Care

त्वचेची अशी घ्या बाळंतपणानंतर काळजी | Skin Care During Pregnancy In Marathi

Trupti Paradkar  |  Mar 23, 2020
Skin Care During Pregnancy In Marathi

गरोदरपण आणि बाळंतपण हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. हॉर्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांचा परिणाम मानसिक स्थिती आणि त्वचेवर होत असतो. बाळंतपणानंतर स्त्रीचे शरीर पूवर्वत होण्यास सुरूवात होते. ज्यामुळे त्वचेवर प्रसूतीनंतरच्या काही खुणा दिसू लागतात. अपुऱ्या झोपेमुळे बऱ्याचदा डोळ्याखाली डार्क सर्कल्स निर्माण होतात. तर प्रसूतीनंतर शरीरावर स्ट्रेचमार्क्स होणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. जर तुमचे सी-सेक्शन झाले असेल तर व्यायामाच्या अभावामुळे पूर्ववत होण्यास इतर महिलांपेक्षा जास्त काळ जाऊ शकतो. बाळाच्या जन्मानंतर काही दिवस तुम्ही घरी आराम करता मात्र नंतर पुन्हा ऑफिस आणि इतर कामांसाठी घराबाहेर पडणं गरजेचं असतं. म्हणूनच बाळंतपणानंतर काळजी घेणं खूप गरजेचं आहे. यासाठी जाणून घ्या या काळात त्वचेची कशी काळजी घ्यायची 

बाळंतपणानंतर होणाऱ्या त्वचेच्या समस्या (Common Skin Problems After Delivery)


बाळंतपणानंतर काळजी

गरोदर आणि बाळंतपणात स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात. सहाजिकच याचा परिणाम तिच्या त्वचेवर होतो. ज्यामुळे अनेक त्वचा समस्या या काळात निर्माम होतात. 

स्ट्रेच मार्क्स

बाळंतपणानंतर महिलांच्या पोट, कंबर, स्तन आणि मांड्यावर स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात. कारण गरोदरपणात वाढलेलं पोट आणि शरीर बाळंतपणानंतर पुन्हा पूर्ववत होत असतं. त्यामुळे त्वचा सैल पडते आणि त्याजागी स्ट्रेच मार्क्स निर्माण होतात. या स्ट्रेच मार्क्समुळे प्रेगन्सीनंतर महिला हवे तसे फॅशनेबल कपडे घालणं शक्य नसतं. कारण स्ट्रेच मार्क्स तुमच्या पोट आणि मांड्यांवर मोठ्या प्रमाणावर असू शकतात. स्ट्रेच मार्क्स कालांतराने काही उपाय योजना करून कमी करता येत असले तरी या खुणा तुमच्या शरीरावर कायम राहतात. म्हणूनच स्टेच मार्क्स लपविण्यापेक्षा स्ट्रेच मार्क्स वर घरगुती उपाय करून तुम्ही ते नक्कीच विरळ करू शकता. यासाठीच वाचा प्रेगन्सी स्ट्रेच मार्क्सपासून ते चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यापर्यंत कसे उपयुक्त आहे बायो ऑईल

काळे डाग

गरोदरपण आणि बाळंतपणात स्त्रीच्या शरीरात अनेक मानसिक बदलही होत असतात. बाळाची पोटात होणारी वाढ आणि सुखरूप प्रसूतीसाठी मनात एक प्रकारची चिंता निर्माण झालेली असते. बाळंतपणानंतर बाळाच्या संगोपनाबाबत काळजी वाटत असते. या सर्व गोष्टींचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होतो. कारण त्यामुळे तुमच्या त्वचेवर काळे डाग निर्माण होतात. 

डार्क सर्कल्स आणि सूज

बाळाच्या संगोपनामुळे तुमची झोप कमी होते ज्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर डोळ्याखाली काळी वर्तूळे आणि सूज निर्माण होते. बऱ्याचदा यामागे हॉर्मोन्समध्ये होणारे बदलदेखील कारणीभूत ठरू शकतात. बाळंतपणानंतर जाणवणारा थकवा तुमच्या डोळ्यांमधून व्यक्त होत असतो. ज्यामुळे तुमचे डोळे काळवंडलेले आणि सूजलेले दिसू लागतात. 

