Planning

लग्नसमारंभासाठी मेन्यू ठरवताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या टिप्स

Trupti Paradkar  |  Nov 21, 2019
लग्नसमारंभासाठी मेन्यू ठरवताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या टिप्स

घरात लग्नकार्य ठरलं की सर्वात आधी धावपळ करावी लागते ती बॅंक्वेट हॉल बूक करण्यासाठी आणि लग्नसोहळ्यातील मेन्यू ठरवण्याची. लग्नासाठी आमंत्रितांना आवडेल असा खास मेन्यू ठरवला जातो. कारण अनेक लोक बऱ्याच वर्षांनंतरही लग्नातील जेवणावर चर्चा करत राहतात. कोणाच्या लग्नात काय जेवण होतं आणि ते कसं होतं हा पाहुणेमंडळींच्या खास चर्चेचा विषय असतो. म्हणूनच लग्नाचा मेन्यू ठरवताना नेहमीच सावध असायला हवं. लग्नकार्यातील मेन्यू ठरवताना नेहमी काय काळजी घ्यावी हे जरूर वाचा.

मेनकोर्स पेक्षा स्नॅक्स आणि डेझर्टवर जास्त लक्ष द्या –

तुम्हाला याचा नक्कीच अनुभव असेल की लग्नसोहळ्यात गेल्यावर आपण मेन कोर्समधील पदार्थ खाण्यापेक्षा स्टार्ट्स, स्नॅक्स आणि डेझर्टच जास्त खातो. कारण एक तर हे पदार्थ हलकेफुलके असल्यामुळे पटकन पोट भरत नाही. शिवाय ते इतके चविष्ठ असतात की ते पुन्हा पुन्हा खावेसे वाटतात. त्यामुळे तुमच्या लग्नकार्यातील आलेली मंडळीही असंच करणार हे गुहीत धरा. तेव्हा या पदार्थांची निवड काळजीपूर्वक आणि सर्वांना आवडतील अशी करा. 

shutterstock

मेन्यू काऊंटरमध्ये व्यवस्थित अंतर असेल याची काळजी घ्या –

लग्नकार्यात अथवा एखादा पार्टीत जर तुम्ही व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन प्रकार ठेवणार असाल. तर या दोन्ही काऊंटरमध्ये व्यवस्थित अंतर असेल याची काळजी घ्या. कारण व्हेज खाणाऱ्या पाहुण्यांसाठी ते नक्कीच सोयीचं ठरू शकतं. शिवाय या उपायामुळे तुम्हाला  पाहुण्यांच्या गर्दीला व्यवस्थित मॅनेज करता येऊ शकतं. ज्यामुळे एकाचवेळी अनेक पाहुणे आले तरी त्यांचा गोंधळ होत नाही. 

लग्नाच्या प्रत्येक विधीसाठी निरनिराळा मेन्यू ठरवा –

जर तुमच्या विवाहसोहळ्यात तुम्ही प्रत्येक विधीसाठी स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केला असेल. तर या प्रत्येक कार्यक्रमासाठी निरनिराळा मेन्यू आणि थीम ठरवा. जसं की एखाद्या पारंपरिक कार्यक्रमाला खास महाराष्ट्रीन पंगतीचं जेवण, संध्याकाळच्या कार्यक्रमांना पानीपुरी, पावभाजी, स्नॅक्सचे स्टॉल, एखाद्या कार्यक्रमात गुजराती अथवा पंजाबी स्टाईल जेवण, रिसेप्शनला चायनीज, इटालियन, थाय आणि विविध प्रकारचे डेझर्ट असं केल्यामुळे तुमच्या पाहुण्यांना  एकाच लग्नसोहळ्यात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ चाखता येतील.

गोंधळ टाळण्यासाठी असं करा प्लॅनिंग –

लग्नात महिलांना साडी, घागरा, दुपट्टा अथवा पुरूषांना धोती, शेरवानी असे पारंपरिक कपडे घालून जेवावं लागतं. यासाठीच त्यांचा जास्त गोंधळ होणार नाही, वातानुकूलित डायनिंग रुम्स, सर्व्ह करण्याची सेवा अशा सुविधा असतील याची काळजी घ्या. ज्यामुळे पाहुण्यांना  जेवणाचा आनंद व्यवस्थित घेता येईल. 

shutterstock

कार्यक्रम सुरू असताना वेलकम ड्रिंक्स आणि स्टार्टर्स –

कधी कधी काही पाहुणे फार दूरचा प्रवास करून तु्मच्या कार्यक्रमासाठी आलेले असतात. लग्नसोहळा त्यातील विधी होईपर्यंत वेळ लागल्यास त्यांना  भुक लागू शकते. अशावेळी जर तुमच्या कार्यक्रमात वेलकम ड्रिंक्स आणि स्नॅक्स अथवा स्टार्टर्सची व्यवस्था असेल तर त्यांची चांगली सोय होते.  

तुमचं लग्न कोणत्या ऋतूत आहे ते आधी पाहा –

बऱ्याचदा आपण लग्नसोहळ्यासाठी बॅंक्वेट हॉल आणि मेन्यूचं प्लॅनिंग लग्नाच्या आधी कमीत कमी तीन ते सहा  महिने करतो. म्हणूनच मेन्यू ठरवताना तुमचा कार्यक्रम कोणत्या महिन्यात आहे याचा नीट विचार करा. जर तुम्ही हिवाळ्यात लग्न  ठरवलं असेल तर मेन्यूमध्ये सूप, ड्रायफ्रुट पुलाव, जास्त ग्रेव्हीच्या भाज्या यांचा समावेळ करा शिवाय जर लग्न उन्हाळ्यात असेल तर फ्रुट सलाड, हलक्या ग्रेव्हीच्या भाज्या, आईस्क्रीम, थंड गार रबडी असे पदार्थ ठेवण्याचा प्रयत्न करा.

मेन्यू टेबलजवळ प्रत्येक पदार्थांची माहिती असेल याची काळजी घ्या –

तुमच्या मेन्यूजवळ त्या पदार्थाचे नाव आणि माहिती असणं खूप गरजेचं  आहे. यासाठी तुमच्या इव्हेंट मॅनेजर अथवा हॉलच्या मॅनेजरला आधीच कल्पना द्या. समजा जर तुम्ही महाराष्ट्रीय पद्धतीचे जेवण ठेवलं असेल तर ते पदार्थ तुमच्या इतर भाषीय पाहुण्यांना त्यामुळे समजू शकतात. कधी कधी एखाद्या पदार्थांची तु्म्हाला अॅलर्जी असू शकते. जर तुम्ही पदार्थांची माहिती दिली असेल तर त्यांना त्याविषयी आधीच कल्पना मिळू शकते. ज्यामुळे त्यांना कार्यक्रमात कोणता त्रास होत नाही. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा –

WeddingSpecial : लग्नासाठी हारांचे सुंदर डिझाईन्स

लग्नासाठी शॉपिंग करताय, मग या ‘15’ गोष्टी जरूर लक्षात ठेवा

स्पेशल पार्टीसाठी मेन्यू ठरवत आहात, मग हे वाचाच

Read More From Planning