Recipes

सुक्या जवळ्यापासून बनवा या मस्त रेसिपी (Jawala Recipes In Marathi)

Leenal Gawade  |  Dec 22, 2020
Jawala Recipes In Marathi

कोकणाचे मुख्य अन्न म्हणजे ‘भात आणि मासे’ शाळेतल्या पुस्तकात हे सगळ्यांनीच वाचलं आहे. पण ताज्या मासळीसोबतच कोकण आणि कोकणकिनाऱ्यापासून लांब असलेल्या ठिकाणी सुके मासे खाण्याची पद्धत आहे. बांगडा, सुरमई, रावस, जवळा, कर्दी, बोंबील असे काही मासे जास्त असतील तर ते उन्हाळा कडकडीत वाळवले जातात. सुकवलेले मासे एअर टाईट डब्यात भरुन ते वर्षानुवर्ष टिकवले जातात. ज्यावेळी ओले किंवा ताजे मासे मिळत नाहीत अशावेळी सुके मासे हे सगळीकडे आवर्जून खाल्ले जातात. कोकणात ओले मासे हे नेहमीच मिळत असले तरी देखील सुक्या माशांसाठी नक्कीच एक दिवस राखून ठेवलेला असतो. प्रवासात किंवा कोठेही बाहेर जाताना जर मासे खायचे असतील तर असे सुकट नेहमीच केले जाते. सुक्या माशांमधील ‘सुका जवळा’ हा प्रकार देखील अनेकांना आवडणारा असा आहे. सुक्या जवळ्यांच्या वेगवेगळ्या रेसिपी (jawala recipes in marathi) बनवल्या जातात. सुक्या जवळा रेसिपीचे वेगवेवगळे प्रकारच आज आपण पाहणार आहोत. या रेसिपी फारच सोप्या असून तुम्ही त्या माशांच्या वाराला कधीही करु शकता. 

जवळा मसाला (Javla Masala Recipe In Marathi)

Instagram

जवळाचा उपयोग करुन  केली जाणारी ही रेसिपी अनेकांच्या घरात केली जाते. हा थोडासा ओलसर असा जवळाचा प्रकार आले. जवळा मसाला हा तुम्हाला मस्त भाकरी आणि कांद्यासोबत खाता येतो. 

साहित्य: 1 वाटी सुका जवळा, 1 मोठा कांदा, 1 मोठा टोमॅटो, 10-12 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, हळद, तिखटाच्या प्रमाणानुसार मालवणी मसाला, ½ चमचा गरम मसाला, 5-6 कोकमं, मीठ, तेल ,पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती: 

जवळा चटणी (Javla Chutney)

Instagram

प्रवासासाठी बाहेर जायचे असेल किंवा एखाद्या पिकनिकसाठी जायचे असेल अशावेळी जवळ्याचा हा सुका प्रकार तुम्हाला करता येईल. जवळा मसालाप्रमाणेच याची रेसिपी असली तरी देखील यामध्ये टोमॅटो घातला जात नाही.टोमॅटोमुळे एखादा पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते.

साहित्य: 1 वाटी जवळा, 1 मोठा कांदा, 1 मोठा चमचा आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, धणे पावडर, हळद, गरम मसाला, कोथिंबीर, तेल थोडे जास्त,मीठचवीनुसार, कोकम

कृती: 

जवळा भजी (Jawala Bhaji Recipe In Marathi)

Instagram

तळणीचे पदार्थ तुम्हाला खायला आवडत असतील तर जवळा भजी हा प्रकार तुम्ही करुनच पाहायला हवा. जवळा भजी ही नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी एक मस्त स्टाटर्सचा प्रकार आहे जो अधिक चांगला लागतो. याला सुका जवळा वडे असे देखील म्हणतात. हे एक उत्तम नॉनव्हेज स्टाटर्स पैकी एक आहे

साहित्य: 1 वाटी सुका जवळा, ½ वाटी बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार चिंचेची पेस्ट, 1 छोटा चमचा ओवा, लाल तिखट, हळद, आलं-लसूण- मिरची पेस्ट आवश्यकतेनुसार भाजणीचे पीठ,पाणी, तेल तळण्यासाठी

कृती:

जवळा आमटी (Jawala Gravy Recipe In Marathi)

Instagram

अनेकांच्या घरी सुकटीची आमटी करण्याची पद्धत आहे. त्याला कालवण असेही म्हणतात. भातावर मस्त गरम गरम कालवण घेऊन ताव मारता येतो. जाणून घेऊया या जवळा आमटी किंवा कालवणाची सोपी रेसिपी

साहित्य: 1 वाटी सुका जवळा गरम पाण्यात भिजवून पिळून घेतलेला, आलं-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, मीठ, तेल, कोकम,धणे जीरे पूड, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 वांग, 4-6 शेवग्याच्या शेंगाचे तुकडे, ½ टोमॅटो, 1 बटाटा, कोथिंबीर, आमसुलं

कृती:

आग्री पद्धतीचे जवळा सुकट (Agri Style Jawala Sukat)

Instagram

माशांचे कालवण हे वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. कोकणात, गोव्यात, देशावर हे बनवण्याची पद्धत फार वेगवेगळी आहे. आग्री पद्धतीचे जेवणही फार वेगळ्या पद्धतीने केले जाते. आग्री पद्धतीत नेमका काय फरक असतो ते जाणून घेऊया.

