्मुदी (१ केळ आणि १ ग्लास दूध)
इव्हिनिंग स्नॅक (Evening Snack)
१ पेअर किंवा १ पेरु
१ ग्लास पाणी
रात्रीचे जेवण (Dinner)
१ बाऊल व्हेजिटेबल सूप
२ ग्लास पाणी
*आज कसे वाटेल ? (How Would You Feel Today)
आज तुम्हाला केळी आणि दूधामुळे चांगले ताजेतवाने वाटेल. पोट भरल्यासारखे वाटेल. फक्त रात्री केवळ सूप प्यायलामुळे तुम्हाला थोडी बूक लागल्यासारखे वाटेल.
दिवस पाचवा (Day 5)
आजचा दिवस तुम्हाला आवडेल. कारण आज आहे प्रोटीन डे आहे. तुम्ही पहिले चार दिवस केवळ फळे, भाज्या आणि दूध खाल्ले आहे. त्यामुळे तुम्हाला थोडासा कंटाळाही आला असेल. तुम्हाला थोडा थकवाही जाणवेल तो भरुन काढण्यासाठी आज तुमच्या डाएटमध्ये पनीर असणार आहे. या शिवाय तुम्हाला आज उकडलेली कडधान्य खाता येणार आहे.
सकाळचा नाश्ता (Morning Breakfast)
२ टोमॅटो, १ वाटी कोणतेही मोड आलेले कडधान्य. त्यात मीठ, काळेमिरी आणि लिंबू पिळू शकता
२ ग्लास पाणी
मिड मॉर्निंग स्नॅक (Mid Morning Snack)
तव्यावर परतलेले तोफू/पनीर किंवा एक कप दही, २ ग्लास पाणी
दुपारचे जेवण (Lunch)
पालक पनीर, एका टोमॅटोचे स्लाईस त्यावर थोडे मीठ आणि दोन ग्लास पाणी
पोस्ट लंच स्नॅक (Post Lunch Snack)
एक बाऊलभर स्प्राऊट त्यात थोडा कांदा आणि लिंबाचा रस, चिमूटभर मीठ
२ ग्लास पाणी
इव्हिनिंग स्नॅक (Evening Snack)
१ वाटी दही
२ ग्लास पाणी
रात्रीचे जेवण (Dinner)
कोणतेही व्हेजिटेबल सूप, सोया चंकची कमी तेलातली पातळ भाजी किंवा स्क्रॅम्बल्ड पनीर
टोमॅटो आणि काकडीची कोशिंबीर (१ काकडी आणि दोन टोमॅटो)
२ ग्लास पाणी
दिवस सहावा (Day 6)
सहाव्या दिवसाचे हायलाईट्स सांगायचे तर आज नो टोमॅटो दिवस आहे. तुम्हाला तुमच्या शरीरात बदल झालेले दिसून येतील. आज तुमच्या डाएटमध्ये भाज्या, फळे, कडधान्य आणि डाळीचा समावेश असेल.
सकाळचा नाश्ता (Morning Breakfast)
१ बाऊल उकडलेल्या किंवा तव्यावर परतलेल्या मिक्स भाज्या
किंवा उकडलेली कडधान्य
२ ग्लास पाणी
मिड मॉर्निंग स्नॅक (Mid Morning Snack)
१/२ कप उकडलेला राजमा, त्यात तुम्ही आवडीनुसार मीठ, चाट मसाला घालू शकता
२ ग्लास पाणी
दुपारचे जेवण (Lunch)
१ मोठे बाऊल व्हेजिटेबल सूप
२ ग्लास पाणी
पोस्ट लंच स्नॅक (Post Lunch Snack)
१ सफरचंद, १ ग्लास पाणी
इव्हिनिंग स्नॅक (Evening Snack)
१ छोटी वाटी उकडलेली डाळ, त्यावर लिंबू पिळा
१ ग्लास पाणी
रात्रीचे जेवण (Dinner)
१ बाऊल उकडलेल्या भाज्या
१ ग्लास पाणी
दिवस ७ (Day 7)
आज तुमच्यासाठी खूप चांगला दिवस आहे कारण आज डाएटचा शेवटचा दिवस आहे. कारण आज भात आणि चपाती खाण्याचा दिवस आहे. आता तुम्हाला फार बरे वाटले असेल नाही का??, शिवाय तुम्ही या दिवसापर्यंत पोहोचलात याचाही तुम्हाला आनंद झाला असे.
सकाळचा नाश्ता (Morning Breakfast)
१ बाऊल कलिंगड किंवा खरबुजाचे तुकडे
१ ग्लास पाणी
मिड मॉर्निंग स्नॅक (Mid Morning Snack)
काही स्ट्रॉबेरीज किंवा गाजराचे तुकडे
१ ग्लास पाणी
दुपारचे जेवण (Lunch)
१ वाटी शिजवलेला ब्राऊन राईस सोबत एक बाऊल परतलेल्या भाज्या
२ ग्लास पाणी
पोस्ट लंच स्नॅक (Post Lunch Snack)
१ सफरचंद किंवा १ पेअर
१ ग्लास पाणी
इव्हिनिंग स्नॅक (Evening Snack)
१ पेरु
१ ग्लास पाणी
रात्रीचे जेवण (Dinner)
१ बाऊल मिक्स व्हेजिटेबल सूप, २ ग्लास पाणी
Note:
* जर तुम्हाला यात अंडी आणि चिकन खायचे असेल तर तुम्ही मिड मॉर्निंग आणि इव्हिनिंग स्नॅकमध्ये ते खाऊ शकता.
* सगळ्यात महत्वाचे हा डाएट तुम्हाला जमत नसेल तर हा डाएट करण्याचा सल्ला आम्ही देणार नाही
* सात दिवसांचा डाएट नीट केल्यावर तुम्हाला बदल जाणवेल. पण जर तुम्ही लगेच आठव्या दिवशी सगळे खायला घेतले तर त्याचा काहीही उपयोग नाही. तुम्हाला इतके स्ट्रिक्ट नाही पण तुमचे डाएट चांगले ठेवायचे आहे. आठवड्यातील एक दिवस चीट डे ठेवायचा आहे. तुम्हाला तुमच्यावर नियंत्रण ठेवायचे आहे. तरच या डाएटचा उपयोग
मीसुद्धा हे डाएट करायला घेणार आहे. तुम्हीही करुन तुम्हाला काय फरक जाणवला ते नक्की कळवा.
फोटो सौजन्य- Instagram
You Might Like These:
Follow These Perfect Diet For Perfect Figure In Marathi
Home Remedies For Weight Loss In Marathi
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade