बॉलीवूड

ही’ विश्वसुंदरी बॉलीवूडमध्ये 10 वर्षांनी येतेय परत…

Dipali Naphade  |  Dec 9, 2019
ही’ विश्वसुंदरी बॉलीवूडमध्ये 10 वर्षांनी येतेय परत…

आतापर्यंत बॉलीवूडने नेहमीच अनेक विश्वसुंदरीना आपले दरवाजे उघडून दिले आहेत. त्यापैकी अनेक अभिनेत्रींना यश मिळालं तर अनेक अभिनेत्री या एक अथवा दोन चित्रपटांमध्ये काम करण्यापुरत्या मर्यादित राहिल्या. पण काही विश्वसुंदरींनी कायमचं प्रेक्षकांच्या मनावर नाव कोरलं आणि त्यापैकी एक आहे ती म्हणजे सर्वांची आवडती अभिनेत्री सुश्मिता सेन. आपल्या प्रेमळ बोलण्याने आणि वागण्याने तिने नेहमीच सर्वांचं मन जिंकून घेतलं. इतकंच नाही तर अगदी लहान वयात दोन मुलींना दत्तक घेऊन तिने एक वेगळा पायंडाही घालून दिला. ही विश्वसुंदरी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकायला 10 वर्षांनी मोठ्या पडद्यावर परत येत आहे. याबद्दलची घोषणा सुश्मिताने स्वतः सोशल मीडियावर केली आहे. तिने ही घोषणा केल्यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिने लवकरच परत यावं असे अनेक मेसेज तिला येत आहेत. 

सुश्मिता सेननंतर तिच्या भावाच्या नात्यात दुरावा,प्रसिद्धीसाठीचा हा दिखावा

सुश्मिता आपल्या चाहत्यांसाठी येतेय परत

सुश्मिताने आपण परत येत असल्याचं एका फोटोसह पोस्ट केलं आहे. सुश्मिता जरी मोठ्या पडद्यावर काम करत नसली तरीही ती नेहमी आपल्या चाहत्यांसाठी अनेक फिटनेस व्हिडिओ आणि आपल्या आयुष्यातील गोष्टी शेअर करत असते. सुश्मिताने नुकताच आपला 44 वा वाढदिवसदेखील साजरा केला तेव्हा तिने आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण चाहत्यांसह शेअर केले होते.  आता पुन्हा एकदा आपण परत येत असल्याचं सुश्मिताने स्पष्ट केलं आहे. तिने पोस्ट शेअर करताना भावनिक होत शब्द लिहिले आहेत, ‘संयम असणारं प्रेम मला नेहमीच आवडतं. यामुळेच मी माझ्या चाहत्यांची मोठी चाहती आहे. माझ्या चाहत्यांनी माझ्यासाठी संयमाने मी मोठ्या पडद्यावर यावं यासाठी 10 वर्ष वाट पाहिली आहे. कोणत्याही अटी आणि शर्तींंशिवाय माझ्या प्रत्येक गोष्टीत त्यांनी मला साथ दिली आहे.’ असं म्हणत सुश्मिताने आपल्या चाहत्यांवरील प्रेम व्यक्त केलं आहे. आता सुश्मिता नक्की कोणत्या चित्रपटातून पुनर्पदार्पण करत आहे हे मात्र तिने स्पष्ट केलं नाहीये. पण आपण लवकरच मोठ्या पडद्यावर परत येत आहोत हे मात्र तिने सांगितलं आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाहीये हे तर निश्चितच. 

#Engagement – मिस युनिव्हर्स सुश्मिताला मिळाला मिस्टर परफेक्ट

सुश्मिताचा बॉयफ्रेंड रोहमननेदेखील व्यक्त केला आनंद

सुश्मिता आणि रोहमन एकमेकांवर प्रेम करतात हे तर आता जगजाहीर आहे. या बातमीनंतर रोहमननेदेखील आपला आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. रोहमनने सुश्मिताचा फोटो रिपोस्ट करत लिहिले, ‘आता अजिबात शांत नाही राहू शकत. वेलकम बॅक! माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तुझा अभिमान आहे. चल आता हे आपण करून दाखवू’. रोहमन आणि सुश्मिता नेहमीच आपले एकमेकांबरोबर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात. खरं तर रोहमन सुश्मितापेक्षा 14 वर्षांनी लहान आहे. पण तरीही ते एकमेकांना खूप जपतात आणि लवकरच हे दोघं लग्न करणार असल्याच्या बातम्यांनीही सध्या जोर धरला आहे. रोहमनदेखील मॉडल असून बऱ्याच जाहिरातींंमध्ये रोहमन काम करताना दिसला आहे. शिवाय रोहमन आणि सुश्मिता अनेक ठिकाणी एकत्र येताजाताना दिसतात. त्याचेही व्हिडिओ व्हायरल होत असतात. दोघांनीही सार्वजनिक पातळीवरही आपलं प्रेम स्वीकारलं आहे. इतकंच नाही तर रोहमन नेहमीच सुश्मितासाठी अनेक सरप्राईजदेखील प्लॅन करत असतो. तर सुश्मिताही त्याच्यावरील आपलं प्रेम व्यक्त करताना दिसते.

बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणारी ही विश्वसुंदरी या कारणांमुळे राहिली चर्चेत

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From बॉलीवूड