DIY सौंदर्य

एसपीएफ म्हणजे काय? | What is SPF In Marathi

Dipali Naphade  |  Apr 13, 2022
spf-meaning-in-marathi

आपण नेहमी ऐकतो की, कोणत्याही हंगामात आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आपल्याला सनस्क्रिन लावायला हवं. सनस्क्रिन (Sunscreen) अर्थात एसपीएफ (SPF). जेणेकरून आपल्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवता येईल. सनस्क्रिन लावण्याचे अनेक फायदे आहेत. पण अनेकदा सनस्क्रिन वापरणाऱ्यांना एसपीएफ म्हणजे नक्की (SPF Meaning In Marathi) अथवा सनस्क्रिन म्हणजे नेमकं काय (Sunscreen Meaning In Marathi) याची मात्र माहिती नसते. तसंच एसपीएफमध्ये किती नंबर असतात आणि त्याचा कसा उपयोग करायचा याबाबतही माहिती नसते.  एसपीएफ म्हणजे नक्की (SPF Meaning In Marathi) अथवा सनस्क्रिन म्हणजे नेमकं काय (Sunscreen Meaning In Marathi) याबाबत आम्ही या लेखातून तुम्हाला सांगणार आहोत. 

एसपीएफ म्हणजे काय? – SPF Meaning in Marathi

एसपीएफ म्हणजे काय? (What is SPF)

एसपीएफ (SPF) अथवा सन प्रोटेक्शन फॅक्टर हे सूर्याच्या किरणांपासून आपली त्वचा अधिक सुरक्षित करण्यासाठी वापरण्यात येते. सूर्याच्या किरणाच्या सतत संपर्कात आल्यास, त्वचा जळते आणि काळी पडते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. यामुळे तुम्ही वयापेक्षा अधिक लवकर म्हातारे दिसू शकता. याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला त्वचेचा कॅन्सरही होण्याची भीती असते. ज्यांना एसपीएफबाबत माहीत आहे त्याना वाटतं की, जितकं एसपीएफ अधिक लावणार तितकी त्वचेला सुरक्षा मिळते. पण असं अजिबातच नाही. कारण सूर्याच्या किरणांपासून वाचण्यासाठी याचा उपयोग होतो हे खरं असलं तरीही त्याचे वापरण्याचे प्रमाण आहे. 

सनस्क्रिनमध्ये एसपीएफचे प्रमाण अधिक असेल तर ते अधिक प्रभावी मानले जाते, कारण त्वचेला अल्ट्रावायलट किरणांमुळे होणारे नुकसान हे अधिक एसपीएफमुळे कमी होते. उदाहरणार्थ तुम्ही जाणून घ्या की, जर तुम्ही एसपीएफ 15 (SPF 15) सनस्क्रिन वापरून उन्हात बाहेर गेलात तर तुम्हाला 15 पटीने अधिक संरक्षण मिळतं. तुम्ही उन्हात सुरक्षेशिवाय गेलात तर तुमची त्वचा अधिक पटकन काळी पडते. साधारणतः सनस्क्रिनमधील एसपीएफ हे आपल्या त्वचेला 4-5 तास सुरक्षा देते. यामुळे साधारण इतक्या वेळानंतर उन्हातच असाल तर पुन्हा एकदा वापर करावा लागतो.  

एसपीएफ वापरण्याची गरज काय ? Why do we need to use SPF In Marathi

सूर्याच्या हानिकारक किरणांपासून तुम्हाला वाचायचे असेल तर एसपीएफचा उपयोग करणे अनिवार्य आहे. तुमची त्वचा अधिक सुरक्षित राखण्यासाठी याचा उपयोग केला जातो. पण नक्की एसपीएफ सूर्याच्या किरणांपासून कसे वाचवते याबाबत अधिक माहिती –

एसपीएफ 15 (SPF 15) – 93% युव्ही किरणे ब्लॉक करण्यासाठी उपयुक्त ठरते 
एसपीएफ 30 (SPF 30) – 97% युव्ही किरणे ब्लॉक करण्यासाठी उपयुक्त ठरते 
एसपीएफ 50 (SPF 50) – 98% युव्ही किरणे ब्लॉक करण्यासाठी उपयुक्त ठरते 
एसपीएफ 70 (SPF 70) – 98.5% युव्ही किरणे ब्लॉक करण्यासाठी उपयुक्त ठरते 
एसपीएफ 100 (SPF 100) – 99% युव्ही किरणे ब्लॉक करण्यासाठी उपयुक्त ठरते 

