मुंबईत दोन दिवस पाऊस चांगलाच कोसळतोय. या पावसाने सगळं जनजीवन विस्कळीत झाले. मुंबईत ठिकठिकाणी पाणी इतकं पाणी भरलं की, अनेकांना घराबाहेर पडताही आले नाही. पण घरी बसून अनेकांना खूप काही चांगलं सुचतं असं म्हणायला हवं. कारण दोन दिवस पाऊस पडत नाही तोच मुंबईतील पावसाचे Funny meme सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. व्हॉटसअॅप फेसबुकवर हे meme मोठ्या संख्येने व्हायरल होत आहे. हे meme पाहून तुम्ही व्हाल हसून लोटपोट व्हाल हे नक्की
एकाएकी चर्चेत आलेल्या अभिनेत्री सध्या काय करत आहेत, जाणून घ्या
‘भैया जरा जलसा होके जाना ‘
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचे नाव जलसा हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण या जलसा नावावरुन स्वत: अमिताभ बच्चन असे meme तयार करतील असे वाटले नव्हते. झीनत अमनसोबतचे त्यांचे दो लब्जो की है… दिल की कहानी या गाण्यातील हे दृश्य आहे. पण काल तुंबलेल्या मुंबईवरुन त्यांनी भैया गोरेगाव लेना जलसा होके… असे शब्द वापरुन meme तयार केले आहे.
ओला ड्रायव्हर नाही तर सुपरहिरो
मुंबईत दोन दिवस इतका पाऊस पडत होता की, ट्रेन आणि इतर प्रवासी माध्यामांचे तीन तेरा वाजले होते. पण मुंबईच्या रस्त्यांवर तीन चाकी रिक्षा मात्र चांगल्या दुडूदुडू धावत होत्या.ओला आणि उबर मुंबईत या सेवा पुरवतात. दोन दिवस पडलेल्या पावसात ओला किंवा उबरची एक जरी गाडी बुक झाली तरी नागरिकांची हीच अवस्था होती. त्या दिवसासाठी ड्रायव्हर त्यांच्यासाठी सुपरहिरोच होता.
तब्बल 17 वर्षांनी येणार संजीवनी मालिका, पाहा पहिला लुक
घ्या आता पाणीच पाणी
एप्रिल महिन्यापासून मुंबईकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी मुंबईकरांची वाताहत होत असताना आता मुंबईत पाणीच पाणी पाहायला मिळालं. आता जे सतत पाणी पाणी करत होते. त्यांच्यासाठी हे meme खास आहे. कारण आता पाणी नाही. तर पाण्याखाली मुंबई शोधावी लागत आहे.
साला ये बारीश खत्म ही नही होता है
गेली कित्येक दिवस मुंबईकर पावसाची वाट पाहत आहे. मे महिना उन्हाची लाही लाही करुन काढल्यानंतर किमान जूनमध्ये पाऊस पडेल असे वाटले पण जूनमध्ये पाऊस पडला नाही. थेट 1 जुलैचा मुहूर्त साधून पाऊस कोसळला. तो इतका की, प्रत्येक मुंबईकराला हे बोलावेसे वाटेल.
कार्तिक आर्यनला मिळाली आणखी एक तगडी भूमिका
टायटॅनिक खरचं बुडाली की
जर तुम्ही टायटानिक पाहिला असेल तर तुम्हाला रोझ आणि जॅक नक्कीच माहीत असतील. मुंबईच्या या भर पावसात त्यांच्या रोमॅन्सचा शेवटचा क्षण सध्या meme बनून फिरत आहे. मुंबईत खड्डेच इतके आहेत की, पावसात बाहेर पडलेल्या कपल्ससोबत हा प्रकार कधीही होऊ शकतो. या सरखे काही अजून meme सोशल मीडियावर आहेत.
तुमच्याही Googleमॅपचे झाले का असे?
हल्ली सगळ्यांना गुगल मॅपचा वापर करायची सवय झाली आहे. पण कालच्या पावसात तुमच्या गुगल मॅपचे असे तर झाले नाही हे आधी पाहा. हे meme मुंबईच्या पावसासाठी अगदीच परफेक्ट आहे नाही का?
तुम्हालाही असे काही funny meme आले असतील तर ते नक्की आमच्यासोबत शेअर करा. बाहेर पाऊस खूप असेल तर घराबाहेर पडू नका. उलट मस्त घरी राहून पावसाचा मस्त आनंद घ्या. कारण मुंबईचा पाऊस हा मुंबईचा पाऊस आहे बरं का
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade