Long Hair

केसांसाठी केरेटीन (keratin) करण्याच्या विचार करताय.. तर मग वाचा

Leenal Gawade  |  Feb 3, 2020
केसांसाठी केरेटीन (keratin) करण्याच्या विचार करताय.. तर मग वाचा

चांगल्या केसांसाठी काय करु तितके कमीच असतेच. केसांच्या वाढीसाठी तेल, शँम्पू, सीरम आपण सर्वसाधारणपणे लावतो. केसांची फारच काळजी घ्यायची झाली तर आपण हेअर स्पा, हेअर मसाज असं काही करुन घेतो. जर तुम्हाला तुमच्या केसांसाठी थोडी अॅडव्हान्स ट्रिटमेंट करायची असेल तर आज मी तुम्हाला एक चांगला पर्याय सुचवणार आहे. मी सुद्धा माझ्या केसांसाठी ही ट्रिटमेंट घेतली त्यानंतर माझे केस मला चांगले वाटू लागले म्हणूनच मी तुम्हाला आज या विषयी सगळी माहिती देणार आहे. ही ट्रिटमेंट आहे केरेटीन (Keratin) हेअर ट्रिटमेंट. तुम्ही ही तुमच्या स्टायलिस्टकडून आणि सलोनमधून हा प्रकार ऐकला असेलच जाून घेऊया याविषयी

तुमच्या केसांसाठी हा हेअर स्पा ठरु शकतो वरदान

केरेटीन ट्रिटमेंट(Keratin) म्हणजे काय?

Instagram

ज्या वेळी तुम्ही स्पा करायचा आहे असे सांगता त्यावेळी तुमचे केस पाहून स्टायलिस्ट अनेकदा केरेटीन ट्रिटमेंट(Keratin) देण्याचा सल्ला दिला जातो. आता केरेटीन ट्रिटमेंट म्हणजे काय असा प्रश्न तुम्हााल पडला असेल तर ज्या पद्धतीने स्मुथिंग केले जाते अगदी त्याच काही स्टेप्स फॉलो करुन केरेटीन ट्रिटमेंट केले जाते. केसांसाठी आवश्यक असलेले केरेटीन प्रोडक्ट वापरुन तुमच्या केसांना शाईन आणली जाते. यामध्ये केसांवर आयनिंग मशीन फिरवली जाते.पण या ट्रिटमेंटचा उद्देश्य केस सरळ करणे असा होत नाही. तर केसांना यामुळे एक बाऊन्स आणि शाईन मिळते. तुमच्या केसांचा फॉल छान पडतो. केस सुटसुटीत दिसतात. केसांचा गुंता होत नाही आणि विशेष म्हणजे साधारण 6 महिने तुम्हाला केसांच्या मेन्टनंसशिवाय काही वेगळे करावे लागत नाही. 

अशी केली जाते केरेटीन (Keratin Treatment)

Instagram

आता केरेटीन करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर अशापद्धतीने केरेटीन ट्रिटमेंट सर्वसाधारणपणे केले जाते. 

त्वचेला आणि केसांना नवी चमक देण्यासाठी वापरा कोरफड, अफलातून फायदे

केरेटीन ट्रिटमेंटबद्दल हेही माहीत हवे

Instagram

केरेटीन  केल्यानंतर तुम्हाला ते जास्त काळ टिकावे असे वाटत असेल तर तुम्ही सांगितलेला शँम्पू वापरणे अधिक चांगले असते.

हेअरवॉश केल्यानंतर साधारण 15 दिवस तरी तेल लावू नका. कारण तुम्ही तेल लावल्यामुळे ही ट्रिटमेंट मुरण्याचा कालावधी कमी होतो. 

आठवड्यातून किमान तीन वेळा तरी तुम्ही तुमचे केस धुवा. केस धुतल्यानंतर कंडीशनर लावायला विसरु नका. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

Read More From Long Hair