Care

पालक खा आणि केसगळती टाळा

Aaditi Datar  |  Feb 2, 2020
पालक खा आणि केसगळती टाळा

थंडीच्या दिवसात पालक फक्त आरोग्यासाठी आणि डोळ्यांच्या दृष्टीसाठीच नाहीतर केसांच्या वाढीसाठीही उपयुक्त आहे पालक. कारण आपण नेहमीच हा सल्ला ऐकत असतो की, आहारात पालेभाज्यांचा समावेश करा. पालेभाज्यांमधील हिरव्यागार पालकाच्या सेवनाने ना फक्त तुमचे केस झटपट वाढतात तर केसगळतीही कमी होते. चला जाणून घेऊया पालकाचा वापर करून केस कसे होतील निरोगी आणि लांबसडक.

Canava

केसांसाठी उपयुक्त पालक

पालकांमध्ये आर्यन, व्हिटॅमीन ए, मँगनीज, झिंक, ओमेगा-3 फॅटी एसिड आणि फोलेट असतं. जे केसांच्या वाढीत मदत करतं. यातील व्हिटॅमीन ए त्वचेतील सीबमच्या निर्मितीत मदत करतं. ज्यामुळे तुमचं स्कॅल्प निरोगी राहतं. सीबम खरंतर एक तेलकट आणि मेणासारकं तत्चं असतं जे त्वचेतील सिबेसियस ग्लँडमधून उत्सर्जित होतं. 

केसांच्या वाढीमध्ये आर्यनची भूमिका 

केसांच्या वाढीसाठी आर्यनची महत्त्वपूर्ण भूमिका असते आणि पालकाच्या भाजीत मोठ्या प्रमाणात आर्यन असतं. आर्यन हे केसांच्या मुळापर्यंत जाऊन ऑक्सीजन पोचवतं. ज्यामुळे केस निरोगी आणि मजबूत राहतात. 

केसांना ठेवतं निरोगी

पालकांमध्ये अँटी-ऑक्सीडंट्स हे जास्त असतात ज्यामुळे केस निरोगी राहतात आणि त्यांचं कोणत्याही प्रकारे नुकसान होत नाही. केसांच्या स्कॅल्पला निरोगी ठेवण्यात मदत करतं. ज्यामुळे आपोआपच केसांची गळती कमी होते. 

कोंड्यापासून मुक्तता 

पालकाच्या सेवनाने आणि वापराने केसातील कोंडाही दूर होतो. यासाठी पालकामधील अँटी-ऑक्सीडंट आणि अँटी-इंफ्लेमेट्री घटक उपयोगी पडतात. कारण केसांच्या गळतीमागील मुख्य कारण असतं ते केसातील कोंडा.

केसांसाठी घरगुती पालक पॅक

Canava

पालकाचा उपयोग तुमच्या केसांसाठी फक्त सेवनातूनच नाहीतर पालकांपासून बनवलेल्या पॅकनेही होतो. पालकापासून बनवलेला खालील पॅक तुम्ही केसांना लावू शकता. ज्यामुळे तुम्हाला केस निरोगी ठेवून चांगला परिणामही दिसून येईल.

साहित्य आणि कृती : 250 ग्रॅम पालक वाटून घ्या आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला. नंतर त्यात एक चमचा मध आणि काही थेंब नारळाचं तेल मिक्स करा. हा पॅक केसांना चांगल्या पद्धतीने लावा आणि दोन तास तसंच राहू द्या. नंतर माईल्ड शँपूने केस धुवा. लिंबातील सायट्रिक एसिड स्कॅल्पने केसांतील घाण फेकली जाते. तर नारळाचं तेल स्कॅल्पसाठी मॉईश्चराईजरचं काम करतं. दुसरीकडे पालक निरोगी स्कॅल्पसोबत केस मजबूतही करतं.

मग तुमच्या आहारात पालकाची भाजी किंवा सूपसोबतच अशा प्रकारे पालकाचा पॅक वापरूनही तुम्ही केस निरोगी ठेवू शकता. जर तुम्हाला हेअर पॅक दर आठवड्याला लावणं शक्य नसल्यास तुम्ही पालकांपासून बनवलेलं स्मूदीही पिऊ शकता. 

सुंदर आणि मजबूत केसांसाठी सोप्या टीप्स

घरच्या घरी करा Ingrown Hair वर उपाय

 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

 

काय फरक असतो हेअर स्ट्रेटनिंग आणि हेअर स्मूदनिंगमध्ये

Read More From Care