भारताच्या वायुदलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तानमधील काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बॉम्बहल्ला करत पुलवामावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर हे भारताने उचललेलं महत्त्वाचं पाऊल आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी कँपना भारतीय वायुदलानं 1000 किलोचा बाँम्ब टाकून उद्धस्त केलं आहे. भारतीय वायुदलाच्या 12 मिराज 2000 विमानाने हे गौरवपूर्ण काम केलं. देशातील प्रत्येकजण यामुळे अत्यंत आनंदी असून बॉलीवूडही याला अपवाद नाही. बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटीजने आपला आनंद या सर्जिकल स्ट्राईकनंतर व्यक्त केला आहे.
पहाटे 3.30 वाजता केली कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वायुदलाने आज पहाटे 3.30 वाजता हा बॉम्ब जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर टाकला आणि यामध्ये साधारणतः 300 पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भारताची लढाई ही दहशतावादाशी असून पाकिस्तान दहशवादाला शरण देत असल्याचं नेहमीच सांगण्यात येतं आणि पाकिस्तान नेहमीच भारतावर वार करत असतं. पण आता भारतानेही 40 शहीद झालेल्या जवानांचा बदला घेत हल्ला केला आहे.
बॉलीवूडने केलं ट्वीट
अक्षयकुमार हा स्वतः एका मिलिट्री ऑफिसरचा मुलगा असल्यामुळे नेहमीच आपल्या देशाच्या सुरक्षायंत्रणेच्या मागे खंबीरपणे आणि अभिमानाने उभा असतो. या सर्जिकल स्ट्राईकनंतर अक्षयकुमारने अभिमानाने ट्विट केलं आहे. ‘दहशतवाद्यांच्या तळांचा नायनाट केल्याबद्दल मला तुमचा अभिमान वाटतो. आता शांत बसून चालणार नाही. घरात घुसून मारा’ असं म्हणत अक्षयकुमारने जोश दाखवत वायुदलाचं कौतुक केलं आहे. तर बॉलीवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणनेदेखील भरभरून भारतीय वायुदलाचं कौतुक केलं आहे. अभिनेता आणि नेता असणाऱ्या परेश रावलनं वायुदलाचं कौतुक करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेदेखील आभार मानले आहेत. अभिषेक बच्चनने वायुदलाला मानवंदना देत प्रणाम केला आहे. तर अनुपम खेर, विवेक ओबेरॉय यासारख्या अभिनेत्यांनीदेखील या सर्जिकल स्ट्राईकबद्दल ट्विट करत कौतुक केलं आहे.
अवघ्या बॉलीवूडने केली मदत
14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला आणि पेटून उठला. यावेळी शहीद झालेल्या 40 जवानांच्या कुटुंबासाठी अवघं बॉलीवूड धाऊन आलं. अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार यांनी लगेच त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत केली होती. या हल्ल्याचा कडाडून विरोध केला होता. त्यामुळे आता सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर सर्वांप्रमाणेच या सेलिब्रिटीजनादेखील आनंद झाला आहे.
फोटो सौजन्य – Tweeter, Instgram
हेदेखील वाचा
सिम्बा आता होणार जंगलचा राजा, आला ‘लायन किंग’चा नवा टीझर
Akash-Shloka Pre Wedding: आकाश-श्लोकाच्या प्रि-वेडींग सेलिब्रेशनचे खास फोटोज आणि व्हीडिओ
संजय लीला भन्साळीच्या आगामी चित्रपटासाठी सलमान-प्रियंका पुन्हा एकत्र
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje