कडक उन्हाळ्याच्या झळा आता चांगल्याच जाणवू लागल्या आहेत आणि मुंबईतला उकाडा जरा जास्तच जाणवतो. डोक्यावर तळपणारा सूर्य आणि घामाच्या धारांमुळे अगदी फॅनखाली बसूनही फरक पडत नाही आणि एसीमध्ये गेल्यावर बरं तर वाटतं पण आजारी पडायला होतं. धूळ, प्रदूषण, उष्णतेची लाट, सनबर्न आणि थकवा येणं या गोष्टी उन्हाळ्यात कॉमन आहेत. कारण तापमानाचा पारा एप्रिल, मे आणि जूनदरम्यान तर अगदी 40-45 पर्यंत जातो. पण काळजी करू नका, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही सोपे उपाय. ज्यामुळे तुम्हाला या तापमानातही उन्हाचा त्रास कमीत कमी होईल.
योग्य कपड्यांची निवड आणि आवश्यक अॅक्सेसरीज :
लक्षात ठेवा, जर तुम्ही उन्हाळ्यात योग्य कपड्यांची निवड केलीत तर उष्णतेचा अर्धा त्रास कमी होईल. त्यामुळे उन्हाळ्यात कटाक्षाने कॉटन किंवा लिननचे संपूर्ण अंग झाकतील असे कपडे घाला. अंग झाकतील असे कपडे यासाठी कारण उन्हाळ्यातील सूर्यकिरण हे त्वचेसाठी अपायकारक असतात. त्यामुळे उन्हाळ्यात कितीही स्लीव्हलेस कपडे घालावेसे वाटले तरी शक्यतो टाळा. तसंच बाहेर पडताना आपल्यासोबत हॅट, कॅप, स्कार्फ किंवा छत्री नक्की कॅरी करा. कारण डोक्याला थेट ऊन लागल्याने डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. डोळ्यांचं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सनग्लासेस मस्ट आहेत.
अँटी बॅक्टेरियल साबण बद्दल देखील वाचा
हायड्रेट हायड्रेट हायड्रेट :
उन्हाळ्यात स्वतः सोबत पाण्याची बाटली नक्की कॅरी करा. कारण वाढत्या तापमानामुळे भरपूर घाम येतो. ज्यामुळे आपल्याला डीहायड्रेशनचा त्रास होतो. शक्य असल्यास नुसत्या पाण्याऐवजी त्यात इलेक्ट्रॉल घातलेलं किंवा लिंबूपाणी घ्यावं. जे घेतल्यामुळे तुमच्या शरीराचं तापमान व्यवस्थित राहील. जर सुट्ट्यांमध्ये बाहेर फिरायला जाणार असाल तर शक्यतो प्रवासात मिनरल वॉटर कॅरी करा. कारण प्रत्येक ठिकाणचं पाणी तुम्हाला सूट होईलच असं नाही.
हीटला बीट करणारी डाएट :
जास्तीत जास्त व्हिटॅमीन सी असणाऱ्या फळांचा आहारात समावेश करा. उदाहरणार्थ संत्री, लिंबू इ. या फळांचा आहारात समावेश केल्याने तुमची प्रतिकारक शक्ती वाढेल. शरीराचा थंडावा कायम राहण्यासाठी जास्तीतजास्त सॅलड, पालेभाज्या खा. काकडी हा तुमच्या शरीराला उष्णतेपासून बचावासाठी सर्वोत्तम उपाय आहे. तसंच मसालेदार पदार्थ खाण्याचं प्रमाण कमी करा. उन्हाळ्यात रेड मीट खाणं शक्यतो टाळा. त्याऐवजी सीफूड खाल्लं तरी चालेल.
अचानक तापमानाचा फरक टाळा :
हे थोडं कठीण आहे. उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरून आल्यावर लगेच एसीमध्ये बसण्याची इच्छा होते. पण शक्यतो हे टाळा. तुमच्या शरीराला बाहेरून आल्यावर रूम टेंपरेचरला अॅडजस्ट होऊ द्या. असंच बाहेर पडतानाही करा. कारण तापमानातील अचानक बदलाने स्नायूंना पेटके येणे किंवा अनेक प्रकारची इन्फेक्शन्सही होऊ शकतात.
स्वच्छता बाळगा आणि रिफ्रेश राहा :
वेळेवर आंघोळ करणे आणि स्वच्छता बाळगणे हे उन्हाळ्याच्या दिवसातही महत्त्वाचं आहे. उन्हाळ्यात प्रचंड घाम येतो, शरीर चिकट झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे स्वच्छ राहणं आवश्यक आहे. कारण यामुळे तुमचं शरीर थंड राहण्यास मदत होते आणि कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शन्सपासून बचाव होतो. शक्यतो बाहेर प्रवास करताना सॅनिटायजर कॅरी करा.
मग उन्हाळ्यात वरील टीप्स फॉलो करा आणि राहा कूल
फोटो सौजन्य – Instagram, Shutterstock
हेही वाचा –
उन्हाळात पाय टॅन होऊ नयेत म्हणून अशी घ्या काळजी
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade