चमकदार, लांबसडक आणि सुंदर केस सगळ्यांनाच हवेहवेसे वाटतात. सुंदर केसांसाठी तुम्ही कितीतरी प्रयत्न करत असता. नारळाचे दूध लावणं, शिकेकाईने केस धुणे किंवा तेल लावणे असो. तुमच्या केसांना सुंदर बनवण्याचा दावा करणारी अनेक उत्पादन बाजारात मिळता आणि जी तुम्ही वापरून ही बघता. बऱ्याचदा ही उत्पादन तुमच्या केसांसाठी नक्की चांगली आहेत की नाही, याचा तुम्ही विचारही करत नाही. खरंतर लक्षात घेण्याची बाब आहे की, तणाव, धूळ-माती आणि निष्काळजीपणामुळे तुमचे केस रुक्ष आणि राठ होतात. म्हणूनच आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत, काही सिक्रेट टीप्स, ज्यामुळे तुमचे केस लांब, घनदाट आणि मजबूत होतील.
केसांची काळजी घेण्यासाठीचे उपाय (Hair Care Tips)
डॅंड्रफ म्हणजेच कोंड्याची समस्या (Dandruff)
जर तुमच्या डोक्याला सारखी खाज सुटत असेल तर फक्त अॅंन्टी ड्रॅंड्रफ शॅम्पू वापरुन भागणार नाही. कोंड्यापासून सुटका होण्यासाठी तुम्हाला आठवड्यातून एकदा तरी डोकं धुण्यासाठी मेडिकेटेड शॅम्पू वापरावाच लागेल. कारण फक्त अॅंन्टी ड्रॅंड्रफ शॅम्पू तुमच्या केसांच्या कोंड्याच्या समस्येला पूरक ठरणार नाही.
रोज केस धुणं टाळा (Hair Wash)
दररोज केस धुतल्याने तुमच्या केसांमधलं नैसर्गिक तेल नष्ट होतं आणि तुमचे केस राठ दिसू लागतात. तरीही जर तुम्हाला रोज केस धुण्याची गरज वाटत असल्यास त्यासाठी थंड पाण्याचाच वापर करा. तसेच केसांना बेबी शॅम्पू किंवा हर्बल शॅम्पू जरूर लावा. कारण या शॅम्पूची पीएच व्हॅल्यू कमी असते, त्यामुळे केसांचे नुकसान होत नाही.
शॅम्पू बदलत रहा (Shampoo)
तुम्ही वर्षानुवर्षे एकच शॅम्पू वापरत असाल तर त्या शॅम्पुची तुमच्या केसांना सवयही झाली असेल. परिणामी त्या शॅम्पूचा तुमच्या केसांवर काही परिणाम होणार नाही. शिवाय त्यामुळे तुमच्या केसांमधलं नैसर्गिक तेलही नष्ट होऊ शकतं. केसाचे विशेष तज्ज्ञ नेहमीच सल्ला देतात की, शॅम्पूमध्ये कायम बदल करावा. त्यामुळे तुमच्या केसांचे नुकसान होणार नाही आणि शॅम्पूची सवयही होणार नाही.
Also Read About कोरफड Vera मुखवटा
व्हिनेगर लावा (Magical Vinegar)
अंड हे केसांसाठी किती चांगल असतं. ते प्रत्येकालाच माहीत आहेच. पण त्याच्या कुबट वासामुळे ते लावणं आपण टाळतो. त्यामुळे अंड्याऐवजी तुम्ही वेगळा पर्याय म्हणून व्हिनेगरचा वापर करू शकता. शॅम्पू आणि कंडीशनिंग केल्यावर अॅपल साइडर व्हिनेगर लावा आणि मग केस धुवा. त्यामुळे केस मऊ तर होतीलच पण त्याचबरोबर ते चमकदार ही होतील आणि तेही कुठल्याही दुर्गधांशिवाय.
आजीच्या बटव्यातून (Grandmas Advice)
शाळेतले दिवस आठवतायेत का? केसांची चंपी करुन, मस्त करकचून केसांच्या वेण्या बांधलेल्या असायच्या. आता ही तसंच करा. हो. खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल वा कोणतंही तेल घ्या, मस्त केसांची चंपी करा. कारण तेल हे आजीच्या बटव्यातलं सगळ्यात मस्त आणि सहज उपलब्ध असं मॉइश्चराइज कंडीशनर आहे. चंपी करताना तेल केसांच्या मुळापासून सुरूवात ते केसांच्या टोकापर्यंत लावा आणि त्यानंतर कमीत कमी १ तास तरी केस तसेच राहू द्या.
केसांवर कमीत कमी मशीन्सचा वापर करा. (Rely on Natural Remedies)
स्ट्रेटनिंग मशीन असो वा ब्लो ड्रायर काही काळापुरतंच केसांना सुंदर बनवतात. पण नंतर त्याच्या वापराने केस रुक्ष आणि राठ दिसू लागतात. त्यामुळेच या मशीन्स शक्य तितक्या कमीच वापरा. तुमच्या केसांना नेहमी नैसर्गिक पोषण द्या, ज्यामुळे ते खूप चांगले आणि सुंदर होतील आणि मग तुम्हीच काय तर… सगळेच तुमच्या केसांच्या प्रेमात पडतील.
तुमच्या कर्ल्सला करा रिव्हाइव (Curly Affair)
Image Source : Instagram
तुमचे कुरळे केस एकसारखे नसतील किंवा चपटे होत असतील तर ड्राय शॅम्पू वापरा. तुमचे केस रिपेअर करण्यासाठी अजून एक सोपा उपाय आहे. सगळे केस एकत्र घेऊन बोटांनी गुंडाळत वर न्या… पोनीटेल बांधताना जसे नेतात तसेच. त्यामुळे तुमचे कर्ल्स एकसारखे वळतील.
फ्रिजी केसांना करा कंट्रोल (How to control fizzy hair)
फ्रिजी झालेले केस रुक्ष, गुंतलेले आणि राठ वाटतात. त्यासाठी केसांना कंडीशन केल्यानंतर आणि केसांवर थंड पाणी ओता. त्यामुळे हेअर क्युटिकल्स बंद होतील आणि फ्रिजी केसांपासून सुटकाही होईल.
तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:
केस लवकर वाढवण्यासाठी घरगुती उपाय