Diet

सकाळी रिकाम्या पोटी चहा-कॉफी घेतल्याने होऊ शकतं ‘हे’ नुकसान

Trupti Paradkar  |  Aug 20, 2019
सकाळी रिकाम्या पोटी चहा-कॉफी घेतल्याने होऊ शकतं ‘हे’ नुकसान

बाहेर मस्त पाऊस पडतो आहे, एखाद्या कामाला उत्साहाने सुरूवात सुरूवात करायची आहे, कामाचा थकवा अथवा मरगळ घालवायची आहे, मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारण्याची संधी हवी आहे मग एक कप चहा अथवा कॉफी सोबत हवीच. मात्र जर तुम्हाला ‘बेड टी’ अथवा ‘बेड कॉफी’ घेण्याची सवय असेल तर मात्र तुम्हाल सावध राहण्याची गरज आहे. कारण सकाळी उपाशी पोटी चहा अथवा कॉफी पिणं आरोग्यासाठी मुळीच हितकारक नाही. असं  असलं तरी सकाळी उठल्यावर पटकन फ्रेश वाटावं यासाठी अनेकजण उपाशीपोटी चहा अथवा कॉफी घेतात. कधीकधी प्रातःविधी होण्यासाठीदेखील चहा अथा कॉफी घेण्याची सवय अनेकांना असते. मात्र हळूहळू या गोष्टींची तुमच्या शरीराला सवय लागते. चहा – कॉफी घेतल्याशिवाय तुम्हाला फ्रेश वाटत नाही. वास्तविक या सवयीचे तुमच्या शरीरावर घातक परिणाम होत असतात. दिवसभरात एक ते दोन कप चहा अथवा कॉफी घेण्यास काहीच हरकत नाही. मात्र सकाळी उठल्यावर उपाशीपोटी चहा अथवा कॉफी चुकूनही घेऊ नका. कारण त्याचे भयंकर परिणाम तुम्हाला भविष्यात सहन करावे लागतील.

जाणून घ्या उपाशीपोटी चहा-कॉफी घेतल्याने नेमकं काय होतं

चहा आवडत असल्यास यावर उपाय काय ?

जर तुम्हाला चहा फारच आवडत असेल तर तुम्ही काही गोष्टींची दक्षता पाळायला हवी. सकाळी उठल्याबरोबर लगेचच चहा घेण्याऐवजी आधी कोमट पाणी, एखादं फळ, सुकामेवा अथवा चांगला हेल्दी नास्ता करावा. ज्यामुळे तुमच्या शरीरात रात्रभर निर्माण झालेली अॅसिडिटी कमी होईल. काहीतरी पौष्टिक पदार्थ खाल्यानंतर मग तुम्ही  चहा अथवा कॉफी नक्कीच घेऊ शकता. मात्र लक्षात ठेवा दिवसभरात फक्त एक अथवा दोन कपच चहा अथवा कॉफी घ्या. शिवाय चहा घेताना शक्य असल्यास मसाला चहा घेण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे त्याचा सुपरिणाम तुमच्या शरीरावर दिसू लागेल. चहा अथवा कॉफीमध्ये दूध आणि साखरेचे प्रमाण कमी ठेवा ज्यामुळे तुमच्या शरीरावर या गोष्टींचा दुष्पपरिणाम होणार नाही. चहा अथवा कॉफी घेण्यापेक्षा ग्रीन टी, मसाला टी, ब्लॅक कॉफी घ्या. 

अधिक वाचा

तुम्ही जर चहाचे चाहते असाल तर लक्षात ठेवा काही गोष्टी

दिवसाची सुरूवात ‘परफेक्ट’ हवी असेल तर टाळा या ‘5’ गोष्टी

तुम्हाला चहा आवडतो का, मग मसाला चहाचे हे आरोग्यदायी फायदे जरूर वाचा

सौंदर्यासाठी ब्लॅक कॉफीचे अफलातून फायदे

फोटोसौजन्य –  शटरस्टॉक

 

Read More From Diet