Natural Care

पार्टी मेकअपनंतर स्कीन डिटॉक्स करण्यासाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Trupti Paradkar  |  Dec 24, 2019
पार्टी मेकअपनंतर स्कीन डिटॉक्स करण्यासाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स

थर्टी फस्ट आणि न्यु एअर पार्टीसाठी तुम्ही नक्कीच तयार झाला असाल. कोणत्याही पार्टीसाठी तयार होताना पार्टी मेकअप करणं गरजेचं आहे. पार्टी मेकअपमुळे तुम्ही ग्लॅमरस दिसता. या मेकअपसाठी तुम्हाला अनेक सौंदर्यप्रसाधनांचा वापर करावा लागतो. शिवाय पार्टीत बराच वेळ तुमच्या चेहऱ्यावर हा मेकअप राहतो. सहाजिकच त्यातील केमिकल्स घटकांचा तुमच्या त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. रात्री उशीरा घरी आल्यावर मेकअप काढायचा कंटाळा केल्यामुळे रात्रभर मेकअप तुमच्या त्वचेवर तसाच राहतो. म्हणूनच अशावेळी तुमची त्वचा पुन्हा डिटॉक्स होण्यासाठी या स्टेप बाय स्टेप्स नक्कीच फॉलो करा. 

हेव्ही पार्टी मेकअपनंतर अशी घ्या त्वचेची काळजी –

त्वचा डिटॉक्स करणं हा स्वतःची काळजी घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे. 

Shutterstock

त्वचेला चांगल्या स्क्रबरने स्वच्छ करा –

त्वचा स्वच्छ करण्यासाठी फक्त क्लिंझिंर पुरेसं नाही यासाठी एखाद्या चांगल्या स्क्रबरचा वापर करा. कारण स्क्रबरमुळे तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ राहते. धुळ, माती, प्रदूषण, डेडस्कीन निघून जाते. ज्यामुळे तुमची त्वचा योग्य पद्धतीने स्वच्छ होते. 

आहारातून गोड पदार्थ कमी करा –

पार्टी म्हटलं की डेझर्ट हे आलेच. केक, मिठाई असे  पदार्थ खाण्यामुळे तुमच्या त्वचेवर त्याचा परिणाम दिसून येतो. जर तुम्हाला त्वचेची काळजी घ्यायची असेल तर आहारातून गोड पदार्थ कमी करा. त्याऐवजी निरनिराळ्या प्रकारचे बेरीज, लिंबू, संत्री, केळी, कलिंगड, काकडी, गाजर, टोमॅटो, सुकामेवा, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात पदार्थांचा समावेश करा. 

त्वचेला हायड्रेट ठेवा –

जर तुम्ही आठवडाभर पार्टी करत असाल तर त्वचा डिटॉक्स करण्यासाठी भरपूर पाणी प्या. कारण जितकं पाणी प्याल तितकी तुमची त्वचा स्वच्छ होते. जर तुम्ही पार्टीला जाणार असाल तर पाण्याचे प्रमाण वाढवा. पाण्यासोबत तुम्ही लिंबू पाणी, नारळपाणी, मध असे पदार्थदेखील वाढवा. 

त्वचा मॉईस्चराईझ करा –

मेकअप काढल्यावर त्वचा कोरडी दिसू लागते. यासाठी तुमचे दैनंदिन स्कीन केअर रूटीन सांभाळणं गरजेचं आहे. यासाठी क्लिझिंग, टोनिंग, मॉईस्चराईझिंग केल्यामुळे तुमच्या त्वचेचं पोषण होतं. त्वचेचं पोषण करण्यासाठी नियमित त्वचेला चांगलं फेस सीरम आणि मॉईस्चराईझर लावणं गरजेचं आहे.

पण त्यासाठी आधी जाणून घ्या त्वचेसाठी सीरम योग्य की मॉईस्चराईझर

नियमित व्यायाम करा –

नियमित व्यायाम केल्यामुळे तुमची त्वचा चांगली दिसते. यासाठी पार्टीवरून उशीरा घरी आला तरी सकाळी वेळेवर उठून व्यायाम करा. व्यायामामुळे तुम्हाला भरपूर घाम येतो. जितका घाम येणार तितकं तुमची त्वचा स्वच्छ होते. म्हणूनच कितीही कंटाळा आला तरी व्यायामाचे रूटीन मुळीच बदलू नका. 

रात्री निवांत झोप घ्या –

रात्री झोप घेतल्यामुळे तुमची त्वचेला पुरेसे ऑक्सिजन मिळते. शांत झोप मिळाल्यास तुमची त्वचा फ्रेश होते. यासाठीच पार्टीनंतर जर तुमची त्वचा निस्तेज दिसत असेल तर त्यामागे तुमची अपूरी झोप कारणीभूत असू शकते यासाठी वेळेवर आणि पुरेशी झोप घ्या. झोप पूर्ण झाल्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर नक्कीच दिसेल. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

 

अधिक वाचा –

वातावरणातील बदलांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे, मग करा हे सोपे उपाय

त्वचा अधिक उजळवण्यासाठी फायदेशीर ठरतं बीट

स्ट्रॉबेरी खा आणि मिळवा सुंदर नितळ त्वचा

 

Read More From Natural Care