Recipes

घरच्या घरी बनवा 15 मिनिट्समध्ये झटपट रव्याचे गुलाबजाम

Dipali Naphade  |  Mar 17, 2020
घरच्या घरी बनवा 15 मिनिट्समध्ये झटपट रव्याचे गुलाबजाम

कोणताही सण आला की नक्की घरी काय बनवायचं असा प्रश्न निर्माण होतो. मग इतका घाट कशाला घालायचा चला बाहेरूनच काहीतरी विकत आणू असंही ठरतं. पण वेळ वाचवून तुम्ही घरच्या घरी अगदी 15 मिनिट्समध्ये झटपट रव्याचे गुलाबजाम नक्कीच करू शकता. हे करण्यासाठी ना जास्त वेळ लागत ना खर्च. बाहेरून काहीतरी गोडधोड पदार्थ आणण्यापेक्षा घरच्या घरी केलेल्या गोड पदार्थांना एक वेगळीच आपुलकी असते आणि गोडवाही. अगदी सणासुदीला नाही पण घरातही कधीतरी भाजी अथवा अन्य गोष्टी खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही असे रव्याचे गुलाबजाम करून खाऊ शकता आणि तुमच्या घरच्यांनाही खुष करू शकता. रव्याचे खरं तर अनेक पदार्थ तयार करता येतात. आपण या लेखातून हे रव्याचे गुलाबजाम कसे बनवायचे आहेत ते जाणून घेणार आहोत. तसंच हे गुलाबजाम करणं अतिशय सोपं आहे. खरं तर गुलाबजाम करायचे म्हटलं की ते खूपच कठीण काम वाटतं पण  तसं अजिबात नाही. तुम्हाला अगदी पटकन हे करून त्याचा आस्वाद घेता येतो. जाणून घेऊया कसे करायचे गुलाबजाम. 

सकाळच्या नाश्त्याला निवडा तांदळाच्या उकडीचा झटपट पर्याय

रव्याचे गुलाबजाम करण्यासाठी लागणारे साहित्य

Shutterstock

यामध्ये आपण खवा न वापरताच आपण करू शकतो. घरातले काय साहित्य यासाठी आपण वापरू शकतो ते पाहूया 

पाकासाठी

गुलाबजाम तळण्यासाठी तेल अथवा तूप

रव्याचे फायदे (Benefits of Semolina)

चविष्ट उपमा बनविण्यासाठी रवा आणि पाण्याचे प्रमाण असावे योग्य

झटपट रवा गुलाबजाम बनवण्याची कृती

Shutterstock

सर्वात आधी पाक तयार करावा. त्यासाठी आधी एका पॅनमध्ये साखर घ्या. त्यामध्ये पाणी घाला आणि वेलची पावडर त्यामध्ये घाला. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये केसर, बदाम पिस्ते यांचे तुकडे घालूनही तुम्ही घालू शकता. मंद आचेवर गॅस ठेवून याला उकळी येऊ द्यावी. हा पाक एकतारी अथवा दोनतारी न करता थोडा चिकटसर करा. त्यानंतर तयार पाक बाजूला ठेवून द्या. यानंतर गुलाबजाम कसे बनवायचे त्याची कृती जाणून घेऊया.

एका पॅनमध्ये दूध गरम करा. त्यात साखर आणि तूप घाला. ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. उकळायला सुरूवात झाल्यानंतर एका हाताने रवा घालत जावा आणि दुसऱ्या हाताने ते मिश्रण ढवळत राहावं जेणेकरून रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत. यानंतर व्यवस्थित गोळा तयार होतो. त्यानंतर गॅस बंद करा. हे सर्व करत असताना गॅस मंद आचेवरच ठेवणं आवश्यक आहे. अन्यथा दूध आणि रवा दोन्ही जळेल. गॅस बंद केल्यानंतरही हा तयार झालेला गोळा मिनिटभर तुम्ही पॅनमध्ये नीट परतत राहा. लगेचच हे पीठ परातीमध्ये काढून गरम असतानाच मळून घ्यावे. मळताना तुम्ही तूपाचा हात याला लावू शकता. जेणेकरून पीठ तुमच्या हाताला आणि परातीलाही चिकटणार नाही. हे मळून मऊ पीठ तयार झाल्यानंतर याचे लहान लहान गोळे करून घ्या. 

हे गोळे तयार करून झाल्यावर तेल अथवा तूप गरम करून घ्या. हे तेल वा तूप जास्त तापलेले अथवा जास्त थंड नाही याची खात्री करून मगच गुलाबजाम त्यामध्ये टाका. तळत असताना एका वेळी जास्त गोळे तळायला टाकू नका.  गॅस मंद आचेवर ठेवा आणि गुलाबजाम तळताना त्याला झारा न लावता ज्या कढईत अथवा पॅनमध्ये तुम्ही गोळे तळत आहात ती कढई तुम्ही पकडीने घट्ट पकडून हलवत राहा. हळूहळू याचा रंग बदलायला लागतो. याचा रंग ब्राऊन व्हायला लागला की तुम्ही हे गुलाबजाम कढईतून काढून टिश्यू पेपरवर काढा. गुलाबजाम तळून घेतल्यानंतर तयार पाकामध्ये तुम्ही घाला. याला एक उकळी येऊ द्या. यामुळे पाक गुलाबमध्ये छान मुरतो. पण जास्त उकळी देऊ नका.  गुलाबजाम 15 मिनिट्समध्ये तयार होतात. पण त्यानंतर तुम्ही झाकण ठेवून पाक मुरण्यासाठी हे बाजूला ठेवून द्यावे आणि नंतर खावे. 

तुम्ही बनवलेले कांदे पोहे होतील परफेक्ट तेही दोन मिनिटात, वाचा कसे

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

Read More From Recipes