केसांची निगा राखण्यासाठी केसांना नियमित तेल लावणं गरजेचं आहे. कोमट तेलाने केसांना मसाज केल्यामुळे तुमचा थकवा पटकन दूर होतो. केस मजबूत आणि घनदाट होण्यासाठी आठवड्यातून एक ते दोन वेळा केसांना हळूवार मसाज करणंही गरजेचं आहे. शिवाय आजकाल धुळ, माती, प्रदूषण यामुळे केस गळण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. म्हणूनच नियमित हेअर मसाज करणं केसांच्या वाढ आणि पोषणासाठी गरजेचं ठरतं. मात्र केसांना तेलाचा मसाज करताना काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे. यासाठी जाणून घ्या केसांना तेल लावल्यावर कोणत्या गोष्टी करू नये.
Shutterstock
अती गरम तेलाने मसाज करू नये –
केसांना तेलाने मसाज करण्यासाठी अनेकजणी तेल कोमट न करता चक्क गरम करतात. मात्र तेल गरम केल्यामुळे तेलामधील पोषणतत्त्वं कमी होतात. यासाठीच तेल फक्त थोडसं कोमट करा. जर तुम्हाला तेल कोमट करायचं नसेल तर पाणी कोमट करा आणि त्यात तेलाचे काही थेंब टाका. ज्यामुळे तेल तुमच्या केसांच्या मुळांपर्यंत मुरेल.
तेलाने मसाज केल्यावर कंगव्याने केस विंचरू नका –
केसांना तेलाने मसाज केल्यामुळे केसांमध्ये गुंता होतो. सहाजिकच हे गुंतलेले केस नीट करण्यासाठी तुम्ही कंगव्याचा वापर करता. मात्र तेलाने मसाज केल्यावर लगेचच केसांवर कंगवा वापरणं योग्य नाही. कारण मसाज केल्यामुळे तुमच्या केसांची मुळं मोकळी आणि नाजूक झालेली असतात. त्यामुळे त्यावर लगेचच कंगव्याचा वापर करणं चुकीचं ठरू शकतं.
Shutterstock
केस घट्ट बांधून ठेवू नका –
बऱ्याचदा केसांना तेल लावल्यावर ते घट्ट बांधून ठेवण्याची अनेकींना सवय असते. मात्र असं करणं केसांसाठी मुळीच चांगलं नाही. केस घट्ट बांधून ठेवल्यामुळे ते तुटून गळण्याची शक्यता वाढते. त्यापेक्षा केसांचा सैलसर आंबाडा अथवा पोनीटेल बांधून ठेवणं सोयीचं ठरेल. शिवाय केसांना तेलाने मसाज केल्यानंतर अर्धा तासाने केस धुवून टाका. नाहीतर केसांवर धुळ, माती, प्रदूषण चिकटल्यामुळे त्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते.
केसांना दिवसभर तेल लावून ठेवू नका –
केसांना तेलाचा मसाज केल्यावर तुमच्या केसांच्या मुळांमधील त्वचाछिद्रे मोकळी होतात. त्यामुळे जर तुम्ही दिवसभर केसांना तेल लावून ठेवलं तर तुमच्या केसांचं नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच केस धुण्याआधी एक ते दोन तास अथवा रात्री झोपण्यापूर्वी केसांना तेल लावा. ज्यामुळे केस वेळेवर धुता येतील.
तेल लावलेले केस धुतल्यावर सुकवण्यासाठी लगेचच ड्रायर वापरू नका –
केसांना तेल लावल्यामुळे केसांना चांगले पोषण मिळते. म्हणूनच मसाज केल्यावर धुतलेल्या केसांना सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करू नका. नाहीतर तुम्ही केलेल्या हेअर मसाजचा काहीच फायदा होणार नाही. यासाठीच हेअर मसाज, हेअर स्पा केल्यावर ड्रायरचा वापर केल्यास तुमच्या केसांचं नुकसान होऊ शकतं.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
हे ही वाचा –
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.
अधिक वाचा –
घरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस
जाणून घ्या केसांना कधी आणि कसं लावावं ‘हेअर ऑईल’