लहानपणीपासून आपल्याला कोणतीही गोष्ट पर्यायी असते याची सवय असते. उदाहरणार्थ आपल्या पेन्सिल बॉक्समध्येही नेहमी दोन पेन्सिल अथवा दोन पेन्स असतात. एक कामी आलं नाही तर आपण दुसरं वापरतो. अनेक गोष्टींसाठी आपण दोन पर्याय निवडून ठेवतो. पण नात्याच्या बाबतीत असं घडत असेल तर? नात्याच्या बाबतीत दोन पर्याय असणं नक्कीच योग्य नाही. आपण एखाद्या व्यक्तीसाठी खास असणं हे प्रत्येकालाच आवडतं आणि आपल्या आवडत्या व्यक्तीने नेहमी आपल्याला प्राधान्य द्यावं आणि नात्यात आपलं होऊन राहावं हीच एक इच्छा असते. प्रेमासह समर्पण आणि विश्वास आवश्यक असतो. पण आजकाल अशी पर्यायी नाती खूपच पाहायला मिळत आहेत. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी केवळ पर्याय तर नाही ना हे तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर काही संकेत आहेत. तुम्ही वेळीच या गोष्टी ओळखा. म्हणजे तुम्हाला या नात्यातून वेळीच बाहेर येणं शक्य होईल. तुमचाही जोडीदार असंच वागत असेल र तुम्ही या नात्यात न राहिलेलं अधिक चांगलं. कारण असं त्रासदायक नातं कधीच योग्य ठरत नाहीत. त्यामुळे आपल्या व्यक्तीने आपलंच असावं हे वाटणं गैर नाही. पण आपण कोणाचा तरी पर्याय म्हणून जगणं हे आपल्यालाच अधिक त्रासदायक ठरणार असेल तर त्यातून वेळीच बाहेर येणं गरजेचे आहे. पण आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला पर्याय म्हणून वागवते आहे हे कसं लक्षात घ्यायचं याबाबत जाणून घ्या.
गरजेच्या वेळी गोड बोलणे
Shutterstock
आपण जरी समोरच्या व्यक्तीला आपले मानत असलो तरीही अशी व्यक्ती आपल्याला केवळ गरजेच्या वेळीच कॉल करते आणि गोड बोलून काम करून घेते. आपला जोडीदार शारीरिक स्वरूपात आपल्याजवळ येण्याचा प्रयत्नही करत नाही. जेव्हा काम असेल तेव्हाच कॉल करून गोड बोलून तुमची मदत मागेल आणि त्यानंतर कामाची कारणे देऊन सतत तुम्हाला टाळत राहील. हा सर्वात मोठा संकेत आहे. त्यामुळे तुमचे नाते हे एकतर्फी आहे हे नक्की अशावेळी समजून जा. आपण जितके प्रयत्न समोरच्या व्यक्तीसह राहण्यासाठी करत आहोत तितकेच प्रयत्न समोरच्या व्यक्तीनेही आपल्याला भेटायला अथवा आपल्यासह राहण्यासाठी केले तरच त्यांचेही तुमच्यावर प्रेम आहे हे कळून येते. पण अशी वागणूक असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी उरलेल्या वेळातील पर्याय आहात आणि केवळ कामासाठी तुम्ही त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहात हे समजून जावे.