एसपीएफ कसे वापरावे – How to Apply SPF In Marathi

How to Apply SPF

एसपीएफ लावणे त्वचेसाठी चांगले आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण याचा त्वचेसाठी कसा वापर करायचा याची योग्य माहितीही असायला हवी. एसपीएफ लावताना तुम्ही संपूर्ण अंगभर एसपीएफ फासणे योग्य नाही. एसपीएफ वापरताना नक्की कोणती काळजी घ्यायची आणि याची वापरायची योग्य पद्धत कशी आहे ते जाणून घ्या – 

एसपीएफ नंबरचा अर्थ काय? What Is The Meaning Of SPF Number In Marathi

आपण एसपीएफचे किती नंबर असतात आणि त्यामध्ये नक्की कोणते गुण असतात ते पाहिले. पण या नंबरचा नक्की अर्थ काय आहे कशा प्रकारे उपयोग होतो हेदेखील जाणून घ्यायला हवे. 

ज्या व्यक्तींना उन्हात बाहेर पडावं लागतं त्यांच्यासाठी 30 एसपीएफवाले सनस्क्रिन योग्य आहे. महाराष्ट्रातील धुळे, नागपूर, विदर्भ तर देशातील दिल्ली, एनसीआर आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसात साधारण पारा 45 अंशाच्या वर जातो. इतक्या तळपत्या उन्हातून आपल्या त्वचेला सांभाळायचे असेल तर साधारणतः 50 एसपीएफचे सनस्क्रिन वापरणे योग्य ठरते. 

सनस्क्रिन वापरण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे अगदी थोडंथोडकं सनस्क्रिन लावणं योग्य नाही. शरीराचा जितका भाग उन्हात उघडा राहणार आहे त्या भागाला पूर्ण सनस्क्रिन लावा. तसंच हे लावताना आपल्या त्वचेला योग्य सुरक्षा मिळेल की नाही हे त्यावरील नंबर पाहून ठरवा. तुम्ही अधिक काळ उन्हात राहणार असाल तर तुम्ही पुन्हा काही तासाने सनस्क्रिन लावायला हवे. तसंच सूर्याची पॅराबँगनी किरणे हे दोन प्रकारची अशतात, युव्ही किरणे (UVA rays) आणि युबी किरणे (UVB Rays). जास्त एसपीएफ असणारे क्रिम हे युव्हीबीपासून वाचवते पण अनेकदा युव्हीए हे सुरक्षा ठेऊ शकत नाही. त्यामुळे सहसा एसपीएफ 50 च्या वरचे सनस्क्रिन वापरू नये. 

त्वचेसाठी योग्य एसपीएफ कोणते? – How to know right SPF Marathi

अनेकदा या सर्व एसपीएफपैकी योग्य एसपीएफ नक्की कोणते असाही प्रश्न पडतो. SPF 15 हे अगदी सौम्य उन्हासाठी आहे. तर एसपीएफ 30 युक्त सनस्क्रिनही नॉर्मल लेव्हलचेच आहे. प्रत्येक वयाच्या आणि प्रत्येक स्किन टाईपच्या व्यक्तीसाठी हे एसपीएफ उपयुक्त ठरते. खरं तर कोणतेही सनस्क्रिन वापरले तरीही सूर्याच्या किरणांपासून पूर्णतः संरक्षण देऊ शकत नाही. साधारण 99% सुरक्षित करण्यासाठी याचा फायदा करून घेता येतो. त्यामुळे साधारणतः फरक येतो ते एक टक्क्याचा. त्यामुळे तुम्ही योग्य एसपीएफ कोणते यावर सारखा विचार करत बसू नका. तुम्ही तुमच्या अनुभवानुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उन्हाळ्याच्या दिवसात एसपीएफचा वापर करणे योग्य ठरते. मात्र तुम्ही योग्य सनस्क्रिन निवडावे. ज्यामध्ये जास्त केमिकल्सचा वापर करण्यात आला नसेल आणि तुमच्या स्किन टाईपसाठी योग्य ठरेल असेच एसपीएफ तुम्ही निवडा.  