मेलास्मा

मेलास्माला प्रेगन्सी मार्क्स असंही म्हणतात. बाळंतपणानंतर त्वचेवर अशा प्रकारचा काळेपणा अथवा पिगमेंटेशन वाढू लागतं. यामागचं कारण त्वचेत वाढलेली मॅलानिनची निर्मिती असते. मात्र प्रत्येकीलाच असा त्रास होतो असं नाही. कारण याचा सबंध तुमच्या अनुवंशिकता आणि हॉर्मोन्सशी असू शकतो. बऱ्याचदा बाळंतपणात सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात राहिल्यामुळेही चेहऱ्यावर काळसरपणा वाढू शकतो. अशा परिस्थितीत बऱ्याचदा फक्त कपाळ, गाल, नाकाचे हाड अथवा तुमची हनुवटीच काळी पडते. 

अॅक्ने

गरोदरपणात स्त्रीच्या शरीरावर बाळाचं ओज येतं. ज्यामुळे तिची त्वचा तेजस्वी, ओजस्वी दिसू लागते. यामागचं कारण तिच्या शरीरात वाढलेलं रक्ताचं प्रमाण आणि त्वचेवर निर्माण झालेली अतिरिक्त तेलाची निर्मिती असते. याचा बऱ्याचदा त्वचेवर दुष्परिणामदेखील होऊ शकतो. कारण तेलकटपणामुळे त्वचेवर अॅक्ने तयार होतात. 

अती संवेदनशीलता

बाळंतपणानंतर त्वचेत होणाऱ्या बदलामधील आणखी एक बदल म्हणजे त्वचा अचानक अती संवेदनशील होते. कारण त्वचेवर पूर्वी न जाणवणारे बदलही आता स्पष्ट जाणवू लागतात. उदा. तुम्ही आता थोडंदेखील सूर्यप्रकाशात गेला तर तुम्हाला सनबर्न होतं किंवा त्वचेवर कोणतंही प्रॉडक्ट लावलं तर इनफेक्शन होतं. याचाच अर्थ तुमची त्वचा आता पूर्वीपेक्षा जास्त संवेदनशील झाली आहे. म्हणूनच तुम्ही डिलिव्हरीनंतर त्वचेची जास्त निगा राखण्याची गरज वाढते. यासोबतच वाचा नॉर्मल डिलिव्हरीसाठी टिप्स (Normal Delivery Tips In Marathi)

बाळंतपणानंतरच्या त्वचेच्या समस्यांसाठी काही बेस्ट उत्पादने

Skin Care During Pregnancy In Marathi

बाळंतपणानंतर त्वचेची काळजी घेण्यासाठी ब्युटी प्रॉडक्ट काळजी पूर्वक निवडण्याची गरज आहे. कारण इतर प्रॉडक्टमधील केमिकल्समुळे तुमच्या बाळाला त्रास होऊ शकतो.

The Moms Co. Stretch Oil

बाळंतपणानंतर महिलांना जाणवणारी मुख्य समस्या म्हणजे स्ट्रेच मार्क्स… बाळंतपणानंतर पोट पूर्ववत होताना पोट, मांड्यांवर त्वचा सैल पडल्यामुळे या खुणा निर्माण होतात. मात्र आता तुम्हाला स्ट्रेचमार्क्ससाठी जास्त चिंता करण्याची मुळीच गरज नाही. जर तुम्ही या काळात बाळासाठी सुरक्षित असं तेल स्ट्रेच मार्क्ससाठी निवडलं तर ते तुम्ही नियमित वापरू शकता. या स्ट्रेच ऑईलमध्ये सात प्रकारच्या तेलांचा समावेश आहे. त्यामुळे त्वचेत लगेच मुरतं आणि तुमच्या स्ट्रेचमार्क्स विरळ दिसू लागतात. एवढंच नाही तर यामुळे तुमच्या शरीरातील ताणही कमी होतो आणि तुम्ही रिलॅक्स होता. 

