वेगवेगळे सण आणि उत्सव उंबरठ्यावर असल्याने सगळीकडे उत्साहाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. महामारीची भीती बाजूला ठेवून लोकांनी खरेदी करण्यास आणि सण साजरे करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, महामारीमुळे परिस्थितीमध्ये बरेच बदल झालेले असल्याने स्टायलिंगकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू लागला आहे. स्टाईलमध्ये सातत्याने बदल करणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन यावर्षीच्या रक्षाबंधनाला काहीतरी ट्रेंडी, आरामदायी स्टाईल करायला हवी. लवकरच साजरा होणार असलेला रक्षाबंधन हा सण बहीण व भाऊ यांचं नातं साजरं करणारा सण आहे. या सणाचं पारंपरिक महत्त्व खास शैलीत जपण्यासाठी रक्षाबंधन शुभेच्छा देण्यासोबतच लोक नवे कपडे, वस्तू, भेटवस्तू खरेदी करतात. गेल्या वर्षी आपल्याला नवे कपडे घालण्याची आणि सण साजरा करण्याची फारशी संधी मिळाली नाही, पण या वर्षी मात्र सण साजरा करता येऊ शकणार आहे. यंदा रक्षाबंधनाच्या निमित्ताने छान कपडे घालण्यासाठी विचारात घेता येतील, असे निरनिराळे पर्याय, तसेच काही स्टायलिंग टिप्स, आऊटफिटचे पर्याय पारिका रावल, डिझाईन हेड, मडाम यांच्याकडून POPxo मराठीने जाणून घेतले. याची खास माहिती तुमच्यासाठी. यावर्षीच्या रक्षाबंधनाला या स्टायलिंग टिप्स तुम्हाला नक्की कामी येतील.
क्रॉप टॉप आणि स्कर्ट (Crop Top and Skirt)
सणांना नेहमीच स्कर्ट चांगले दिसतात आणि योग्य प्रकारचा टॉप, ब्लाउज किंवा शर्ट यांबरोबर ते साजेसे दिसतात. तुम्ही प्लेटेड, ए-लाईन, फुल-लेंथ अम्ब्रेला-स्टाॉईल किंवा अँकल-लेंथ स्कर्ट निवडू शकता. सध्याचा ट्रेंड स्कर्ट आणि कॉलर्ड शर्ट असा आहे. भरजरी स्कर्ट निवडलात तर त्याच्याबरोबर पांढऱ्या किंवा अन्य कोणत्याही रंगाचा प्लेन शर्ट चांगला दिसू शकेल. प्लेन शर्टमुळे स्कर्टचे रंग अधिक उठून दिसतात. या कपड्यांबरोबर, योग्य अॅक्सेसरीज आणि केसांचा हाय पोनीटेल बांधला तरी रुप अधिक खुलेल.
अधिक वाचा – कशीही शरीरयष्टी असली तरी हे स्कर्ट दिसतील एकदम परफेक्ट
कुर्ता आणि ट्राऊझर किंवा जीन्स (Kurta and Trouser or Jeans)
कुर्ता आणि पँट घालण्याची पद्धत आता सर्रास दिसून येते. तुम्हाला पारंपरिक दिसायचं आहे आणि कपडेही आरामदायी हवे आहेत, तर हे कपडे अतिशय सोयीचे ठरतात. सणासुदीसाठी आवश्यक असलेलं आधुनिक व क्लासी रूप, आरामदायीपणा या कपड्यांतून नक्की मिळतो. आणखी खुलून दिसण्यासाठी टिकली, बांगड्या आणि ऑक्सिडाईज्ड दागिने घातले तर आपलं रूप साधं, पण स्टायलिश दिसेल आणि सर्वांचं लक्ष वेधून घेईल. तसेच, तुमच्याकडे वेळ फार कमी असेल तर झटपट तयार होण्यासाठी हे कपडे साजेसे ठरतात. कुर्ता स्ट्रेट फिट, व्ही-नेक, स्लीव्हलेस किंवा थ्री-क्वार्टर स्लीव्हचा निवडा. रक्षाबंधनाचे ताट सजवणे, घरात धावपळ करणे या सगळ्यात हे कपडे आरामदायी ठरतात.