साहित्य: 1 वाटी गोलम किंवा जवळा (जवळ्याला गोलम असे म्हणतात), 1 वाटी बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, 10-12 बारीक चिरलेल्या लसणीच्या पाकळ्या, आगरी मसाला, हळद, आमसुल, कोथिंबीर, पाणी, तेल, मीठ आवश्यकतेनुसार

कृती:

सुकटीचे आंबट (Suakticha Aambat)

Instagram

सुकटीचे आबंट हा प्रकार देखील अनेक ठिकाणी खाल्ला जातो. विशेषत: आग्री किंवा कोकणातल्या काही भागात सुकटीचे आबंट केले जाते. जाणून घेऊया हे करण्याची योग्य पद्धत

साहित्य: 1 वाटी जवळा, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कैरी,हळद, तिखट, गरम मसाला,तेल, मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी

कृती:

जवळा आणि वांग ग्रेव्ही (Jawala And Vangi Gravy)

Instagram

जवळा हा वांग्यासोबत अधिक चांगला लागतो. अनेक ठिकाणी जवळा वांग्यामध्ये स्टफ करुन खाल्ला जातो. जवळा आणि वांगी ही पारंपरिक अशी डिश आहे जी तुम्ही नक्कीच कधीतरी करुन पाहायला हवी. महाराष्ट्रीयन थाळीमध्ये तुम्ही याचा समावेश करु शकता. कारण ही पारंपरिक डिश आहे.

साहित्य: 1 वाटी सुका जवळा, 1 बारीक चिरलेला कांदा, ½ वाटी पातीचा कांदा, 1  वांग, आग्री कोळी मसाला, हळद, तिखट, मीठ, कोकम तेल, आलं-लसूण पेस्ट

 कृती:

 

जवळा पुलाव किंवा राईस (Jawala Pulao)

Instagram

जवळा पुलाव किंवा जवळा राईस हा अनेकांकडे बनवला जातो. ज्यांना झटपट पूर्ण जेवण आणि त्यात मासेही हवे असतात अशा लोकांकडे हा पदार्थ अगदी हमखास बनवला जातो.

साहित्य: उरलेला शिळा भात, 1 वाटी जवळा, आलं-लसूण पेस्ट, तेल, कांदा,मीठ

कृती:  

सुका जवळा (Dry Jawala)

Instagram

सुका जवळा असे जरी या रेसिपीला म्हटले तरी देखील सुका जवळ्याची ही एक वेगळ्या प्रकारची चटणी आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. ही चटणी अगदी झटपट आणि पटकन करता येते.

साहित्य: 1 वाटी बारीक सुका जवळा, ½ चिरलेला कांदा, तिखटानुसार चिरलेली मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट, लिंबाचा रस, मीठ

कृती:

जवळ्याचं किसमूर (Jawlyach Kismura)

Instagram

जवळ्याचे किसमूर ही रेसिपी देखील अनेक ठिकाणी बनवली जाते. जवळ्याची ही एक प्रकारची कोरडी चटणी असून तुम्ही ती अगदी कधीही करु शकता. याच्यासाठी फार साहित्यही लागत नाही आणि यासाठी फार वेळही लागत नाही.

साहित्य: 1 वाटी सुका जवळा, 1 वाटी कांदा, दोन चमचे तेल, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे ओलं खोबरं, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिंचेची चटणी

कृती:

असा स्वच्छ करा जवळा (How To Clean Jawala In Marathi )

Instagram

ओले मासे आणि सुके मासे साफ करण्यामध्ये खूप फरक आहे. ओले मासे हे साफ करणं फार कठीण असतं. पण सुक्या माशांच्या बाबतीत असे होत नाही. जवळा हा तर एकदम स्वच्छ आणि पांढरा फडफडीत असा मासा. तो ओला असतानाही फार कटकट नसते. आणि सुकल्यावरही नाही. पण तरीही हे जास्त काळ टिकवायचे असेल तर असा करा स्वच्छ 

  1. सुका जवळा हा इतका कोरडा होतो की, त्याचा अगदी चटकन भुगा होतो. त्यामुळे हा भुगा आधी स्वच्छ करण्यासाठी जवळा चाळणीतून चाळून घ्या. त्यामुळे त्यातील मातीही निघून जाते.
  2. जवळा सुकवताना त्यामध्ये अनेकदा लहान लहान इतर मासेही येतात. त्यामुळे जवळा बाहेरुन आल्यावर चांगला स्वच्छ करुन घ्या. 
  3. जवळा जास्त काळ टिकवून ठेवायचा असेल तर तो एअर टाईट डब्यामध्ये भरुन ठेवा. त्यामुळे तो अधि काळ टिकतो.

आता जवळ्याच्या या रेसिपीज नक्की ट्राय करुन पाहा तुम्हाला नक्की आवडतील. सुकटीच्या आणखी कोणत्या रेसिपीज तुम्हाला माहीत आहेत त्यादेखील आम्हाला कळवा.

जाणून घ्या कुळीथ (हुलगे)चे अफलातून फायदे आणि रेसिपीज (Benefits of Kulith Dal In Marathi)

Read More From Recipes