घर आणि बगीचा

परफेक्ट बेडशीट खरेदी करण्यासाठी या गोष्टी ठेवा लक्षात

Trupti Paradkar  |  Mar 31, 2021
परफेक्ट बेडशीट खरेदी करण्यासाठी या गोष्टी ठेवा लक्षात

घरातील प्रत्येक व्यक्तीची खोली त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिक असते. म्हणूनच तुमची बेडरूम आणि त्यामधील सजावट नेहमी खासच असायल हवी. बेडरूमच्या सजावटीतून तुमच्या आवडीनिवडीचं दर्शन होत असतं. खरंतर बेडरूमची शोभा अधिक वाढवते बेडवर अंथरलेली आकर्षक बेडशीट. यासाठीच तुमच्या रूमसाठी अशी परफेक्ट बेडशीट कशी निवडायची हे तुम्हाला माहीत असायलाच हवं. बऱ्याचदा महागडी, ब्रॅंडेड बेडशीट घेऊनही तुम्हाला ती आवडेलच याची खात्री देता येत नाही. यासाठी या गोष्टी बघून मगच तुमची बेडशीट निवडा.

रंग आहे महत्त्वाचा –

बेडशीट निवडताना सर्वात महत्त्वाचा आहे रंग. आजकाल विविध रंगसंगतीच्या बेडशीट बाजारात उपलब्ध असतात. मात्र बेडशीट निवडण्यापूर्वी तुमच्या बेडरूममधील फर्निचर आणि खिडक्यांच्या पडद्याच्या रंगाचा विचार करा. त्यानुसार तुमच्या बेडसाठी योग्य रंगाची बेडशीट निवडा. तुम्ही या रंगसंगतीला परफेक्ट मॅचिंग अथवा कॉन्ट्रास्ट रंगाची बेडशीट निवडू शकता. गदड रंगसंगतीमुळे तुमच्या बेडरूममध्ये उत्साही वातावरण निर्माण होईल तर हलके आणि पेस्टल रंग तुम्हाला रिलॅक्स करण्यास मदत करतील. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार रंग निवडा.

instagram

बेडशीटचे कापड कसे आहे –

बऱ्याचदा ऑनलाईन अथवा ब्रॅंडेड बेडशीट खरेदी करताना त्याच्या फॅब्रिकबाबत फसवणूक होण्याची शक्यता असते. यासाठीच कोणतीही बेडशीट निववडताना  तिचं मटेरिअल कसं आहे हे अवश्य तपासा. बेडशीट आरामदायक वाटण्यासाठी त्या नेहमी शंभर टक्के कॉटनच्या असाव्या. सिल्क आणि पॉलिस्टरच्या बेडशीट दिसायला खूप छान वाटतात. मात्र त्यामुळे तुम्हाला झोपल्यावर गरम होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या सोयीनुसार कापड निवडा.

बेडशीटचे पॅटर्न नीट बघून घ्या –

बेडशीटचे पॅटर्न बेडवर टाकल्यावरच नीट समजते. कारण त्या पॅटर्ननुसार तुमचा मूड चेंज होऊ शकतो. बाजारात आजकाल विचित्र आणि मजेशीर पॅटर्न्सदेखील मिळतात. फ्लोरल, पारंपरिक, प्लेन डिझाईनच्या बेडशीट तुमच्या खोलीत प्रसन्न आणि आनंदी वातावरण निर्माण करतात. लहान मुलांच्या खोलीत कार्टून अथवा मोठ्या प्रिंटच्या डिझाईनचा सध्या ट्रेंड आहे. मात्र यासाठी तुम्हाला त्यांची आवडनिवड नक्कीच पाहायला हवी. कारण एखादं विचित्र डिझाईन पाहून त्यांच्या मनावर परिणाम होऊ शकतो. यासाठी बेडशीट खरेदी करण्यापूर्वी त्यावरील पॅटर्न जरूर पाहा. 

instagram

आधी गुणवत्ता बघा आणि मगच खरेदी करा –

कोणतीही गोष्ट खरेदी करण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तपासणं गरजेचं आहे. जरी एखाद्या बेडशीटचा रंग, पॅटर्न आणि कापड चांगले असेल तरी त्यात वापरण्यात आलेल्या कापडाची गुणवत्ता अथवा प्रिंट खराब असेल तर तुमचे पैसे पाण्यात जाऊ शकतात. बऱ्याचदा डिफेक्टिव्ह माल अशा पद्धतीने स्वस्तात अथवा सेलमध्ये विकला जातो. तेव्हा गुणवत्ता तपासा आणि मगच खरेदी करा.

बेडशीटचा आकार बेडसाठी परफेक्ट आहे का –

आजकाल प्रत्येकाच्या खोलीत निरनिराळ्या आकाराचे बेड असतात. घराची सजावट करताना खोलीच्या आकारानुसार या बेडचा आकार ठरवला जातो. यासाठीच सिंगल, डबल, किंगसाईज, क्वीनसाईज अशा कोणत्या बेडसाठी तुम्ही बेडशीट निवडत आहात ते आधी समजून घ्या. बऱ्याचदा ऑनलाईन खरेदी करताना तुम्ही रंग आणि डिझाईन आवडल्यामुळे बेडशीट खरेदी करता मात्र त्या बेडशीटचा आकार तुमच्या बेडसाठी योग्य नसतो. यासाठी ही गोष्टदेखील लक्षात ठेवा. 

instagram

फोटोसोजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा – 

घराच्या सौदर्यांत भर टाकणाऱ्या ‘कॉटन आणि हँडलूम’ पडद्यांच्या टेंडविषयी बरंच काही… (Curtains For Home Decoration In Marathi)

घरातील देवघर सजवा सोप्या पद्धतीने, दिसेल अधिक सुंदर

वास्तू टीप्स: चूकून ही तुमच्या बेडजवळ ‘या’ वस्तू ठेऊ नका, होऊ शकतं नुकसान

Read More From घर आणि बगीचा