Mamaearth Body Creme

बाळंतपणानंतर तुम्ही त्वचेला कोणती क्रीम लावावी हा प्रश्न तुम्हाला नक्कीच सतावू शकतो. कारण या काळात बाळाला त्रास होणार नाही अशी नैसर्गिक क्रीम तुम्हाला स्वतःसाठी निवडायची असते. ममाअर्थची बॉडी क्रीम तुम्ही बाळंतपणानंतर काळजी घेण्यासाठी नक्कीच वापरू शकता. कारण यामध्ये तुमच्या आणि बाळाच्या सुरक्षेचा विचार करत शीया आणि कोका बटरचा वापर केलेला आहे. शिवाय यामुळे तुमच्या शरीरावरील काळेडाग, स्ट्रेचमार्क्सही दूर होतात. यातील दूधाच्या घटकांमुळे तुमची त्वचा सतत हायड्रेट राहते. 

The Moms Co. Natural Body Wash

बाळंतपणानंतर तुम्ही अंगाला कोणताही साबण अथवा बॉडीवॉश नक्कीच वापरू शकत नाही. कारण त्यातील केमिकल्समुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होतंच शिवाय असे घटक बाळासाठी धोक्याचे ठरू शकतात. यासाठी तुम्हाला हवं असं बॉडीवॉश जे तुमच्या त्वचेची निगा राखतंच शिवाय बाळासाठी सुरक्षित असेल. दी मॉम कंपनीचं हे नैसर्गिक बॉडीवॉश तुम्ही अगदी बिनधास्तपणे वापरू शकता. कारण यामध्ये नारळाचे तेल,अॅव्होकॅडो तेल, कोरफड आणि आर्गन ऑईल अशा नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आलेला आहे. 

The Moms Co. Nipple Butter

बाळाला स्तनपान दिल्यामुळे तुमचे निप्पल्स दुखतात आणि सूजतात. अशा वेळी निप्पलची निगा राखण्यासाठी तुम्ही त्यावर तेल अथवा क्रीम लावणं गरजेचं असतं. मात्र ते तेल अथवा क्रीम असं असावं ज्यामुळे बाळाच्या आरोग्याला धोका असणार नाही. दी मॉम कंपनीचं निप्पल बटर खास या गोष्टीचा विचार करून तयार केलेलं आहे. जरी ते बाळाइच्या पोटात गेलं तरी त्यामुळे बाळाला धोका नसतो. यात कॅफेन फ्री चहाचे घटक असतता. ज्यामुळे स्तनाग्रे नरम होतात आणि दूध बाहेर येण्याची प्रक्रिया सहज होते. 

The Moms Co. Natural Vita Rich Under Eye Cream 

बाळंतपणानंतर बाळाच्या संगोपनामध्ये तुम्हाला किती रात्र जागवून काढाव्या लागतात हे फक्त त्या आईलाच माहीत असतं. त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदाच आई झाला असाल तर तुम्हाला डार्क सर्कल्स आणि पफी आईजची चिंता नक्कीच सतावू शकते. पण यावर सोपा उपाय म्हणजे डोळ्यांवर अंडर आय क्रीमचा वापर करणं. दी मॉम कंपनीचं नैसर्गिक घटकांपासून बनवलेलं हे अंडर आय क्रीम तुम्ही झोपताना तुमच्या डोळ्यांखाली लावू शकता. ज्यामुळे तुमच्या डोळयाखालील रक्ताभिसरण सुधारेल आणि तुम्हाला डार्क सर्कल्स येणार नाहीत. 

Myglmm Wipeout Sanitizing Wipes

कोरोनामुळे सध्या प्रत्येकाला हात सतत सॅनिटाईझ करण्याची सवय लागली आहे. मात्र जर तुम्ही नवमाता असाल तर तुम्हाला असे सॅनिटाईझ वाईप्स वापरण्याची गरज आहे जे हात आणि वस्तू निर्जंतूक तर करतीलच शिवाय ते तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी सुरक्षित असतील. म्हणूनच तुम्ही मायग्लॅमचे सॅनिटाईझिंग वाईप्स वापरू शकता. यामध्ये निलगिरीचे तेल, लेमन ऑईल अशा नैसर्गिक घटकांचा वापर केलेला आहे. ज्यामुळे तुमची त्वचा सुरक्षित आणि निर्जंतूक होते. 

त्वचेची निगा राखण्याचे सोपे मार्ग

बाळंतपणानंतर काळजी

गरोदरपणात शरीरात झालेले बदल बाळंतपणानंतर पुन्हा पूर्ववत होत असतात. त्यामुळे तुम्ही बाळंतपणानंतर काळजी घेतली तर पुन्हा तुमची त्वचा पूर्वीप्रमाणे होऊ शकते. 

घाबरू नका

गरोदरपण आणि बाळंतपण हे स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे आहेत. त्यामुळे या काळात शरीर आणि मनस्थितीत अनेक बदल होणं स्वाभाविक आहे. सहाजिकच याचा परिणाम तुमच्या त्वचा आणि केसांवर होतो. पण बाळाच्या जन्मानंतर तुमचं शरीर नैसर्गिक पद्धतीने पुन्हा पूर्ववत होऊ लागतं. त्यामुळे याकाळात झालेले बदल हे तात्पुरते असतात. यासाठीच त्वचेवर झालेले बदल मनापासून स्वीकारा. घाबरून त्यावर तातडीने उपचार करण्याची काहीच गरज नाही. जस जसं तुमचं शरीर पूर्ववत होईल तस तसं तुमच्या त्वचेमध्ये झालेले बदल देखील पूर्ववत होतील. 

स्वतःसाठी वेळ काढा

बाळाच्या जन्मानंतर प्रत्येक स्त्री त्याच्या संगोपनात एवढी गुंतून जाते की तिला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसतो. मात्र असं केल्यास तुम्हाला भविष्यात मानसिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतरही तुम्ही तुमच्याकडे थोडं फार लक्ष नक्कीच द्यायला हवं. यात अपराधी वाटण्यासारखं काहीच नाही. शिवाय जरी तुम्ही आई असला तरी बाळाचे बाबा, आजी, आजोबा यांचीदेखील त्याला सांभाळण्याची तितकीच जबाबदारी आहे. असं करणं शक्य नसेल तर एखाद्या मदतनीसचे सहकार्य घ्या. मात्र दिवसातून थोडा वेळतरी स्वतःसाठी काढा. ज्या वेळामध्ये तुम्ही तुमचे शरीर आणि त्वचेची निगा राखू शकता. यासोबतच वाचा बाळाची काळजी कशी घ्यायची (Navjat Balachi Kalji In Marathi)

हायड्रेट राहा

बाळंतपणानंतर सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे सतत हायड्रेट राहण्याचा प्रयत्न करा. कारण डिडायड्रेशनमुळे तुमची त्वचा कोरडी पडून त्वचेच्या समस्या निर्माण होतात. बाळंतपण आणि स्तनपानामुळे तसंच तुमच्या शरीरात होणाऱ्या हॉर्मोनल बदलामुळे तुम्ही डिहायड्रेट होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी सतत पाणी प्या,सरबत, ज्यूस, सूप, शेक्स असे पदार्थ घेण्यामुळे तुमचे शरीर हायड्रेट राहिल.

नैसर्गिक गोष्टी वापरा

गरोदरपण आणि बाळंतपणात बाळाच्या आरोग्यासाठी तुम्ही सेंद्रिय आणि पौष्टीक आहार घेता. त्याचप्रमाणे तुम्ही त्वचेसाठीही नैसर्गिक वस्तूंचा वापर करायला हवा. कारण केमिकलयुक्त प्रॉडक्ट्समुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होतंच शिवाय बाळाचं आरोग्य बिघडू शकतं. बाळ सतत तुमच्याजवळ असतं, तुम्ही त्याला दूध पाजता. त्यामुळे बाळाचा तुमच्या त्वचेसोबत सतत संपर्क होत असतो. यासाठी शक्य असल्यास नैसर्गिक घटकांपासून बनवलेले साबण, क्रीमचा वापर त्वचेवर करा.

