पालकत्व

हिवाळ्यात मुलांना घालू नका फरचे कपडे, जाणून घ्या दुष्परिणाम

Trupti Paradkar  |  Dec 23, 2021
These clothes can harm children in winter in Marathi

हिवाळा सुरू झाला की सर्वांना थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची गरज असते. त्यामुळे या काळात कपाटात वर्षभर ठेवून दिलेले लोकरीचे कपडे बाहेर काढले जातात. बऱ्याचदा हिवाळ्याआधी यासाठी खास खास विंटर कलेक्शनची खरेदी केली जाते.  तुमच्या घरी लहान मुलं असतील तर त्यांची हिवाळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते. कारण लहान मुलांची त्वचा जास्त नाजूक आणि मुलायम असते. आजकाल बाजारात लहान मुलांसाठी खास विंटर कलेक्शन विकत मिळतं. ज्यामध्ये फरपासून बनवलेले आकर्षक आणि क्यूट कपडे असतात. प्रत्येक आईवडिलांना आपले मुल सुंदर आणि गोंडस दिसावं असं वाटत असतं. त्यामुळे असे आकर्षक कपडे लहान मुलांसाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जातात. पण तुमच्या बाळाला यंदाच्या हिवाळ्यात असे फरचे आकर्षक कपडे घालणार असाल तर वेळीच सावध व्हा. कारण थंडीत तान्हा बाळाला हिवाळ्यात लोकरीचे कपडे घालावे पण फरचे कपडे मुळीच घालू नयेत. जाणून घ्या यामागचं कारण

These clothes can harm children in winter in Marathi

बाळाचा जावळ विधी संपूर्ण माहिती | Javal Kadhane Vidhi Marathi

फरचे कपडे लहान मुलांसाठी का नाहीत योग्य

तुमची लहान मुलं फरच्या कपड्यांमध्ये गोंडस वाटतात. मात्र या कपड्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू लहान मुलांच्या आरोग्यासाठी योग्य नसतात. फरचे कपडे घातल्यामुळे तुमच्या मुलांच्या अंगावर पुरळ अथवा लाल चट्टे येतात. कारण तुमच्या मुलांना अशा कपड्यांमधून सहज इनफेक्शन होऊ शकते. लहान मुलांची त्वचा अतिशय नाजूक असते त्यामुळे त्यांना इनफेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. अशा कपड्यांमधून इनफेक्शन झाल्यामुळे मुलांना सर्दी खोकला होऊ शकतो. शिवाय फरचे कपडे सतत धुता येत नाहीत. लहान मुले सतत खाताना, खेळताना सर्व काही अंगावर सांडून घेतात. अशा परिस्थितीत कितीही छान दिसत असले तरी फरचे कपडे मुलांसाठी योग्य ठरत नाहीत. कारण मुलांना नेहमी स्वच्छ आणि निर्जंतूक कपडेच वापरावे. फरचे कपडे धुणे आणि निर्जंतूक करणे कठीण असते. 

बाळाची काळजी कशी घ्यायची (Navjat Balachi Kalji In Marathi)

फरच्या कपड्यांमधून का होते इनफेक्शन

फरचे कपडे जनावरांच्या चामडी आणि केसांपासून बनवले जातात. जनावरांची चामडी सडण्यासाठी त्यामध्ये अनेक प्रकारची रसायने टाकली जातात. त्यानंतर आकर्षक दिसण्यासाठी चामडे अथवा फर डाय केली जाते. यामुळे कपडे नक्कीच आकर्षक होतात मात्र त्यामुळे तुमच्या मुलांच्या त्वचा, शरीर आणि हॉर्मोन्सवर वाईट परिणाम होऊ शकतो. यासाठीच मुलांना नेहमी आरामदायक आणि साधे कपडे घालावे. हिवाळ्यात त्यांचे संरक्षण सुती आणि लोकरीच्या कपड्यामधून होऊ शकते. त्यासाठी लेदर अथवा फरच्या कपड्यांची मुळीच गरज नाही. 

बाळाचे पोट साफ होण्यासाठी उपाय | Balachi Shi Honyasathi Upay

Read More From पालकत्व