एसपीएफची टक्केवारी कशी ओळखावी? – How To Understand The Percentage Of SPF Marathi

एसपीएफची टक्केवारी कशी ओळखावी? How To Understand The Percentage Of SPF

एसपीएफचा टक्का नक्की कसा समजावा, यासाठी एक साधे सूत्र आहे. सनस्क्रिन लावल्यावर त्वचेचा पॅच किंचित लाल होण्यासाठी लागणाऱ्या सेकंदाच्या संख्येला सनस्क्रिन न लावल्यास किंचित लाल होण्यासाठी लागणाऱ्या सेकंदाच्या संख्येने भागले जाते. अर्थात हे खूपच क्लिष्टदेखील वाटू शकते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर सनस्क्रिन न लावता त्वचेवर किती परिणाम होतो आणि सनस्क्रिन लाऊन त्याच भागावर किती परिणाम होतो हे पाहिले जाते. 

एसपीएफचा पूर्ण अर्थ म्हणजे Sun Protection Factor अर्थात सूर्याच्या किरणांपासून संरक्षण. युव्हीबी किरणे आणि युव्हीए किरणांपासून तुमचे संरक्षण एसपीएफ कसे करते यावरूनच सर्व टक्का ठरला जातो. अर्थात वर दिल्याप्रमाणे याचे प्रमाण आणि टक्केवारी आहे. 

(SPF 15) – 93% UV rays 
(SPF 30) – 97% UV rays 
(SPF 50) – 98% UV rays 
(SPF 70) – 98.5% UV rays 
(SPF 100) – 99% UV rays 

भारतातील उत्कृष्ट सनस्क्रिन – Best Sunscreen In India

आपल्याकडे अनेक सनस्क्रिनचा वापर करण्यात येतो. त्यापैकी काही सनस्क्रिन असे आहेत जे तुमच्याकडे असले तर तुमच्या त्वचेला फायदाच होतो.

मायग्लॅम सुपरफुड्स कोको अँड बेरीज डे क्रिम विथ एसपीएफ (MyGlamm Superfoods Cacao & Berries Day Cream with SPF)

कोको बटर, स्ट्रॉबेरी, मलबरी आणि ब्लॅक करंटचा यामध्ये समावेश असून त्वचेला नैसर्गिक चमक देण्याचे हे काम करते. याशिवाय यातील एसपीएफ हे त्वचेचे सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करण्यास मदत करते. त्वचेचे संरक्षण करून बॅक्टेरियाला थांबविण्याचे कामही करते. तसंच त्वचा अधिक हायड्रेट राखण्यासाठी आणि कोरडी त्वचा अधिक चांगली राहण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

ऑर्गेनिक हार्वेस्ट सनस्क्रिन – एसपीएफ 50 (Organic Harvest Sunscreen – SPF 60)

ब्ल्यू लाईट टेक्नॉलॉजीसह असणारे हे सनस्क्रिन त्वचेला युव्हीए आणि युव्हीबी किरणांपासून दूर राहण्यास मदत करते. तसंच हे अजिबात चिकट नाही आणि यामध्ये प्रमाणित असे नैसर्गिक – ऑर्गेनिक घटकांचा वापर करण्यात आला असून तुमच्या त्वचेला हानी पोहचत नाही. तुमची त्वचा हायड्रेट राखण्यास आणि त्वचेला पोषण देण्यास याची मदत मिळते. 

ऑर्गेनिक हार्वेस्ट अॅक्ने/ऑईली स्किन – एसपीएफ 30 (Sunscreen Acne/Oily Skin-SPF 30)

तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी उत्तम ठरणारे असे ऑर्गेनिक हार्वेस्टचे हे सनस्क्रिन चांगले आहे. अजिबात चिकट नसणारे आणि नैसर्गिक घटकांपासून बनलेले हे सनस्क्रिन क्रुएल्टी फ्री, पॅराबेन फ्री आणि मिनरल ऑईल फ्री आहे. तसंच महिला आणि पुरूषांना दोघांनाही हे उपयुक्त आहे. तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी हे सनस्क्रिन अत्यंत उपयुक्त आहे.