स्किन केअर रूटिन फॉलो करा

त्वचेची निगा राखण्या योग्य मार्ग म्हणजे नियमित स्किन केअर रूटिन फॉलो करणे. कारण त्वचेची योग्य निगा राखली तरच त्वचेच्या समस्या दूर राहतात. यासाठी बाळंतपणानंतरही स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि क्लिंझिंग, टोनिंग आणि मॉईस्चराईझिंग करणं टाळू नका. तुम्ही घरी बनवलेल्या अथवा नैसर्गिक वस्तूंचा वापर करून स्किन केअर फॉलो करू शकता. 

व्यायाम करा

त्वचेची निगा राखण्याचा आणखी एक सोपा मार्ग म्हणजे नियमित व्यायाम करणं. कारण व्यायाम केल्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहतेच शिवाय रक्तप्रवाह सुधारल्यामुळे तुमची त्वचाही टवटवीत दिसते. शिवाय बाळंतपणात वजन वाढल्यामुळे हॉर्मोनल असंतुलनामुळे तुमच्या त्वचेवर पिगमेटेंशन वाढते. अशा समस्या दूर ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणं नक्कीच फायद्याचं ठरेल. 

पौष्टीक खा

पौष्टीक आणि संतुलित आहार निरोगी राहण्यासाठी गरजेचा असतो. बाळंतपणानंतर काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहाराकडे पुरेसं लक्ष द्यायला हवं. ज्यामुळे तुमची शरीर प्रकृती ठणठणीत राहील आणि त्वचेच्या समस्याही दूर होतील. यासाठी आहारात भरपूर ताज्या भाज्या, फळांचा समावेश करा. बाळंतपणानंतर शरीराला साजूक तूपाची गरज असते. शिवाय सुकामेवा आणि इतर पौष्टीक गोष्टीही आहारात या काळात असणं गरजेचं आहे.

मेडिटेशन

बाळंतपणानंतर शरीरात होणाऱ्या बदलांचा तुमच्या मानसिक स्थितीशी संबध असतो. मनात सतत असणारी चिंता, काळजी तुमच्या शरीर आणि सौंदर्यावर परिणाम करत असते. यासाठी या काळात तुमचं मन स्वस्थ आणि आनंदी असणं खूप गरजेचं आहे. मन शांत करण्याचा सोपा मार्ग म्हणजे मेडिटेशन अथवा ध्यान करणं. बाळाच्या जन्मानंतर तुम्हाला अशी शांतता मिळणं थोडं कठीण असतं. मात्र बाळ झोपलेलं असताना स्वतःसाठी थोडा वेळ काढून काही मिनीटे नियमित मेडिटेशन करणं तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी नक्कीच गरजेचं आहे. यासाठी वाचा मातृत्वानंतरचे मानसिक आरोग्य, नैराश्याची कारणे आणि उपाय (Postpartum Depression In Marathi)

बाळंतपणानंतर त्वचेची काळजी घेण्याबाबत प्रश्न – FAQ’s 

1. बाळंतपणानंतर कोणते ब्युटी प्रॉडक्ट वापरू नयेत ?

बाळंतपणानंतर तुम्ही स्वतःसाठी आणि बाळासाठी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी अती केमिकलयुक्त सौंदर्य उत्पादने या काळात वापरू नका. त्यापेक्षा नैसर्गिक आणि केमिकलविरहीत प्रॉडक्ट वापरणं नक्कीच योग्य ठरेल.

2. बाळंतपणानंतर सुगंधित उत्पादने का वापरू नयेत ?

बाजारात विकत मिळणाऱ्या उत्पादनांना अधिक आकर्षित करण्यासाठी त्यात विविध सुंगध मिसळले जातात. मात्र असे प्रॉडक्ट केमिकल युक्त असतात जे बाळाच्या आईसाठी आणि बाळासाठी सुरक्षित नसतात.

3. बाळंतपणानंतर त्वचेची काळजी घेण्यासाठी कोरफड सुरक्षित आहे का ?

कोरफड त्वचेसाठी योग्य असून ते नैसर्गिक असल्यामुळे त्वचेवर त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने काढलेला कोरफडाचा गर बाळंतपणानंतर तुम्ही त्वचेसाठी नक्कीच वापरू शकता. 

Read More From Care