Love

2019 संपले तरी अजूनही आहात सिंगल, तर मग वाचाच

Leenal Gawade  |  Dec 18, 2019
2019 संपले तरी अजूनही आहात सिंगल, तर मग वाचाच

आणखी एक वर्ष निघून गेलं आणि अजूनही तुम्ही सिंगल असाल तर टेन्शन घेऊ नका. कारण तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही कारण 2020 हे वर्ष तुमचं असणार आहे. निराश होऊ नका. उलट येणाऱ्या नवीन वर्षी तुम्हाला सिंगल राहायचे नाही हा विचार करुन तयारी करा. आम्ही तुम्हाला सिंगलच्या याच गिल्टमधून बाहेर काढून काही चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी सांगणार आहोत. ते वाचून तुम्हालाही नक्कीच रिलेशनशीपबद्दल थोडा वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल.

2019 संपायच्या आत पाहा हे बेस्ट चित्रपट

रिलॅक्स व्हा चांगला विचार करा

Instagram

आजुबाजूला सगळयांचे चांगले सुरु असेल तर त्यात निराश होण्यासारखे काही नाही. म्हणजे ठिक आहे. त्यांना त्यांचा जोडीदार मिळाला. तुम्हाला मिळाला नाही म्हणून निराश होण्यासारखं तसं काहीच नाही. छान रिलॅक्स व्हा चांगल्या गोष्टींचा विचार करा आणि प्रत्येकाला त्याचा जोडीदार मिळतोच याचा विचार करुन आहे तो क्षण एन्जॉय करणं सोडून देणं अजिबात चांगले नाही.

मस्त फिरा काय माहीत तुमची कोणीतरी वाट पाहत असेल

Instagram

आता तुमचा जोडीदार तुमच्यासाठी तुमच्या घराबाहेरच येऊन थांबला असेलच असे नाही ना? सिंगल आहात म्हणून स्वत:ला बंदिस्त करुन ठेवू नका. उलट तुम्ही सिंगल आहात म्हणजे तुम्हाला संधी आहे. तुम्ही मस्त बाहेर पडा. छान टूर अरेंज करा. काय माहीत तुम्हाला हवा असलेला जोडीदारही असाच तुमच्या शोधात बाहेर फिरत असेल. तुमची भेट होईल आणि तुम्हाला प्रेमही होईल.

तुमच्या मोबाईलमध्ये हवीत ही 2019ची पावर पॅक गाणी

सोशल नेटवर्क साईडवर राहा अॅक्टीव्ह

Instagram

सोशल नेटवर्कींग साईडवर इतरांचे कमिटटेडवाले फोटो पाहून तुम्ही तिथे अॅक्टीव्ह राहणे    बंद केले असेल तर आजपासून तुम्ही सोशल मीडियावर अॅक्टीव्ह राहा तुमचे नवीन फोटो अपलोड करत राहा. तुम्ही सिंगल आहात म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त लोकांसोबत बोलण्याची संधी असते. हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा जोडीदार मिळू शकतो. तुम्ही त्याची योग्य ती शहानिशा करुन त्याच्याशी संपर्क वाढवा.

स्वत:कडे लक्ष द्या

Instagram

काही जण सिंगल असतात त्यांना असं वाटतं की, असंही आपल्याला कोणी पाहात नाही त्यामुळे ते स्वत:कडे लक्ष देणे तुम्ही बंद केले असेल तर तुम्ही तुमच्याकडे अधिक लक्ष द्या. तुमचं स्वत:वर प्रेम असणे फारच गरजेचे असते. त्यामुळे स्वत:कडे अधिक लक्ष द्या. तुम्हाला तुमच्या प्रेमात पाडा. असे कराल तरच तुम्हाला दुसऱ्यावरही प्रेम होण्यास मदत होईल. 

आता इतके सगळे करुनही तुम्ही जर सिंगल रहिलात तरी तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तुम्ही सिंगल राहिलात तरी तुमचे आयुष्य चांगले आहे. तुम्हाला इतरांचा विचार न करता तुमचे आयुष्य जगायचे आहे आणि हो तुम्हाला हवा असलेला जोडीदार तुम्हाला अगदी हमखास मिळणार आहेच फक्त तुम्ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करु नका. 

#POPxoLucky2020: आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत खास राशींचंं कलेक्शन (Zodiac Collection)!2020 अगदी आपल्या जवळ येऊन ठेपलं आहे. वर्षाचा शेवट होत आला की आपण वाट पाहतो ती नवीन वर्षाची आणि त्याचबरोबर आपल्याला जाणून घ्यायचं असतं ते म्हणजे आपलं हे वर्ष नक्की कसं जाणार. पण आता तुम्हाला जास्त वाट पाहावी नाही लागणार कारण POPxo app तुमच्यासाठी काही खास घेऊन आलो आहोत.

Read More From Love