आरोग्य

पावसाळी आजारांपासून दूर राहण्यासाठी विशेष खबरदारी घेणे आवश्यक

Dipali Naphade  |  Aug 21, 2020
पावसाळी आजारांपासून दूर राहण्यासाठी विशेष खबरदारी घेणे आवश्यक

 

जुलै ते सप्टेंबर आपल्या भारतातला मान्सून कालावधी आहे मात्र या वर्षी ऑगस्ट महिन्यात पावसाने अगदी हाहाःकार माजवला आहे. हा पावसाळा जितका अल्हाददायक असतो तितकाच आजारांना आमंत्रण देणाराही आहे. आजार आणि संक्रमण,ज्यामुळे आपण आणि आपल्या कुटुंबासाठी गंभीर धोका असू शकतो. मान्सूनमध्ये इतर कोणत्याही ऋतूच्या तुलनेत व्हायरस, जीवाणू आणि इतर संसर्ग होण्याचा धोका दोन पटीने अधिक असतो. प्रतिबंधात्मक आणि स्वच्छताविषयक उपायांमुळे पावसाळी आजारांपासून आपण सुरक्षित राहू शकतो. पावसाळ्यातील सर्वात सामान्य आजार हे डास, पाणी, हवा आणि दूषित अन्न अशा चार माध्यमातून पसरतो. याचविषयी अधिक माहिती दिली आहे, झोनल टेक्निकल हेड, अपोलो डायग्नोस्टिक्सचे डॉ. संजय इंगळे यांनी

डासांमुळे होणारे संक्रमण

Shutterstock

 

मान्सूनचा कालावधी हा डास आणि डासांमुळे होणा-या आजारांसाठी प्रजनन काळ आहे. डासांमुळे आजारांमध्ये जगभरातील रुग्णांपैकी  लक्षणासह डेंग्यूचे 34% रुग्ण आणि मलेरियाच्या 11% रुग्णांचे हे केवळ भारतात आढळून येतात.

मलेरिया : हा आजार अ‍ॅनोफेलस जातीच्या डासाच्या मादीमुळे होतो. साचलेल्या पाण्याच्या डबक्यात या डासांची पैदास होते. ताप, अंगदुखी, थंडी वाजून येणे आणि घामही येणे ही या रोगाची लक्षणे आहेत.

डेंग्यू : पहाटे तसेच सकाळच्या वेळी डास चावल्याने होणा-या या आजारात सततची डोकेदुखी, खूप ताप, पुरळ आणि सांधे व स्नायूंमध्ये वेदना उद्भवतात.पहिल्या लक्षणांमध्ये ताप आणि थकवा यांचा समावेश आहे. डेंग्यू तापासाठी विविध प्लेटलेट मॉनिटरिंग करणे आवश्यक आहे.

चिकुनगुनिया– हा विषाणू हा एडीस जातीच्या डासांद्वारे स्वच्छ पाण्यात निर्माण होऊन पसरतो. यात दोन-तीन दिवस ताप येतो, डोके दुखते, अंगावर विशेषतः पाठ,पोट,कंबर या भागांवर पुरळ येते आणि हातापायांचे सांधे विलक्षण दुखू लागतात. ही सर्व चिकनगुनियाची लक्षण आहेत. हे दुखणे अतिशय तीव्र प्रमाणात असते. पायांचे घोटे, गुडघे, तळपायांचे सांधे यांना या आजारात विशेषकरून त्रास होतो. साधे चालणे, पायांची मांडी घालणेसुध्दा वेदनाकारक होते. आजार बरा झाला तरी पुढील बराच काळ हे हात-पाय दुखणे सुरूच राहते.

पाण्यामुळे होणारे रोग

Shutterstock

 

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, भारतात 3..4 दशलक्षांहून अधिक लोकांना दुषित पाण्यामुळे होणा-या आजारांनी ग्रासले आहे.

टायफाइड – हा दुषित पाण्यामुळे पसरणारा आजार आहे. ताप, डोकेदुखी, सांधेदुखी आणि घसा खवखवणे ही या आजाराची लक्षणे आहेत. टायफॉइड तापाची चाचणी करण्यासाठी टायफाइड टायफी आयजीएम आणि विडल एग्लूटिनेशन या चाचण्या करणे आवश्यक आहे.

लेप्टोस्पायरोसिस : त्वचेवर कुठे कापले असेल किंवा डोळे, तोंड आणि नाक यांचा प्राण्यांचे मूत्र किंवा प्राण्यांचे मूत्र असलेले पाणी यांच्याशी संपर्क झाला तर हा भयानक आजार उद्भवू शकतो. काहीही लक्षणं दिसून न येणे इथंपासून डोकेदुखी, स्नायूतील वेदना आणि पार फुफ्फुसात रक्‍तस्त्राव किंवा मेंदूदाह ही या आजाराची लक्षणे आहेत.

हिपेटायटीस : विषाणूमुळे होणारा हा खूपच संसर्गजन्य आजार आहे. पाण्यातून पसरणारा हा विषाणू असून बाधित विष्टेमुळे दूषित झालेल्या अन्‍न वा पाण्यामुळे हा आजार बळावतो. त्यामुळे कावीळ होते (पिवळे डोळे आणि त्वचा, गडद रंगाचे मूत्र) तसेच पोटदुखी, भूक मंदावणे, अन्‍नावरील इच्छाच उडणे, ताप, डायरिआ आणि अशक्‍तपणा जाणवतो.

व्हायरल फिव्हर – यामध्ये सुरुवातीस तीव्र स्वरूपाचा ताप, अशक्तपणा जाणवणं, अंगदुखी हाता-पायांमध्ये वेदना होणं ही प्राथमिक लक्षणं दिसून येतात.

पावसाळ्यातील त्वचेच्या समस्या, अलर्जी आणि त्याची काळजी

हवेमुळे होणारे आजार

 

बदलत्या वातावरणामुळे सामान्य फ्लू, विषाणूजन्य ताप, सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे बहुतेक सौम्य किंवा तीव्र प्रमाणाता आढळून येतात. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याने पावसाळ्यात ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना जास्त संसर्ग होण्याची शक्यता असते. अशा संक्रमणापासून दूर राहण्यासाठी खालीली गोष्टींचे पालन करा.

पावसाळ्यात हवेत जास्त प्रमाणात ओलावा असणे हे  बुरशीजन्य आणि बॅक्टेरियाचा संसर्ग वाढवू शकते.  परिणामी त्वचा आणि केसांच्याही विविध समस्या उद्भवू शकतात. मुरुम, पुरळ, एलर्जी, केस गळणे आणि डोक्यातील कोंडा ही या हंगामात आपल्याला भेडसावणारी सामान्य समस्या आहे.

पावसाळ्यात हे घरगुती उपाय करून आजारपण ठेवा दूर

पावसाळ्यात सुरक्षित राहण्यासाठी आपण करू शकता अशा काही गोष्टी –

 

आईला असेल ताप आणि सर्दी, तर बाळाला स्तनपान करावे का

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

Read More From आरोग्य