तुम्हाला प्राधान्य न देणं
कोणत्याही गोष्टीसाठी तुमचा जोडीदार तुम्हाला प्राधान्य देत नसेल तर समजून जा की तुम्ही त्याच्यासाठी महत्त्वाच्या नाही. जेव्हा त्याची गरज आहे, जेव्हा त्याची इच्छा आहे तेव्हाच तो तुमच्याशी प्रेमाने बोलत असेल अथवा तुमच्याबद्दल प्रेम व्यक्त करत असेल तर हा तुम्ही पर्याय असण्याचाच संकेत आहे. तुम्ही नात्यामध्ये जर अशा स्वरूपाचा पर्याय असाल तर वेळीच सावध व्हा. जेव्हा दोन व्यक्ती नात्यात असतात तेव्हा एकमेकांबद्दल प्रेम, ओढ आणि वेळ या तिन्ही गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असतात. प्रत्येकवेळी तुमचा जोडीदार तुम्हाला वेळ देऊ शकेलच असं नाही पण जेव्हा तुम्ही सर्वात जास्त कठीण प्रसंगातून जात असाल तेव्हा सर्व काही बाजूला सारून तुमच्यासाठी ठामपणे जोडीदाराने उभं राहायला हवं. तुम्हाला प्राधान्य द्यायला हवं हे निश्चित. पण अशावेळीही तुम्हाला कारणं मिळत असतील तर तुम्ही या नात्यातून बाहेर येणंच चांगलं.
नेहमी दुसऱ्या मुलींसह फिरणं
नातं हे भावनिक जास्त असतं. तुमचा जोडीदार तुम्हाला भावनिक साथही देत नसेल आणि तुमच्या भावना दुखावत तुम्हाला देण्याचा वेळ त्याच्या इतर मित्रमैत्रिणींना विशेषतः अन्य मैत्रिणींना देत असेल तर तुम्हाला या नात्याचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. मैत्रीण आणि खास मैत्रीण यातील अंतर ठेवता यायला हवं. तुम्ही तुमच्या जोडीदारावर संशय घ्या असं नाही सांगत. पण जर असं असेल तर तुम्ही नक्की विचार करा.
चुकीच्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी या गोष्टी करायलाच हव्यात
वेळ न देणे
Shutterstock
नात्याची काळजी घेणे आणि एकमेकांना वेळ देणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचा जोडीदार तुम्हाला कधीच वेळ देत नसेल तर तुम्ही या नात्यात केवळ पर्याय आहात हे समजून जा. चांगला क्षण असो वा वाईट क्षण असो केवळ फोनवरून तुमच्याशी बोलणे झाले की सगळे संपले असं होत नाही. शारीरिक आणि भावनिक स्वरूपात जोडीदाराने आपल्यासह असणे आणि आपल्याला वेळ देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्हाला कधीच वेळ मिळत नसेल तर तुम्ही या नात्यातून वेळीच माघार घ्या.
ब्रेकअप (Breakup) नक्की का होतं, ‘ही’ आहेत महत्त्वाची कारणं
न भेटण्यासाठी कारणे देणे
प्रेमाच्या नात्यात एकमेकांशी भेट होणे आणि एकमेकांचा सहवास मिळणेही तितकेच गरजेचे आहे. पण न भेटण्यासाठी सतत कामाची अथवा अन्य गोष्टींची कारणे जर तुमचा जोडीदार देत असेल तर तुम्ही पर्याय आहात हा एक संकेत आहे. तुम्हीही याचे नीट निरीक्षण करून विचार करा आणि मगच या नात्यामध्ये पुढचे पाऊल उचला. कारण जर भेटतच नसेल आणि वेळच देत नसेल तर ते नाते पुढे किती टिकेल याचा विचार होणे गरजेचे आहे.
योग्यवेळी नात्यातील दुरावा मिटवा… नाहीतर
काळजी न करणे
तुमचा जोडीदार कधीच तुमची काळजी करत नसेल तर तुम्ही या नात्याला काहीच अर्थ नाही हे समजून जा. तुम्ही तुमची काळजी घेण्यासाठी नक्कीच समर्थ आहात. पण आपल्या आवडत्या माणसाने आपली काळजी घेणे ही एक अपेक्षा असते आणि ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जर जोडीदार समर्थच नसेल तर तुम्ही त्याच्यासाठी एक पर्याय म्हणून आयुष्यात आहात हे समजून वेळीच नात्यातून दूर व्हा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From Love
(70+ Best) Birthday Wishes For Girlfriend In Marathi | तुमच्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
Dipali Naphade
120+ Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
Trupti Paradkar