एथनिक मॅक्सी ड्रेसेस (Ethnic Maxi Dresses)
फुल-लेंथ मॅक्सी ड्रेस हा अधिक पारंपरिक दिसण्यासाठी उपयुक्त ठरतो. अनेकदा हा ड्रेस गाउन किंवा लेहेंगा यासारखा दिसतो आणि त्याच्या कापडाच्या फ्लोमुळे व फ्लेअर्ड हेममुळे रूबाबदार दिसतो. या ड्रेसमध्ये नाजूक, किमान डिझाइन असल्यानं तो राजबिंडं दिसण्यासाठी योग्य ठरतो. त्याबरोबर झुमके, हील्स व हलका मेक-अप उठून दिसतो. सेल्फ-डिझाइन स्लीव्ह, फ्लाउन्स्ड हेम, जोडलेल्या लायनिंगसह वोव्हन मॅक्सी ड्रेस असा इंडो वेस्टर्न एथनिक मॅक्सी ड्रेसही निवडू शकता. छान नेकपिस व मॅचिंग हील्स हा ड्रेस परिपूर्ण करतात.
ए-लाईन ड्रेस (A Line Dress)
सणासुदीदरम्यान सर्वांमध्ये शोभून दिसायचं असेल तर ए-लाईन ड्रेस हा उत्तम पर्याय आहे. व्ही नेक, बबल स्लीव्ह, फ्लेअर्ट हेम, पुढे स्लिट अशी फॅशन असलेला, छान प्रिंट असलेला ए-लाईन ड्रेस घातला तर तुम्ही नक्की सगळ्यांमध्ये आकर्षक दिसाल. गडद रंग वापरण्याचा प्रयोगही तुम्ही करू शकता. त्याबरोबर अनेकदा लांब कानातले आणि हाय हील्स घातले जातात. ए-लाईन ड्रेसचा आणखी एक प्रकार म्हणजे, ब्लाउसन ड्रेस. हा ड्रेस अनेकदा पेस्टल, अर्दी व बेज शेडमध्ये असतो. ड्रेसच्या वरच्या भागात ब्लाऊज पॅटर्न असतो, कमरेवर क्लिंच असतो. भरपूर बांगड्या, गोल्ड हील्स, कमीत कमी मेक-अप असल्यास रूप अधिक खुलून दिसू शकेल.
एथनिक जाकिट (Ethnic Jacket)
लेहेंगा व ब्लाउज आणि दुपट्टा वापरण्याऐवजी तुम्ही केपची निवड करू शकता. तुमच्या आवडत्या साडीबरोबर एथनिक जाकिट घालण्याचाही विचार करू शकता. थोडा वेस्टर्न लुक देण्यासाठी त्याबरोबर वेस्टबँड, एजी बेल्ट घाला. जाकिट आणि बाकी कपड्यांची रंगसंगती नेहमी रूप खुलवते.
अधिक वाचा – या 5 टिप्सच्या सहाय्याने गृहिणीही दिसू शकतात स्टायलिश, करा फॉलो
ट्विनिंग आउटफिट (Twinning Outfit)
कपड्यांचं ट्विनिंग करणं, हा सध्याचा लोकप्रिय ट्रेंड आहे. इतरांपेक्षा वेगळं दिसायचं असेल तर तुमच्या भावासारखे कपडे घाला. यामुळे प्रत्येकाचं लक्ष तुमच्याकडे वेधलं जाईल. भावंडांमधलं घट्ट नातं दाखवणारे, धमाल दिसणारे अनेक ट्विनिंग सेट सहज उपलब्ध आहेत. गमतीदार प्रिंट, कॉटन सेट किंवा बहीण व भाऊ यांची आवड लक्षात घेऊन तयार केलेले थीम-बेस्ट आउटफिट यांची निवड तुम्हाला करता येईल. इंडो-वेस्टर्न आऊटफिट व अॅबस्ट्रॅक्ट प्रिंट यासाठी अनेकांना मिंट, गुलाबी, ग्रे, पीच अशा पेस्टल छटा आवडतात. तुम्ही आर्द्रता व उकाडा अधिक असलेल्या ठिकाणी राहत असाल तर मिरर वर्क असलेल्या कुर्ती, जॉर्जेट व शिफॉन मॅक्सी ड्रेस निवडू शकता.
आरामदायी वाटतील असे कपडे निवडणं आणि त्याबरोबर योग्य फूटवेअर, दागिने व अक्सेसरीज घालणं महत्त्वाचं आहे. यामुळे तुम्ही ऐटदार दिसाल. तुम्हाला नवे प्रयोग करायला आवडत असेल तर सगळ्या गोष्टी साध्या निवडाव्यात. तसंच लिपस्टिक किंवा डोळ्यांसाठी गडद रंग निवडून मेक-अप मात्र साधा करावा. आंतरराष्ट्रीय संस्कृतीशी आपली पुरेशी ओळख झालेली आहे, परंतु त्याचबरोबर देशातल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि पारंपरिक कपड्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. थोडी स्टाईल, ट्रेंड आणि फॅशन यांची सांगड घालून सणांदरम्यान पारंपरिक कपडे परिधान करायला नक्कीच हरकत नाही!
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक