लाईफस्टाईल

कॅन्सरवर मात करत अभिनेत्री सोनाली बेंद्रेचं पहिलं ‘फोटोशूट’

Trupti Paradkar  |  Mar 6, 2019
कॅन्सरवर मात करत अभिनेत्री सोनाली बेंद्रेचं पहिलं ‘फोटोशूट’

कॅन्सरवर उपचार करण्यासाठी मागील वर्षी जुलै महिन्यात अभिनेत्री सोनाली बेंद्रे न्यूयॉर्कला गेली होती. मात्र कॅन्सर सारख्या दुर्धर आजारपणावर मात करत ती पुन्हा भारतात परतली आहे. हायग्रेड कॅन्सरच्या आजारपणात सोनालीने चित्रपटात काम करणं बंद केलं होतं. मात्र ती सोशल मीडियावर मात्र सतत अॅक्टिव्ह होती. नुकतच तिने कॅन्सरवर मात केल्यानंतरचं पहिलं फोटोशूट तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केलं आहे. त्यामुळे सोनाली पुन्हा एकदा सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.या फोटोशूटमध्ये तिने तिच्या ऑपरेशनच्या खूणा दाखविल्या आहेत. आजारापणात उपचार करताना तिच्यावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियांच्या खूणा अजूनही तिच्या शरीरावर आहेत. मोठ्या धैर्याने ती या आजारपणाला सामोरी गेली होती. आता तिने तिच्या या ऑपरेशनच्या खूणा दाखविणारं एक फोटोशूट तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. शिवाय तिला लांबसडक केस खूप आवडत होते. मात्र आजारपणात तिला तिचे केस कमी करावे लागले. केस काढल्यानंतर टोपी, स्कार्फ अथवा विगचा आधार घेण्यापेक्षा ती जशी आहे तशीच तिच्या चाहत्यांसमोर आली आहे. त्यामुळे तिचं धैर्य आणि संयम या फोटोशूटमधून दिसत आहे.

आजारपणात सोनाली होती कुटूंबापासून दूर

आपल्या कुटुंबापासून आणि मित्रमंडळींपासून दूर रहाणे फारच कठीण असते. एखाद्या कठीण प्रसंगी तर आपल्याला त्यांच्या आधाराची अधिक गरज असते. आजारपणात तर त्यांच्यासारखा दुसरा कोणताच आधार नाही असं वाटत असतं. उपचार सुरू असतानाही सोनालीने सोशल मीडियावरुन काहीशा अशा भावना व्यक्त केल्या  होत्या. “दुरावा आपल्याला बरंच काही शिकवतो.घरापासून दूर राहून मला अनेक गोष्टी समजल्या .प्रत्येकजण आपलं जीवन वेगवेगळ्या पद्धतीने जगत असतो. मात्र जीवनात यासाठी कधीकधी संघर्ष देखील करावा लागला तरी प्रयत्न करणे कधीच थांबवू नका” अशी भावना तिने व्यक्त केली होती. अमेरिकेत असताना सोनाली सतत आपल्या आजारपणाबाबत सोशल मीडियावरुन अपडेट देत होती.

जुलैमध्ये सोनाली झाली होती अॅडमिट

जुलै महिन्यात सोनालीला हायग्रेड कॅन्सर झाला असल्याची बातमी आली. खुद्द सोनालीनेच ही बातमी तिच्या ट्विटर अकांउटवरून तिच्या चाहत्यांना शेअर केली होती. या बातमीने तिच्या चाहत्यांसह बॉलीवूडमधील अनेकांच्या काळजात धस्स झालं होतं. त्यानंतर कॅन्सरवर उपचार करण्यासाठी सोनाली अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये गेली होती. मात्र आता ती या असाध्य आजारपणावर मात करून पुन्हा आपल्या मायदेशी परत आली आहे.

अधिक वाचा

मार्च महिन्यात जन्म घेणाऱ्या व्यक्ती कशाअसतात, जाणून घ्या

कार्तिक आणि सारानं केलं लिप लॉक, व्हायरल झाला व्हिडिओ

जंगलातील अद्भूत विश्व उलगडणाऱ्या ‘जंगली’ चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

Read More From लाईफस्टाईल