बॉलीवूड

करिनाने मला लग्नाचे आमंत्रण… वाचा इतक्या वर्षानंतर काय म्हणाला शाहीद

Leenal GawadeLeenal Gawade  |  Jun 12, 2019
करिनाने मला लग्नाचे आमंत्रण… वाचा इतक्या वर्षानंतर काय म्हणाला शाहीद

करिना आणि शाहीद यांनी त्यांचा मागील काळ विसरुन त्यांच्या नव्या आयुष्यात चांगली रमली आहेत. पण अजूनही लोकांना त्यांच्या त्या ब्रेकअप स्टोरीमध्ये कायमच इंटरेस्ट आहे.आता पुन्हा एकदा एका टॉक शोमध्ये शाहीदने त्याच्या या जुन्या लव्हस्टोरीबद्दल काहीतरी नवे सांगितले आहे. शाहीदने अगदी बिनधास्तपणे आपले मन या टॉक शोमध्ये व्यक्त केले असून तो त्याच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दलही बरेच काही बोलला आहे.

नागिन 4 मध्ये विवेक दहीयासोबत दिसणार ही अभिनेत्री

करिनाने बोलावले का नाही?

नेहा धुपियाच्या टॉक शोमध्ये  यावेळी शाहीद कपूर गेस्ट म्हणून आला होता. या टॉक शो मध्ये त्याने अनेक गोष्टींंचा खुलासा केला. शाहीद कपूरला नेहाने करिनाबाबत प्रश्न विचारले.नेहाने विचारले की, करिनाने 2012 साली लग्न केले. त्यावेळी तुला बोलावले होते का ? त्यावेळी कोणतेही आढेवेढे न घेता शाहीद त्याच्या एकदम बिनधास्त अंदाजात म्हणाला की,  याला खूप काळ गेला आहे आणि मला करिनाने लग्नाचे आमंत्रण दिले हे आठवत नाही असे सांगून टाकले.

पण या एक्सने मला बोलावले

शाहीद नेहमीच त्यांच्या आयुष्याबद्दल खूप मोकळा राहिला आहे. तो काहीच लपवून ठेवत नाही. करिनाबाबत विचारल्यानंतर त्याची एक्स असलेल्या प्रियांका चोप्राबाबतही विचारण्यात आल्यावर तो म्हणाला की, गेल्यावर्षी प्रियांका आणि नीक यांनी लग्न केलं. त्यांच्या मुंबई रिसेप्शनला त्यांनी मला बोलावलं आणि मी त्या रिसेप्शनला गेलो होतो. असे सांगितले.

अनेक जुन्या आठवणींंना दिला उजाळा

आता हा टॉक शो आहे म्हटल्यावर या टॉक शोमध्ये बऱ्याच गोष्टींची चर्चा करणे हे आलेच. यावेळी त्याने त्याच्या करीअर आणि  फिल्मी करिअरविषयी अनेक गोष्टी सांगितल्या.ज्यामुळे शाहीद माणूस म्हणूनही प्रत्यक्ष आयुष्यात खूप वेगळा आणि खास आहे हे कळते. शिवाय तो मागच्या वाईट आठवणी विसरुन त्याच्या नव्या आयुष्यात खूश आहे. शिवाय सध्या त्याच्या करिअरची गाडीही सुस्साट असल्याचे कळते. 

कोणाची झाली इतकी हिंमत की, प्रियांकाच्या मारली थोबाडीत

या चित्रपटाची ऑफर नाकारुन केली चुकी

प्रत्येक जण करीअरमध्ये चुकीचे निर्णय घेतो. शाहीदच्या बाबतीतही तसेच काहीसे घडले आहे. शाहीदला आमीरच्या रंग दे बसंती या चित्रपटाची ऑफर आली होती. या चित्रपटात सिद्धार्थने साकारलेला रोल आधी त्याला ऑफर करण्यात आला होता. त्याने स्क्रिप्ट वाचल्यानंतर त्यालाही रडू कोसळले होते. पण काही कारणास्तव तो हा चित्रपट करु शकला नव्हता. त्याचे दु:ख आजही  मला आहे. मी कदाचित तो चित्रपट करायला हवा होता. असे देखील तो म्हणाला.

आता दिसणार कबीर सिंहमध्ये

साऊथच्या अर्जुन रेड्डी चित्रपटाचा रिमेक हिंदीमध्ये कबीर सिंह नावाने येत आहे. या चित्रपटात शाहीद कपूर मुख्य भूमिकेत आहे. 21 जून रोजी हा चित्रपट रिलीज होणार असून या चित्रपटात शाहीद सोबत किआरा अडवाणीदेखील आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने आधीच या चित्रपटाची उत्सुकता वाढवून ठेवली आहे.

विद्या बालनला समुद्राच्या लाटांसोबत खेळताना पाहून या अभिनेत्रीला आला राग

(फोटो सौजन्य- Instagram)

एकूणच काय बिनधास्त वावरणारा शाहीद कधीही त्याचे खासगी आयुष्य इतरांसमोर मांडायला कधीच घाबरत नाही.

Read More From बॉलीवूड