विटामिन सी एसपीएफ 50 सनब्लॉक फेस अँड बॉडी मिस्ट सनस्क्रिन (VITAMIN C SPF 50 SUNBLOCK FACE & BODY MIST SUNSCREEN)

त्वचेवर अधिक काळ टिकणारे असे हे युव्हीए आणि युव्हीबी किरणांपासून संरक्षण देणारे सेंट बोटानिका (St. Botanica) चे सनस्क्रिन तुम्ही नक्की वापरू शकता. अत्यंत हेल्दी कॉम्ल्पेक्शन राखण्यासाठी याचा उपयोग होतो. सूर्याच्या किरणांपासून 98% सुरक्षा मिळवून देण्याचे काम हे सनस्क्रिन करते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी हे उत्तम ठरते. यामध्ये असणारे विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स हे तुमच्या त्वचेसाठी अधिक परिणामकारक ठरते. 

विटामिन सी एसपीएफ 75 ड्राय टच सनस्क्रिन (VITAMIN C SPF 75 DRY TOUCH SUNSCREEN, 120M)

सेंट बोटानिकाचे हे सनस्क्रिन हे तुमची त्वचा कोरडी असल्यास उपयुक्त ठरते. तुमचे नैसर्गिक कॉम्प्लेक्शन टिकविण्यासाठी आणि तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी हे सनस्क्रिन तुमच्या किटीमध्ये असायलाच हवे. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचण्यासाठी या सनस्क्रिनचा वापर तुम्ही करू शकता. उन्हाळ्याच्या दिवसात हे सनस्क्रिन अत्यंत उपयुक्त ठरू शकते. विशेषतः कोरडी त्वचा असणाऱ्या व्यक्तींसाठी हे खास बनविण्यात आले आहे.  

सनस्क्रिनमुळे होणारे नुकसान (Side Effect of Sunscreen)

सनस्क्रिनमुळे होणारे नुकसान (Side Effect of Sunscreen)

सनस्क्रिन अति वापरात आल्यास, नुकसानदेखील होऊ शकते. नक्की कशा पद्धतीने नुकसान होते ते जाणून घ्या.

FAQ’s – एसपीएफसाठी प्रश्नोत्तरे

प्रश्न – सनस्क्रिन पोर्सवर परिणाम करतात का?
उत्तर –
हेव्ही आणि तेलकट सनस्क्रिन हे त्वचेच्या पोर्सवर वाईट परिणाम करतात. त्यामुळे तुम्ही सनस्क्रिनची निवड करताना योग्य करा आणि त्याशिवाय त्वचेवर सनस्क्रिन लावताना योग्य प्रमाणात लावा.

प्रश्न – सनस्क्रिन लावल्याने कॉम्प्लेक्शनमध्ये काय बदल होतो?
उत्तर –
सनस्क्रिनमध्ये केमिकल जास्त प्रमाणात असल्यास, कॉम्प्लेक्शनवर फरक पडू शकतो. तुमची त्वचा अधिक काळवंडते. एखाद्या सनस्क्रिनमध्ये हार्मोनली अॅक्टिव्ह घटक असल्याही परिणाम दिसून येतो. त्यामुळे सनस्क्रिन निवडताना तुम्ही त्यातील घटक पाहून निवडावे. 

प्रश्न – सनस्क्रिन लावल्यानंतरही टॅनिंग का होते?
उत्तर –
खूपच ऊन असेल आणि तुम्ही जास्त काळ उन्हात काम करणार असाल तर तुम्हाला एकदाच सनस्क्रिन लाऊन काम करणं शक्य नाही. साधारणतः 2 तास झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा सनस्क्रिनचा वापर करायला हवा. अन्यथा सनस्क्रिन केवळ एकदाच लावल्यास, त्वचा टॅन होऊ शकते. 
एसपीएफ (SPF) म्हणजे नक्की काय आणि हे कसे वापरता येते अथवा एसपीएफचे किती नंबर्स आहेत आणि कोणत्या त्वचेसाठी हे वापरावेत हे आम्ही तुम्हाला या लेखातून सांगितले आहे. तुम्हीही या उन्हाळ्यात एसपीएफचा वापर करा आणि आपल्या त्वचेचे रक्षण करा. 

Read More From DIY सौंदर्य