Natural Care

टीनएज मुलींसाठी स्कीन केअर टिप्स, त्वचा राहील कायम चिरतरूण

Trupti Paradkar  |  Jul 3, 2020
टीनएज मुलींसाठी स्कीन केअर टिप्स, त्वचा राहील कायम चिरतरूण

तुम्ही 13 ते 20 वयातील तरूणी आहात का ? मग तुम्ही आतापासूनच तुमच्या त्वचेची निगा राखण्यास सुरूवात करायला हवी. कारण या वयात त्वचेची योग्य ती काळजी न घेतल्यास पुढे भविष्यात तुम्हाला त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.आजकाल आपण मध्यमवयीन महिलांच्या त्वचा समस्यांबाबत नेहमीच ऐकत असतो. याचं कारण असं की, जस जसं वय वाढू लागतं तस तसं तुमच्या त्वचेमधील नैसर्गिक चमक हळूहळू कमी होऊ लागते. कायम चिरतरूण दिसण्यासाठी आणि त्वचेचा पोत संतुलित ठेवण्यासाठी किशोरवयातच त्वचेची निगा राखणं गरजेचं आहे. प्रत्येकीलाच आपण कायम सुंदर दिसावं असं नेहमी वाटत असतं. म्हणूनच आम्ही टीनएजमधील मुलींच्या त्वचेसाठी काही खास टिप्स शेअर करत आहोत. ज्या तुम्हाला डेली स्कीन केअर रूटीन फॉलो करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील.

सोप्या आणि सहज करता येण्यासारख्या स्कीन केअर टिप्स –

आज तुम्ही फार सुंदर दिसत आहात पण तुम्हाला भविष्यातदेखील इतकंच सुंदर दिसायचं असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा. 

Instagram

सतत मेकअप करू नका –

आम्ही तुमच्यासोबत नेहमीच ब्युटी आणि मेकअप टिप्स शेअर करत असतो. कारण तुम्ही नेहमीच सुंदर दिसावं असं आम्हाला वाटतं. मात्र जर तुमचं वय वीसच्या आतील असेल तर मात्र तुम्ही सतत मेकअप करणं योग्य नाही. कारण तुमची त्वचा अजून फार नाजूक आहे. केमिकलयुक्त मेकअपच्या साधनांचा तिच्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला भविष्यातही चिरतरूण दिसायचं असेल तर अजून काही वर्ष मेकअपचा वापर कमी करा. अगदी कधीतरी, गरजेपुरता आणि हलका मेकअप करण्यास काहीच हरकत नाही. हे ही लक्षात ठेवा तुम्हाला मेकअप वेळेवर आणि योग्य पद्धतीने रिमूव्ह करता यायला हवा.

                                                                    वाचा – केसांच्या वाढीसाठी मसाजचे फायदे मराठीत

नियमित सनस्क्रीन वापरा –

या वयातही घराबाहेर पडण्यापूर्वी आणि घरात असतानाही तुम्ही नियमित सनस्क्रीनचा वापर करायला हवा. कारण वातावरणातील अतिनील सुर्यकिरणे आणि मोबाईल, टॅब, लॅपटॉपच्या प्रकाशाचा तुमच्या  त्वचेसोबत सतत सपर्क होत असतो. यासाठीच चेहरा, मान आणि हाताला नियमित सनस्क्रीनने कव्हर करणं गरजेचं आहे. मात्र लक्षात ठेवा सनस्क्रीन निवडण्यापूर्वी  तुमच्या त्वचेसाठी ते योग्य आहे का याची दक्षता घ्या. SPF 30 च्या वरील सनस्क्रीनचा वापर करणं तुमच्यासाठी  फायदेशीर ठरू शकतो.

Instagram

त्वचेवरील पिंपल्स, पुळ्यांना सतत हात लावू नका –

किशोरवयात अथवा टीनएजच्या मुलींच्या चेहऱ्यावर एक्ने अथवा पिंपल्स येणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. या वयात तुमच्या शरीरात आणि हॉर्मोन्समध्ये होणाऱ्या बदलामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, पुळ्या येऊ लागतात. हा बदल स्वीकारणं नक्कीच सोपं नाही. मात्र चिंतीत होऊन जर तुम्ही सतत या पिंपल्स अथवा पुळ्यांना हात लावू लागलात तर त्या चिघळण्याची शक्यता जास्त असते. पिंपल्स फुटण्यामुळे चेहऱ्यावर व्रण निर्माण होऊ शकतात. शिवाय यामुळे तुमच्या त्वचेला इनफेक्शनचा धोका वाढतो. म्हणूनच चिंता करण्याऐवजी नैसर्गिक उपाय आणि चांगल्या दर्जाचे सौम्य फेश वॉश वापरणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

क्लिनअप आणि स्क्रबरचा वापर करा –

वीसाव्या वयापर्यंत तुम्ही चेहऱ्यावर फेशिअल अथवा इतर ब्युटी ट्रिटमेंट करू शकत नाही. मात्र त्वचेची निगा राखण्यासाठी क्लिंझरचा वापर करून क्लीन अप करण्यास काहीच हरकत नाही. यामुळे त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेला ऑक्सिजनचा मुबलक पूरवठा होतो. शिवाय आठवड्यातून एकदा एखाद्या नैसर्गिक स्क्रबरने चेहरा स्वच्छ करण्यास काहीच हरकत नाही. मात्र स्क्रबर चेहऱ्यावर रगडून वापरू नका. अलगद हाताने मसाज करून त्वचा स्क्रब करा. 

या तीन गोष्टी आहेत अत्यंत महत्त्वाच्या –

निरोगी त्वचेसाठी नियमित व्यायाम, योग्य आहार आणि मुबलक पाणी पिणं फार गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या जीवनशैलीत यानुसार चांगले बदल अवश्य करा. या सवयींचा तुमच्या त्वचेवर झालेला फरक तुम्हाला चिरतरूण राहण्यासाठी फायदेशीर ठरेल. 

या आणि अशा अनेक ब्युटी टिप्स जाणून घेण्यासाठी आमची इतर आर्टिकल्स नक्कीच वाचा. 

गव्हाच्या पिठाच्या या तीन फेसपॅकमुळे त्वचा होईल अधिक चमकदार

मानेजवळील त्वचा काळवंडली आहे का, मग करा हे घरगुती उपाय

महिन्याभरात मिळवा तुम्हाला हवी असलेली सुंदर त्वचा… तेही घरच्या घरी

Read More From Natural Care