Fitness

हिवाळ्यात सन बाथ करणं आहे लाभदायक, पण ‘या’ दोन गोष्टी ठेवा लक्षात

Harshada Shirsekar  |  Dec 18, 2019
हिवाळ्यात सन बाथ करणं आहे लाभदायक, पण ‘या’ दोन गोष्टी ठेवा लक्षात

निरोगी आयुष्यासाठी हाडे बळकट असणं सर्वाधिक महत्त्वाचे आहे. हाडांसाठी आवश्यक प्रमाणात ‘व्हिटॅमिन डी’चा योग्य प्रमाणात पुरवठा होणंही गरजेचं आहे. बहुतांश वेळा वातावरणातील प्रदूषणामुळे कोवळ्या सूर्यकिरणांद्वारे मिळणारे नैसर्गिक स्वरुपातील ‘व्हिटॅमिन डी’ शरीरापर्यंत पोहोण्यास अडथळे निर्माण होतात. आहारातील पोषक घटकांची कमतरता, शरीराच्या देखभालीकडे दुर्लक्ष होणे यांसारख्या असंख्य कारणांमुळे अनेकांना ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेचा सामना करावा लागतो. सनबाथ घेण्याची  योग्य वेळ आणि शरीरातील व्हिटॅमिन डीची समतोल पातळी राखण्यासाठी बरेच संशोधन करण्यात आले आहेत. साधारणतः असे म्हटलं जाते की शरीराचा 20 टक्के भाग म्हणजे हाता-पायांवर दररोज 15 मिनिटे कोवळी ऊन घेतल्यास शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळण्यास मदत होते. अंगावर कोवळे ऊन घेण्यासाठी दिवसातील कोणती वेळ योग्य आहे ते जाणून घेऊया.  

(वाचा :  त्वचेचं आरोग्य जपण्यासाठी वापरा हे 15 बेस्ट बॉडी लोशन)

सन बाथदरम्यान सन-ब्लॉक क्रीम लावणं टाळा

सकाळचे कोवळे ऊन आणि संध्याकाळी उशिरा ‘सन बाथ’ घेल्यास शरीरास उपयुक्त ठरते, असे म्हटलं जातं. पण गैरसमज असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. शक्यतो सकाळी 8 वाजेपर्यंतचे ‘सन बाथ’ करावी. कारण सकाळी 8 वाजेनंतर सूर्यकिरणे अधिक प्रखर होतात आणि ही सूर्यकिरणे तुमच्या त्वचेसाठी हानिकारक असतात. यामुळे तुमची त्वचा काळी पडू शकते. महत्त्वाचे म्हणजे सन बाथ घेताना त्वचेवर सन-ब्लॉक क्रीम किंवा बॉडी लोशन लावू नये, कारण यामुळे व्हिटॅमिन डी मिळण्यास अडथळा निर्माण होतो. 

(वाचा : ‘ओम’कार साधनेचे 11 आरोग्यदायी फायदे, गंभीर आजारातून होईल मुक्तता)

सूर्यकिरणांपासून मिळणारे व्हिटॅमिन डी घेणे बहुतांश वेळा शक्य नसते. यामुळे पर्याय मिळून डेअरी प्रोडक्ट यांसारख्या खाण्या-पिण्याच्या माध्यमातून व्हिटॅमिन डीचं सेवन केले जाते. काही जण डॉक्टरांच्या मार्गदर्शनानंतर ओषधांचेही सेवन करतात. 

(वाचा : कोरड्या-फाटलेल्या ओठांमुळे आहात त्रस्त, ही घ्या टॉप 20 लिप बामची यादी)

शरीर पूर्णतः झाकणं हानिकारक?

संपूर्ण शरीर झाकणाऱ्या महिला आणि सनक्रीम लावणाऱ्या महिलांमध्ये व्हिटॅमिन डीचं प्रमाण अतिशय कमी असते. कारण त्यांच्या शरीराच्या आत सूर्यकिरण पोहोचत नाही. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवतात. लहान मुलांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास त्यांना हाडांचा रोग होण्याची भीती असते. ही समस्या टाळण्यासाठी लहान मुलांच्या आहारात आधीपासूनच पोषक अन्नपदार्थासह त्यांना कोवळे ऊन देखील द्यावे.
(वाचा : ऑफिसमध्ये निर्माण करायचंय स्वतःचं लई भारी इम्प्रेशन, वाचा या टिप्स)

दुसरीकडे थंडीच्या दिवसांमध्ये हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी व्यायाम करणे देखील फायदेशीर ठरेल. कसरतींमुळे हाडे बळकट होतात. ज्यांना ऑस्टिओपोरोसिससारख्या समस्यांचा त्रास आहे, त्यांनी योग गुरू, जीम ट्रेनरच्या सल्ल्यानुसार कसरती कराव्यात.
(वाचा : गरम पाणी पिणाऱ्यांनो वेळीच व्हा सावध, तुमचं आरोग्य आहे धोक्यात)

हे देखील वाचा
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की पाहा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहेत नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स. जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखेच. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काउंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

Read More From Fitness