Care

जाणून घ्या डॅन्ड्रफ आणि ड्राय स्काल्प यातला फरक कसा ओळखावा

Trupti Paradkar  |  Sep 10, 2020
जाणून घ्या डॅन्ड्रफ आणि ड्राय स्काल्प यातला फरक कसा ओळखावा

अनेकींना केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या सतत जाणवत असके. केसांमध्ये येणारा अती घाम, पावसाळ्यात केस सतत ओले राहणं, केस योग्य पद्धतीने न सुकवणं, अती प्रमाणात शॅम्पूचा वापर अशा अनेक गोष्टी याला कारणीभूत असू शकतात. मात्र केसांमध्ये कोंडा होणं आणि स्काल्प कोरडा होणं या दोन वेगवेगळ्या समस्या आहेत. जरी या दोन्ही समस्यांमध्ये स्काल्पवर खाज येत असली आणि केसांमध्ये पांढऱ्या रंगाचे कण दिसत असले तरी या दोन्ही समस्या वेगवेगळ्या आहेत त्यामुळे यावर उपचारही वेगवेगळेच करायला हवेत.

कोंडा होणे आणि ड्राय स्काल्प यातील नेमका फरक काय –

या दोन्ही समस्या वेगवेगळ्या आहेत हे एकदा समजलं की यावर उपचार करणं नक्कीच सोपं जाऊ शकतं.

स्काल्प कोरडा होणं म्हणजे काय –

स्काल्प कोरडा होणं म्हणजे केसांमधील त्वचेतील मऊपणा कमी होणं. केसांमधील त्वचा कोरडी झाल्यामुळे तुम्हाला केसांमध्ये खाज येते, जळजळ आणि दाह जाणवतो. ही तुमच्या शरीरावरील इतर  त्वचा कोरडी होण्यासारखीच एक त्वचा समस्या आहे. जसं की तुमच्या हाता-पायाची त्वचा कोरडी होऊ शकते किंवा चेहऱ्यावरील त्वचा कोरडी होऊ शकते अगदी तशीच ही समस्या आहे. स्काल्प कोरडा होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. कोरडे वातावरण, एखादा त्वचा रोग, वयानुसार त्वचेत होणारे बदल अथवा सतत केस धुण्यामुळे तुमचा स्काल्प कोरडा होऊ शकतो. अशा कोरड्या स्काल्पवर हेअर स्टाईलसाठी अती प्रमाणात एखादे प्रॉडक्ट वापरण्यामुळे अथवा केसांमध्ये धुळ,प्रदुषणाचा संपर्क झाल्यामुळे अशा कोरड्या त्वचेला तीव्र खाज येते. कोरड्या त्वचेमुळे त्वचेच्या वरील डेडस्कीन निघून केसांमध्ये पांढऱ्या रंगाचे कण अथवा पदार्थ दिसू लागतो. हा पदार्थ पांढऱ्या रंगाचा असल्यामुळे तुमचा हा कोंडा आहे असा गैरसमज होतो. मात्र तो कोंडा नाही हे ओळखणं खूप गरजेचं आहे. या समस्येवर उपचार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्काल्पला मॉईस्चराईझ करण्याची गरज आहे. यासाठी अॅंटि डॅड्रफ प्रॉडक्ट न वापरता रात्री केसांना चांगल्या तेलाने मसाज करा आणि सकाळी केस धुवा. चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा हेअर मसाज करा. ज्यामुळे तुमचा ड्राय स्काल्प आपोआप नीट होईल. 

Shutterstock

केसांमध्ये कोंडा होणं म्हणजे नेमकं काय –

केसांमध्ये Seborrheic dermatitis मुळे कोंडा निर्माण होतो. या आरोग्य समस्येमध्ये तुमचा स्काल्प तेलकट, लालसर होतो आणि त्यावर पांढरे कण दिसू लागतात. केसांवर चिकट पांढऱ्या अथवा पिवळसर रंगाचे कण दिसणं यालाच कोंडा होणं असं म्हणतात. त्वचा कोरडी झाल्यामुळे,फंगल इनफेक्शन झाल्यामुळेही तुमच्या केसांमध्ये कोंडा होऊ शकतो. जेव्हा तुमच्या केसांमध्ये कोंडा होतो तेव्हा तुमच्या केसांच्या टेक्चरमध्येही फरक जाणवू लागतो. कारण यामुळे केस तेलकट, चिकट आणि निस्तेज होतात. 

या दोन्ही समस्या कशा ओळखाव्या आणि त्यावर काय उपाय करावे

जरी या दोन्ही समस्या निरनिराळ्या असल्या तरी या दोन्हीमुळे तुम्हाला तीव्र खाज, दाह आणि जळजळ जाणवू शकते. सतत स्काल्प खाजवण्याने केसांमध्ये जखम होणे, रक्त येणे असा त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला कोंडा झाला असेल तर चांगल्या गुणवत्तेचाच अॅंटि डॅड्रफ शॅम्पू वापरा. कोंडा झाल्यावर अॅंटि ड्रॅडफ शॅम्पूचा मारा केल्यामुळेही स्काल्पचे अधिक नुकसान होऊ शकते. यासाठी आधी आठवड्यातून एकदा आणि नंतर पंधरा दिवसांतून एकदा अथवा महिन्यातून एकदा अॅंटि डॅड्रफ शॅम्पू वापरा.  टी ट्री ऑईल, अॅपल सायडर व्हिनेगर अशा घरगुती गोष्टी वापरून तुम्ही केसांमधील कोंडा कमी करू शकता. जर ड्राय स्काल्पसाठी तेल वापरून आणि कोंडा कमी करण्यासाठी वर सांगितलेले उपाय करूनही तुमच्या केसांमधील खास कमी होत नसेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण यामागे एखादी दुसरी त्वचा समस्या कारणीभूत असू शकते. ज्यासाठी तुम्हाला अचूक उपचार घ्यायला हवेत. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा –

महिलांना टक्कल पडण्याचे कारण आणि घरगुती उपाय (Home Remedies For Female Baldness)

जाणून घ्या स्काल्पवर पिंपल्स येण्याची कारणं आणि घरगुती उपाय

पांढरे केस काळे करण्यासाठी आवळ्यापासून तयार करा नॅचरल डाय

Read More From Care