कोणताही सण असो वा लग्न बनारसी साड्यांची आवड आणि ट्रेंड कधीच कमी हो नाही. अनेक कार्यक्रमांना या साड्या नेसल्या जातात. बनारसी सिल्क दिसायलादेखील अतिशय सुंदर, रॉयल आणि एलिगंट लुक देते. सर्वात चांगली बाब म्हणजे कोणत्याही महिन्यात बनारसी साड्यांची मागणी घटत नाही. अशी कोणतीही महिला नसेल जिच्या कपाटात अर्थात वॉर्डरोबमध्ये बनारसी साडी नसेल. प्रत्येक महिलेला आपल्याकडे बनारसी साडी असावीच असं वाटतं. पण बनारसी साड्या टिकविण्यासाठी त्यांची खूप काळजी घ्यावी लागते. कारण ही दिसायली जितकी सुंदर असते तितकीच ते अत्यंत डेलिकेट असते आणि त्याची ठेवणीही नीट राखायला हवी. अन्यथा ही साडी खराब होते. तुम्हाला वर्षानुवर्षे बनारसी साडी टिकायला हवी असेल तर कशी काळजी घ्यायची ते आम्ही या लेखातून सांगणार आहोत.
दुसऱ्या कपड्यांपासून वेगळी ठेवा
वॉर्डरोबमध्ये तुम्ही जिथे सगळ्या साड्या ठेवता तिथे बनारसी साडी कधीही ठेऊ नका. विशेषतः बनारसी सिल्क साडी असेल तर अशी चूक अजिबात करू नका. कारण असं जर तुम्ही केलंत तर बनारसी साडीचा रंग आणि टेक्स्चर दोन्ही बिघडण्याची शक्यता असते. इतकंच नाही तर साडीतून खराब वास येण्याचीही शक्यता असते आणि असा वास जर साडीला यायला लागला तर तो परफ्युमनेदेखील तुम्ही बदलू शकत नाही. याबरोबर सिल्कचे टेक्स्चरही खराब होते. त्यामुळे बनारसी सिल्क साडी नेहमी अशाच ठिकाणी ठेवा जिथे प्रकाश येत नाही. सूर्याच्या प्रकाशात तर ही साडी अजिबातच ठेऊ नये. तुम्हाला हवं तर तुम्ही ही साडी पैठणीप्रमाणे एखाद्या कपड्यात बांधून ठेऊ शकता. या साडीवर तुम्ही लाईट मेकअप केल्यवर तर अप्रतिमच दिसता.
ब्रायडल आऊटफिटसाठी बनारसी साडी आहे उत्तम पर्याय
कशी कराल स्वच्छ?
सिल्कची साडी तशी तर ड्रायक्लिनिंगलाच द्यावी लागते. पण तुम्ही घरच्या घरी ही साडी स्वच्छ करू इच्छित असाल तर तुम्हाला खूपच काळजी घ्यावी लागेल. सर्वात पहिले तुम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की, बनारसी सिल्क साडी इतर साड्यांप्रमाणे स्वच्छ केली जात नाही. कारण ही साडी अत्यंत नाजूक असते. तुम्हाला घरीच याची स्वच्छता करायची असेल तर तुम्ही हलक्या साबणामध्ये ही साडी बुडवा आणि अगदी हलक्या हाताने धुवा. अजिबात या साडीला ब्रश लाऊ नका. तसंच गरम पाण्यात बुडवू नका. थंड पाण्यात साबण घाला आणि मगच साडी भिजवून धुवा. गरम पाण्यात चुकून जरी साडी भिजवली गेली तरी साडी पूर्ण खराब होऊ शकते.
लग्नासाठी बनारसी साडी खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी
डाग पडल्यास कसा काढाल?
बनारसी साडीवर जर डाग पडला तर तो काढणं अत्यंत कठीण आहे. त्यासाठी तुम्हाला साडी ड्रायक्लिनिंगला द्यावी लागेल. पण घरीच डाग काढायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला डाग पडलेल्या ठिकाणी अगदी थोड्याशा पेट्रोलचा वापर करावा लागेल. तुम्हाला बनारसी साडीवरील डाग हटविण्यासाठी सौम्य डिटर्जंट आणि प्रोटीन स्टेन रिमूव्हरचा वापर करावा लागेल. यामुळे बनारसी साडीवर पडलेले ज्युसचे डाग, आईस्क्रिम डाग अथवा चहाचे डाग निघून जाणंही शक्य आहे. अशा तऱ्हेने तुम्ही काळजी घेतल्यास बनारसी साडी नक्कीच जास्त टिकायला मदत मिळते आणि त्रासही हो नाही.
कांजिवरम आणि बनारसी साड्यांमधील फरक ओळखणं होतंय कठीण तर ओळखा असे
ब्रशचा वापर करू नका
बनारसी सिल्क साडीचा स्वच्छ करताना चुकूनही ब्रशचा वापर करू नका. यामुळे साडी फाटण्याचा धोका असतो. तुम्हाला ही साडी अगदी हलक्या हाताने रगडून धुवावी लागेल. त्यामुळे साडी स्वच्छ होईल आणि त्याची चमकही व्यवस्थित टिकून राहील.
इस्त्री कशी करायची
ज्याप्रमाणे बनारसी सिल्कची साडी ठेवण्याची आणि धुण्याची पद्धत वेगळी आहे तशीच या साडीची इस्त्री करण्याची पद्धतही वेगळी आहे. तुम्हाला घरीच या साडीची इस्त्री करायची असेल तर त्याखाली एखादा कॉटनचा कपडा ठेवा आणि कमी तापमानावर इस्त्री करा. अन्यथा साडी जळण्याची भीती असते अथवा इस्त्री साडीला चिकटून भोकही पडू शकते. त्यामुळे अशी काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक